आरोग्य

जेवणाची सुरुवात कशी करावी

प्रत्येकाची सवय असते की जेवण झाले की काही गोड धोड खाण्याची. हे फार आधीच्या काळापासून चालत आले आहे.

हिंदू शास्त्रात आणि आयुर्वेदात देखील हे आढळून येते. गोड खाण्याविषयी सर्वांनाच त्याचे गुण ठाऊक आहे

पण जेवणाच्या आधी तिखट पदार्थ का खातात हे देखील जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

तिखट पदार्थ खाण्याचे फायदे 

१) जेवण्यात तिखट पदार्थ आधी खाल्ल्यामुळे आपले पचन तंत्र क्रियाशील होतात.

२) संशोधकांनी सांगितल्यानुसार ज्या वेळी आपण तिखट पदार्थ खातो त्यावेळी आपल्या शरीरातून पाचक रस आणि आम्ल तयार होतात जे आपल्या अन्नाचे व्यवस्थितरीत्या पचन करण्यास मदत करतात. यावरून समजते की आपली पचनशक्ती कशी आहे.

३) आयुर्वेदामध्ये सांगितले आहे की जेवणाच्या सुरुवातीला तिखट अन्न खाल्ल्याने पोटामधील पचन तत्त्व आणि आम्ल क्रियाशील होतात, जेणे करून पचन तंत्र सुरळीत काम करतो.

४) जेवणाच्या सुरुवातीस आपण तिखट पदार्थ खाल्ल्याने जठर प्रसरण पावतो आणि भूक वाढते.

आता जाणून घ्या गोड पदार्थांचे सेवन केल्याचे फायदे

१) गोड पदार्थांमध्ये कार्बोहायड्रेट आढळतं. कार्बोहायड्रेट आपल्या पचनाची प्रक्रियेस मंदावते. ह्या साठी जेवण्याचा नंतर गोड खाल्ल्याने पचनाची प्रक्रिया सुरळीत चालते.

२) गोड खाल्ल्याने सेरोटॉनिन हार्मोन्सची पातळी वाढते. हे एक न्यूरोट्रान्समीटरचे काम करते. ज्यामुळे आपल्याला गोड खाल्ल्यावर आपल्याला आनंद मिळते. खरं तर गोड खाल्ल्याने एमिनो ऍसिड ट्रिप्टोफेन शोषणाची क्रिया वाढवते. ट्रिप्टोफेन ला सेरोटॉनिनची पातळी वाढविण्यासाठी ओळखले जाते. सेरोटॉनिन एक न्यूरो ट्रान्समीटर म्हणून काम करत असते. ह्याचे कार्य आपल्याला आनंद मिळवून देणे आहे. म्हणून तर गोड खाऊन आपल्याला आनंद होतो.

३) कधी कधी आपण काहीवेळा जास्त जेवून घेतो अश्या स्थितीमध्ये आपल्याला हायपोग्लायसिमीयाच्या स्थिती मधून जावे लागते. या परिस्थितीत रक्त दाब (ब्लड प्रेशर) कमी होते. अश्या वेळेस जेवण्यानंतर गोड खाण्यास सांगितले जाते.

४) आयुर्वेदामध्ये सांगितले आहे की जेवणानंतर गोड खाल्ल्याने आम्ल तयार होत नाही त्यामुळे पोटात जळजळ होत नाही.

चेतावणी

गोड मध्ये आपल्याला साखरेचे सेवन करणे टाळले पाहिजेत. साखर आरोग्यास दुष्प्रभावी असते. साखर किंवा त्यापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन करणे टाळले पाहिजे नाही तर जाडी वाढल्या बरोबरच अजून आजारांना सामोरी जावे लागेल. आपल्याला ऑरगॅनिक गूळ खाण्यात वापरले पाहिजे. किंवा या पासून बनवलेल्या वस्तूंचा वापर करावा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूरचा शेतकरी दुष्काळात होरपळतोय; लोकप्रतिनिधी वाढदिवसाच्या जल्लोषात; फ्लेक्स, बॅनर अन् वाढदिवसाच्या उधळपट्टीवर शेतकऱ्यांचा संताप…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यावर दुष्काळाचे ढग दाटले आहेत. खरीप हंगामाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला…

13 तास ago

शिरूर गोळ्यांच्या आवाजाने हादरतोय; पाच घटनांमध्ये तिघांचा मृत्यू, एकाचा गंभीर मारहाणीत बळी…

शिरूर (तेजस फडके) : शांत, शेतीप्रधान तालुका म्हणून ओळख असलेल्या शिरूर तालुक्याची ओळख आता गुन्हेगारीच्या…

16 तास ago

शिरूर तालुक्यातील दोन हवालदारांवर एसीबीची कारवाई; एकाने घेतली लाच तर दुसरा झाला पसार…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिस ठाण्याअंतर्गत टाकळी हाजी पोलिस हवालदारांनी लाच मागितल्याच्या दोन स्वतंत्र प्रकरणांवर…

16 तास ago

शिरूर तालुक्यात भरधाव कारच्या धडकेत एकाचा मृत्यू; एक जखमी…

मलठण (सुनिल जिते) : शिरूर तालुक्यातील मलठण-कवठेयमाई अष्टविनायक मार्गावरील मुंजाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ भरधाव…

1 दिवस ago

‘भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचाच मेंदू चोरीला गेला’; नाना पटोलेंचा फडणवीसांवर घणाघाती पलटवार

ज्ञानेशकुमार-भाजपाची अभद्र युती; ‘मतचोरी’विरोधातील लढाई सुरूच राहणार असल्याचा काँग्रेसचा इशारा मुंबई: निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असली…

2 दिवस ago

मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी १२ ऑक्टोबरची मुदत अपुरी; आणखी दोन महिने वाढवा

मुंबई: राज्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील नावांसंदर्भात दावे व हरकती…

2 दिवस ago