दुधीची भाजी सगळ्यांनाच आवडते, असं नाही. काही जण भाजी पाहिल्यानंतरच खाण्यास नकार देतात. पण, जर दुधीचा हलवा बनवला, तर मात्र ते अगदी आवडीने खातात. पण, ही भाजी एकंदरीतच आरोग्यदृष्ट्या भरपूर फायदेशीर असते. पण, ही भाजी खरेदी करताना कोणत्या गोष्टी बघून घेतल्या पाहिजेत, तसेच भाजी बनविताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.
दुधीमध्ये पाण्याचे प्रमाण सर्वाधिक असते, जे हायड्रेशन आणि भूक नियंत्रित करण्यास मदत करू शकते. त्यात फायटोकेमिकल्स आणि दाहकविरोधी गुणधर्म असतात, जे शरीरात निर्माण होणारा ताण कमी करण्यास मदत करतात. ही कृती हृदयाचे आरोग्य राखण्यास मदत करते. त्यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब व हृदयरोग असलेल्या व्यक्तींसाठी दुधीची भाजी खाणे भरपूर फायदेशीर ठरू शकते.
दुधीची भाजी पोटॅशियम, लोह, कॅल्शियम आणि जीवनसत्त्वे बी कॉम्प्लेक्स व सीसारख्या आवश्यक पोषक घटकांचा समृद्ध स्रोत आहे. कमी चरबीयुक्त पदार्थ आणि उच्च आहारातील तंतुमय गुणधर्मासह दुधी हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. कारण- दुधी रक्तदाब नियंत्रित करते आणि ताण व कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते. त्याचबरोबर अपचन, अल्सर, तणाव आणि नैराश्याला प्रतिबंधित आणि नियंत्रित करण्यास मदत करते. कारण- ते शरीरात मुक्त आम्ल रॅडिकल्सची निर्मिती कमी करतात; ज्यामुळे इन्सुलिन संवेदनशीलता व्यवस्थापित करण्यास मदत होते. पण, भाजी खाल्यानंतर हे सगळे आरोग्य फायदे तुम्हाला तेव्हाच मिळतील जेव्हा तुम्ही भेसळमुक्त दुधी खरेदी कराल.
१) आकार आणि पोत
मार्केटमधून दुधी खरेदी करताना तो आकारापेक्षा मोठा, ज्याचा रंग हलका हिरवा असेल आणि त्याची पोत कडक असेल असाच दुधी निवडा. ज्या भोपळ्यावर ओरखडे, हलके डाग आहेत, असा दुधी खरेदी करू नका. असा दुधी खराब किंवा त्यावर रासायनिक प्रक्रिया केलेल्याची ती चिन्हे असू शकतात.
२) सुगंध
ताज्या दुधीचा सुगंध मातीसारखा आणि सौम्य असतो. जर तुम्हाला दुधी खरेदी करताना विचित्र किंवा तीव्र रसायनाचा वास येत असेल, तर तो अजिबात खरेदी करू नका.
3) सेंद्रिय सर्टिफिकेट
जेव्हा शक्य असेल तेव्हा सेंद्रिय दुधी वापरा. सेंद्रिय उत्पादनांमध्ये कृत्रिम खते, कीटकनाशके किंवा इतर रसायनांचा वापर केला जात नाही. अशी उत्पादने खराब असण्याची शक्यता कमी असते. स्थानिक शेतकरी किंवा जे प्रसिद्ध दुकानदारांकडील उत्पादनांच्या बाबतीत सुरक्षितता, गुणवत्तेबाबत खात्री असेल, त्यांच्याकडून दुधी खरेदी करा. सेंद्रिय शेती पद्धतींना पाठिंबा दिल्याने शाश्वत आणि आरोग्यदायी अन्न वापरण्यासदेखील प्रोत्साहन मिळते.
दुधीची साल काढावी की नाही
दुधीची साल मध्यम जाड असते, जी आतील मांसाचे रक्षण करते. बंगळुरू येथील एस्टर सीएमआय हॉस्पिटलमधील सेवा, क्लिनिकल न्यूट्रिशन व डायटेटिक्सच्या प्रमुख एडविना राज म्हणाल्या की, कीटकनाशकांचे अवशेष आणि सालीचा पोत यांबद्दलची चिंता वैध आहे. त्यामुळे भाजी पाण्याखाली धुणे, साल हलक्या हाताने साल काढणे आणि शक्य असेल तेव्हा सेंद्रिय उत्पादनांचा वापर करणे या बाबी तुम्हाला खूप मदत करू शकतात.
पण, शक्य असल्यास दुधीची साल पूर्णपणे काढून टाकू नका. कारण- दुधीच्या सालीमध्ये मुबलक प्रमाणात तंतुमय गुणधर्म असतात, जे पचनास मदत करतात आणि पोट भरलं आहे, अशी भावना देऊन वजन नियंत्रणात राहण्यास मदत करतात. त्यात अँटीऑक्सिडंट्स आणि आवश्यक जीवनसत्त्वेदेखील असतात; ज्यामुळे एकूण आरोग्य वाढण्यास मदत होते. दुधीच्या भाजीत पॉलीफेनॉल आणि फ्लेव्होनॉइड्सदेखील असतात; जे ऑक्सिडेटिव्ह तणाव, जळजळ कमी करण्यास मदत करतात.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…
मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…
नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…
इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…
मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…
नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…