आरोग्य

चहा करताना ‘ही’ छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच

प्रत्येक घरात चहा बनवण्याची स्वतःची एक वेगळी पद्धत असते. काही जणांना कोरा चहा, काहींना दुधाचा चहा तर काहींना मसाला चहा आवडतो. पण चहा बनवताना लोक अनेकदा चूक करतात, ज्यामुळे चहा आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरतो. न्यूट्रीशनिस्ट लिमा महाजन यांनी एका व्हिडीओ पोस्टद्वारे लोकांच्या एका चुकीमुळे चहा विषात कसा बदलतो हे सांगितलं आहे. लिमा यांनी चहा बनवण्याची योग्य पद्धत देखील सांगितली आहे.

तुम्ही ज्या पद्धतीने चहा बनवत आहात त्याचा थेट परिणाम तुमच्या पचनावर, उर्जेच्या पातळीवर आणि पोषक तत्वांच्या शोषणावर होतो. बहुतेक लोक चहा जास्त उकळण्याची किंवा वारंवार उकळण्याची चूक करतात. चहा वारंवार उकळल्याने जास्त टॅनिन बाहेर पडतं. टॅनिनचे आरोग्यासाठी फायदे आहेत, परंतु जास्त प्रमाणात टॅनिन तुमच्या आतड्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकतं. यामुळे गॅस आणि पोटफुगीसारख्या समस्या उद्भवू शकतात. तसेच जास्त टॅनिन दातांच्या आरोग्यासाठी, लिव्हरच्या आरोग्यासाठी, हृदयाच्या आरोग्यासाठी आणि किडनीच्या आरोग्यासाठी देखील चांगलं नाही.

चहा बनवण्याची योग्य पद्धत कोणती

चहा हे एक आरोग्यदायी पेय असू शकतं, जर ते योग्य पद्धतीने बनवलं गेलं तर. यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात उकळण्यासाठी पाणी ठेवा. त्यात बडीशेप, दालचिनी आणि लवंगा यासारख्या काही औषधी वनस्पती घाला आणि सुमारे ३ ते ४ मिनिटे उकळवा. आता एका कपमध्ये चहा पावडर घाला. त्यावर हे मसाल्यांचं गरम पाणी टाका. एक मिनिट ते झाकून ठेवा. यानंतर तुम्हाला दूध वेगळं उकळावं लागेल आणि तुमच्या आवडीनुसार या चहामध्ये घालावं लागेल. आता चहा थोडा वेळ झाकून ठेवावा जेणेकरून चव चांगली होईल. त्यानंतर गाळून घ्या आणि चहाचा आनंद घ्या.

अनेकांना चहा पुन्हा पुन्हा गरम करण्याची सवय असते. ही सवय तुमच्या चहाला विष बनवत आहे. यामुळे चहातील अँटीऑक्सिडंट्स नष्ट होतात आणि त्याचा लिव्हरवरही अत्यंत वाईट परिणाम होतो. म्हणूनएका वेळी जितका चहा प्यायचा असेल तितकाच चहा बनवा. चहा गरम असतानाच प्या. सतत चहा गरम करू नका.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

दररोज सकाळी हळदी शॉट्स प्या, रोगप्रतिकारकशक्तीसह मेंदूचे आरोग्य होईल निरोगी

निरोगी आरोग्यासाठी तुमच्या आहारामध्ये पोषक तत्वांचा समावेश करणे गरजेचे असते. तुमच्या आहारामध्ये फायबर, हेल्दी फॅट्स,…

3 तास ago

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राष्ट्रवादीच्या आमदारांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीत!

सुनेत्रा अजित पवार यांच्या पुढाकारातून आमदारांचा स्तुत्य निर्णय; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वेतनाचे धनादेश सुपूर्द…

3 तास ago

गोकुळच्या कारभारात दूध उत्पादकांचे हित केंद्रस्थानी ठेवा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे नवनिर्वाचित चेअरमन राजेश पाटील यांना आवाहन

मुंबई : राज्यभर चर्चेत असलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या नवनिर्वाचित संचालक…

3 तास ago

नेहरू जयंतीनिमित्त काँग्रेसच्या कविता स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; रामबंधु अढांगळे प्रथम क्रमांकाचे मानकरी

मुंबई: स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त आणि दीपावलीच्या मंगल पर्वाचे औचित्य…

18 तास ago

महाराष्ट्रातील ११ अभ्यासक्रमांसाठी दोन वेळा सीईटीची संधी

जानेवारीपासून परीक्षांना सुरुवात; पीजीडीएम, पीजीसीएम आणि जीएनएमसाठी प्रथमच सीईटी मुंबई: महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा…

18 तास ago

दुष्काळात एकही पात्र कुटुंब रोजगारापासून वंचित राहू नये; भरत गोगावले यांचे निर्देश

रोहयो आणि ‘व्हीबी जी राम जी’च्या कामांना गती द्या; जलसंधारण, चारा उपलब्धता आणि प्रलंबित देयकांवर…

18 तास ago