केसांच्या समस्या टाळण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं कढीपत्त्याचा वापर केला जातो. कढीपत्त्यात अनेक पोषक तत्व असतात. ज्यामुळे केसांच्या वाढीत मदत होते. कढीपत्त्यात व्हिटामीन सी, व्हिटामीन बी, प्रोटीन आणि एंटी ऑक्सिडेंट्स असतात. या पानांमुळे केसांना अनेक फायदे मिळतात. कढीपत्ता केसांना लावण्याच्या विविध पद्धतीही माहित करून घ्यायला हव्यात.
केस वाढवण्याासाठी कढीपत्त्याची चटणी कशी फायदेशीर ठरते याबाबत सांगितले आहे. खाण्यापिण्यात पोषक तत्वांची कमतरता असल्यास केस मोठ्या प्रमाणात गळू लागतात. कढीपत्त्याची चटणी तुम्ही खास पद्धतीनं बनवू शकता. ज्यामुळे शरीरालाही पोषण मिळेल.
केसांचे गळणं थांबवण्यासाठी कढीपत्त्याची चटणी कशी फायदेशीर ठरते
कढीपत्त्याच्या पानांमध्ये ए, बी, सी, ई व्हिटामीन्स असतात. यात एंटी ऑक्सिडेंट्स असतात. कढीपत्त्यातील व्हिटामीन सी, कोलाजन प्रोडक्शन वाढवते. ज्यामुळे केस सरळ राहण्यास मदत होते. कढीपत्त्यात एंटी इन्फ्लामेटरी गुणधर्म असतात. ज्यामुळे हेअर फॉलिकल्सचे डॅमेज रोखता येते. कढीपत्त्याच्या सेवनानं केसांमध्ये मॉईश्चर टिकून राहते. ज्यामुळे स्काल्पचा ड्रायनेस कमी होतो आणि नवीन केसांची वाढ होते.
कढीपत्त्याची चटणी बनवण्यासाठी तुम्हाला कढीपत्त्याची ४ ते ५ पानं घ्यावी लागतील. त्याव्यतिरिक्त २ चमचे तूप, एक चमचा चणा डाळ, अर्धा कप भाजलेले शेंगदाणे, ५ ते ६ लाल सुक्या मिरच्या, २ चमचे मोहोरीच दाणे, २ चमचे जीरं आणि गरजेनुसार मिठाची आवश्यकता असेल. ही चटणी करण्यासाठी सगळ्यात आधी कढईत तूप गरम करायला ठेवा. त्यानंतर त्यात कढीपत्ता कुरकुरीत होईपर्यंत शिजवून घ्या.
नंतर यात चण्याची डाळ घाला मग मोहोरीचे दाणे, मिरची घालून शिजवा. नंतर सर्व मसाले घालून तसंच कढीपत्त्याची पानं ब्लेडरमध्ये घालून पावडर बनवून घ्या. आहारतज्ज्ञ सांगतात की जेव्हा तुम्ही ही चटणी खाल तेव्हा दह्यात मिसळून खाऊ शकता. केसांबरोबरच आरोग्यालाही याचे फायदे मिळतात. ही चटणी खाल्ल्यानं केस गळण्याची समस्या टाळण्यास मदत होते.
(सोशल मीडियावरून साभार)
नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला आणि मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा जोरदार पलटवार मुंबई: नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून…
ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील महाविद्यालयांना आर्थिक पाठबळ, शुल्कवाढ, मान्यता व कर्मचारी धोरणासह विविध मागण्यांवर…
शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत…
मुंबई: लोकप्रिय मालिका 'कमळी' मध्ये प्रेक्षकांना लवकरच भावनिक आणि नाट्यमय वळण पाहायला मिळणार आहे. कमळीची…
आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शिक्षणातील जागा वाढविणे आणि आरक्षण धोरणाचे वस्तुनिष्ठ पुनरावलोकन करण्यावर भर मुंबई:…
खड्डे, चिखल आणि वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त; काम तातडीने पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी पाबळ (सुनिल…