महाराष्ट्र

पर्यटकांच्या सेवेसाठी एसटीची शिवनेरी धावली

मंत्री प्रताप सरनाईक स्वतः स्वागतासाठी हजर

मुंबई: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीर परिसरात राज्यातील विविध भागातील पर्यटक खोळंबले होते. त्यांना विशेष विमानाने सुखरूपपणे मुंबईत आणून मुंबईहुन पुढील प्रवासासाठी वातानुकूलित शिवनेरी पाठवण्याचे नियोजन एसटी ने केले आहे. पर्यटकांना धीर देण्यासह संपूर्ण वाहतूक व्यवस्थेच्या देखरेखीसाठी परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक विमानतळावर उपस्थित होते.

गुरुवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास पर्यटकांचे विशेष विमान मुंबई विमानतळावर (टर्मिनल -1) येथे दाखल झाले. पहिल्या विमानामध्ये १७५ पर्यटक आणि दुसऱ्या विमानात ७७ पर्यटक आहेत. मुंबईहुन त्यांच्या मूळ गावी जाणाऱ्या पर्यटकांसाठी ८ शिवनेरी सज्ज ठेवण्यात आल्या होत्या.

उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनुसार अडकलेले २५२ पर्यटकांचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुंबई विमानतळावर स्वागत केले. पर्यटकांना धीर देत मुंबईहुन पुढील प्रवासासाठी त्यांनी माहिती दिली. प्रवासादरम्यान सर्व पर्यटकांची चहा नाश्त्याची आणि जेवणाची सोय करण्याच्या सूचना मंत्री सरनाईक यांनी संबंधितांना दिल्या एसटी महामंडळाने केलेल्या मदतीसाठी पर्यटकांनी धन्यवाद दिले.

‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ या ब्रीदवाक्याचे पालन एसटी महामंडळ सातत्याने करत आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रवासी वाहतूक विना अडथळा पूर्ण करण्याचे काम एसटी चालक वरिष्ठाच्या मार्गदर्शनाने सातत्याने करत आहेत. करोना काळात अडकलेल्या विद्यार्थ्यांना आणणे, अतितीव्र पावसामुळे रेल्वे वाहतूक खोळंबल्यानंतर शहरातून उपनगरात प्रवासी वाहतुकीची जबाबदारी महामंडळाने सुरक्षितपणे पूर्ण केली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अंग दुखण्याची कारणे

थंड हवा थेट अंगावर लागणे: एसी किंवा फॅनची हवा जर थेट तुमच्या शरीरावर येत असेल,…

6 तास ago

केस खूपच पातळ झाले-जराही वाढत नाही? हे ५ पदार्थ खा, विंचरताना कंटाळा येईल इतके वाढतील केस

केस नैसर्गिकरित्या काळे राहण्यासाठी आणि केस वाढवण्यासाठी खास डाएट फॉलो करणंही गरजेचं असतं. केसांना पोषण…

6 तास ago

शिक्षक दिनानिमित्त गुणवंत शिक्षकांचा सन्मान; विजय सावंत यांना लायन्स क्लब शिक्षक पुरस्कार

मुंबई : शिक्षक दिनानिमित्त अभ्युदय येथील शिवाजी विद्यालयात लायन्स क्लब ऑफ मीडटाऊनच्या वतीने मुंबईतील उपक्रमशील…

6 तास ago

गणेशभक्तांसाठी शिवसेनेची मोठी घोषणा; २९०० एसटी बसची मोफत व्यवस्था

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील आपल्या गावी जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर आणि आरामदायी व्हावा,…

6 तास ago

नगराध्यक्षांच्या स्वाक्षरीचा संभ्रम अखेर दूर; नमुना क्र. ६४ वर आता मुख्याधिकाऱ्यांचीच अंतिम सही

मुंबई : राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या आर्थिक व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या नमुना क्र. ६४ वर नगराध्यक्षांची…

6 तास ago

अपुऱ्या पावसाने शेतकरी संकटात; धीरज देशमुखांची सरकारकडे विशेष दुष्काळ पॅकेजची मागणी

लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…

20 तास ago