आरोग्य

जीऱ्याचे पाणी पिण्याचे फायदे काय आहेत जाणून घ्या…

जीरा पाणी हे काही सामान्य पाणी नाही हे एक प्रकारचे औषधी आहे. यामुळे आरोग्याला अनेक लाभ मिळतात. जीरा पाणी बहुतेक वेळा वजन कमी करण्यासाठी वापरले जाते. त्याच सोबत याचे अनेक आरोग्य विषयक फायदे आहेत. प्रत्येक घरामध्ये स्वयपाक घरामध्ये जीरा वापरतात. जीरा टाकून केलेले पदार्थ जास्त स्वादिष्ट बनतात. जीरे पदार्थात आवश्य वापरले पाहिजे कारण यामुळे पाचनतंत्र सुधारण्यास मदत मिळते.

जीरे सुगंधी असते आणि याची चव देखील वेगळीच असते. जिरे पाणी पिण्यामुळे वजन कमी होते त्याच सोबत अनेक फायदे मिळतात. चला पाहू जीरा पाणी पिण्याचे कोणकोणते फायदे आहेत.

1. बद्धकोष्ठता

जीऱ्याचे पाणी पोटाच्या संबंधित कोणतेही आजार दूर करण्यासाठी मदत करतात. सकाळी उठल्यानंतर एक ग्लास जीरा पाणी पिण्यामुळे अपचन आणि पोटाच्या संबंधित आजारामध्ये आराम मिळतो. असे मानले जाते कि जीरा आपल्या पाचन तंत्राला बुस्ट करतो. आणि पचन संबंधित समस्या दूर करतो.

2. वजन कमी करतो 

जीऱ्यामध्ये असलेल्या एंटीऑक्सीडेंट आणि पोषक तत्व चयापचय वाढवते. जीरा आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी बाहेर काढते. ज्यामुळे शरीरातून चरबी कमी होते.

3. हार्ट अटैकचा धोका कमी करतो

जीरा पाणी शरीरातील फैट आणि कोलेस्ट्रोल कमी करण्यास मदत करतो. कोलेस्ट्रोलची कमी हार्ट अटैकचा धोका कमी करण्यास मदत होते.

4. मासपेशीच्या वेदना पासून आराम 

जीरा पाणी शरीरातील रक्त संचार वाढवतो. यामुळे मासपेशीच्या वेदना कमी होतात. आणि शरीर थकण्या पासून वाचवतो.

5. इम्यूनिटी सिस्टम मजबूत करतो

रोग प्रतिकारकशक्ती मजबूत असेल तरच आजारा पासून बचाव होतो. जीऱ्याच्या पाण्यामध्ये आयर्न भरपूर प्रमाणात असते. आयर्न आपली रोग प्रतिकारकशक्ती मजबूत करते. याच सोबत जीऱ्यामध्ये विटामिन ए आणि सी असते. यामुळे इम्युनिटी लेवल वाढते.

6. एनीमिया दूर करण्यास मदत करते 

रक्ताची कमी एनिमिया रोग असतो. याचा उपाय जीऱ्याच्या पाण्याने केला जाऊ शकतो. जीऱ्यामध्ये आयरन भरपूर असते ज्यामुळे हिमोग्लोबिन संतुलित ठेवण्यास मदत होते. यामुळे एनिमियाची समस्या देखील दूर होऊ शकते. जर शरीरामध्ये रक्ताची कमी असेल तर नियमितपणे जीऱ्याचे पाणी सेवन करावे.

7. झोपेची समस्या दूर करतो

झोपेची समस्या वजन वाढल्यामुळे होते. वजन वाढल्यावर झोपेची समस्या होणे सामान्य आहे. जर तुम्हाला झोप न येण्याची समस्या होत असेल तर जीऱ्याचे पाणी सेवन केल्याने तुम्हाला फायदा होऊ शकतो

(सोशल मीडियावरुन साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

9 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

1 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

1 दिवस ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

1 दिवस ago