आरोग्य

किडनी स्टोन आणि घरगुती उपाय

किडनी स्टोनच्या उपचारासाठी अनेक प्रकारची औषधे बाजारात आहेत. त्यासोबतच ऑपरेशन करुनही यापासून सुटका मिळवली जाऊ शकते. मात्र, काही घरगुती उपायांनीही किडनी स्टोन पासून आराम मिळवू शकतो.

1) तुळशीच्या पानांचा रस

तुळशीत एसिटिक अ‍ॅसिड असतं, जे किडनीतील स्टोन तोडण्यासाठी आणि वेदना कमी करण्यासाठी मदत करतं. तुळस आरोग्यासाठी फायदेशीर असते. तुळशीच्या रसात अ‍ॅंटी- ऑक्सिडेंट आणि अ‍ॅंटी- इन्फ्लेमेटरी तत्व असतात, ज्यामुळे किडनी निरोगी ठेवण्यास मदत मिळते.

२) लिंबाचा रस, ऑलिव्ह ऑइल

वर्षानुवर्षे लिंबूचा रस आणि ऑलिव्ह ऑईल मिश्रित करुन गॉलब्लेडरच्या स्टोनसाठी सेवन केलं जातं. पण हा उपाय किडनी स्टोनसाठीही फायदेशीर आहे. लिंबाच्या रसात असलेलं सॅट्रिक अ‍ॅसिड मध्ये कॅल्शिअम बेस असलेल्या स्टोनला तोडण्याची क्षमता असते आणि पुन्हा स्टोन तयार होऊ देत नाही. हे मिश्रण तयार करण्यासाठी लिंबाचा रस आणि ऑलिव्ह ऑईल समान प्रमाणात मिश्रित करा आणि दिवसातून तीन वेळा याचे सेवन करा.

३) डाळिंब

डाळिंबाचा रस आणि बीयांमध्ये अ‍ॅस्ट्रीजेंट गुण असतात. जे किडनी स्टोनवर उपचारासाठी फायदेशीर असतात. जर किडनी मध्ये स्टोन असेल तर रोज एक डाळिंब खावं किंवा त्याचा रस फायदेशीर होऊ शकतो. यासोबतच डाळिंबाला फ्रूट सॅलड मध्येही मिश्रित करुन खाऊ शकता.

४) कलिंगड

मॅग्नेशिअम, फॉस्फेट्स, कार्बोनेट आणि कॅल्शिअम पासून तयार झालेल्या किडनी स्टोनच्या उपचारासाठी कलिंगड उपयुक्त आहे. कलिंगड मध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशिअम असतं, जे किडनीसाठी उपयुक्त आहे. पोटॅशिअम लघवीतील अ‍ॅसिड लेव्हल नियंत्रीत ठेवण्यासाठी मदत करतं. या सोबतच कलिंगड मध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असतं, यामुळे स्टोन नैसर्गिक पद्धतीने शरीरा बाहेर काढला जाऊ शकतो.

५) राजमा

राजमात अधिक प्रमाणात फायबर असतं. राजमा हा किडनी बिन्स नावानेही ओळखला जातो. राजमा किडनी आणि ब्लेडरशी संबंधीत वेगवेगळ्या आजारावर उपाचारासाठी फायदेशीर आहे. ज्या पाण्यात राजमा भिजवून ठेवला असेल ते पाणी प्यायल्यासही फायदा होतो.

6) ओव्याचं पाणी

ओव्याचं पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतं. याने किडनी स्टोनची समस्या दूर करण्यास मदत मिळते. एक किंवा दोन चमचे ओवा एक किंवा दोन ग्लास पाण्या सोबत ब्लेंड करा आणि दिवसभर याचं थोडं थोडं सेवन करा.

७) व्हीटग्रास ज्यूस

व्हीटग्रास मध्ये अनेक पोषक तत्व असतात आणि आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी यातून अनेक फायदे मिळतात. याने लघवीचा प्रवाह वाढतो. यात अनेक महत्वाचे पोषक तत्व असतात जे किडनी साफ करण्याचं काम करतात. दररोज १ ग्लास व्हीटग्रास ज्यूस पिऊ शकता.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पत्रकार सन्मान योजना बंद नको; जाचक नियम हटवा, पात्र पत्रकारांना न्याय द्या!

राजन पारकर यांची भूमिका; ज्येष्ठ पत्रकारांचा आधार काढून घेण्याऐवजी योजनेतील त्रुटी दूर करण्याची मागणी सध्या…

8 तास ago

१८ लाख उमेदवारांच्या स्वप्नांना मिळणार आधार; ‘मिशन खाकी’चा शुभारंभ

मुंबई : पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील हजारो युवक-युवतींना मार्गदर्शन…

8 तास ago

सामान्य कार्यकर्त्यापासून सत्ताकेंद्रापर्यंत; एकनाथ शिंदे यांच्या राजकीय प्रवासाचा वेध

संघर्ष, संघटन आणि जनसंपर्काच्या बळावर राजकीय वाटचाल; नगरसेवक ते उपमुख्यमंत्री असा प्रवास मुंबई : महाराष्ट्राच्या…

8 तास ago

काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा धडाका; बीडसह खान्देशातील नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा सिलसिला सलग दुसऱ्या दिवशीही सुरू राहिला. काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद…

9 तास ago

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर मीनाक्षी शिंदेंचा पलटवार

ठाणे: प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येशी माझा आणि माझ्या कुटुंबाचा कोणताही संबंध नाही. केवळ शिवसेना मुख्य नेते…

9 तास ago

ग्रामसभेत युवकाने प्रश्न विचारल्यावर माजी सरपंच संतापले अन् थेट भिडले…

जळगाव : जळगावच्या पाचोरा तालुक्यातील जारगाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत धूर फवारणी यंत्राच्या मुद्द्यावरून वाद झाला. यावेळी…

19 तास ago