आरोग्य

त्वचा कोरडी पडली-पायांवरही सूज आली? किडनीच्या आजाराचीच ‘ही’ ६ लक्षणं, जीवाला धोका

किडनी आपल्या शरीरातील महत्त्वाचा भाग आहे. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्याचे काम करते. तसेच अनेक आजारांपासून रक्षण करण्याचे काम किडनी करते.

ज्यावेळी किडनी आपल्या रक्तातील कचरा फिल्टर करण्याची क्षमता गमावते तेव्हा आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. ही ६ लक्षणे दिसल्यास किडनी खराब होण्याचा धोका वाढतो.

किडनीच्या समस्यांमुळे त्वचा कोरडी पडते आणि खाज सुटू लागते. मूत्रपिंड योग्यरित्या कार्य करत नाहीत तेव्हा रक्तातील खनिजे आणि पोषक तत्वांचे संतुलन बिघडते.

किडनी फेल झाल्याची लक्षणे लघवीमध्ये दिसून येतात. अशा वेळी वारंवार लघवीला होणे, लघवीतून रक्त येणे, लघवी करताना अधिक फेस येणे. यांसारख्या समस्यांकडे दुर्लक्ष करु नका.

आपल्या डोळ्यांचा खालचा भाग सुजलेला वाटत असेल तर किडनीच्या आरोग्याची काळजी घ्यावी.

टाचांमध्ये किंवा तळपायांमधून पाणी निघणे हे किडनीचे काम व्यवस्थित होत नाही आहे याचे लक्षण आहे. तसेच हृदयरोग आणि मज्जातंतूंच्या समस्यांशी देखील सामना करावा लागतो.

इलेक्ट्रोलाइट असंतुलन हे किडनीच्या खराब कार्यामुळे होते. यामध्ये कॅल्शियमची पातळी कमी होऊन स्नायू दुखतात.

(सोशल मीडियावरून साभार)

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबईच्या झोपडपट्टीतून IIT मद्रासपर्यंतचा संघर्ष; आईच्या कष्टाचं चीज करत गौतम पाडीभर बनला IFS अधिकारी!

जालना: कचरा वेचक म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर खांद्यावर मोठी गोणी घेऊन रस्त्यावर फिरणारी व्यक्ती येते.…

7 तास ago

ऍलर्जीक खोकला लक्षणे व त्यावरील उपाय

ऍलर्जीक खोकला ही अत्यंत थकवा आणणारी स्थिती आहे. घशात जळजळ होते, रात्री वाढते आणि दैनंदिन…

7 तास ago

भारतीयांमध्ये का वाढतंय, हृदयाच्या आजारांचं प्रमान

भारतात आरोग्याबाबत चित्र झपाट्याने बदलताना दिसत आहे. देशात असंसर्गजन्य आजारांचं प्रमाण वाढत असून त्याचा धोकाही…

7 तास ago

बाह्य राजकीय हस्तक्षेपाला आळा; पारदर्शक निवडणुकांसाठी तज्ज्ञ समिती गठित

मुंबई: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ आणि विद्यार्थी परिषद निवडणुकांसाठी लागू असलेल्या एकरूप परिनियमांच्या अनुषंगाने विद्यार्थी…

21 तास ago

तृणमूलच्या पक्षचिन्ह वादात शिवसेना प्रकरणाचा दाखला; सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला ‘विलंबा’वरून सवाल

नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसमधील पक्षचिन्हाच्या वादावर गुरुवारी सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान शिवसेना पक्षातील वादाचा…

21 तास ago

दिशा सालियान प्रकरणावर सूरज पांचोलीची मोठी पोस्ट; म्हणाला…

मुंबई : दिवंगत सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियान प्रकरणावर अभिनेता सूरज पांचोलीने सोशल मीडियावर सविस्तर पोस्ट…

21 तास ago