आरोग्य

वांग खाण्याचे औषधी गुणधर्म

१) वांग्याचे भरीत: वांग हे चांगलं धुऊन घ्यावे. चुलीवर किंवा गॅस वर चांगले भाजावे. वरची जळलेली साल काढून टाकावी. मग त्या मग ज्यामध्ये मिरपूड, हिंग, सैंधव टाकून चांगले घोटावे व ज्वारीच्या भाकरीबरोबर खावे, भरिता मध्ये तेल कधीही टाकू नये, टाकले तर पचायला खूपच जड होते. अन्नाचे त्यांनी चांगले पचन होते, भूकही छान लागते. भरतासाठी डोरलं वांग भेटल्यास एकदम उत्तम. माझ्याकडे येणाऱ्या दोन प्रकारच्या रुग्णांना मी भरीत खायला सांगतो. ज्यांना झोप लागत नाही ,त्यांनीही रात्री खावे, तसेच बऱ्याच जणांची सारखे पोट दुखत असते, पोट फुगले की मग हृदयावर दाब पडतो. मग कसतरी होतय, अस्वस्थ होत, अशी लक्षणे जाणवतात, त्यांना हा भरताचा प्रयोग छान लागू करतो ,मात्र यासाठी डोरलं वांग, जास दश मुळात ‘बहती’ असे म्हणतात ते भेटल्यास चांगल, “भाव प्रकाश’ नावाच्या ग्रंथात याचे खूप छान वर्णन केलेले आहेत, ग्रंथात सर्व गोष्टी सांगितलेले असतात, त्यासाठी ग्रंथाचे सतत वाचन गरजेचे असते.

2) ताप खोकला: तापामध्ये, ही भाजी जरूर खावी. काहीजण वांग्याच्या बिया काढूनही भाजी करतात, तापात तोंडी लावण्यासाठी ही भाजी उत्तम आहे. तोंडास चांगली रुची येते, शरीरातील क फ कमी होऊन, आम कमी होतो तापात ताजी वांगी वाफवून करावेत त्यात चवीसाठी सैंधव व आले टाकावं खूप छान भाजी होते. घरातील कुणी आजारी असल्यास, जरूर करून बघा. लाल तिखट हे टाकू नये. वाफवून भाजी केल्यास छान लागते. तांदूळ भाजून केलेला मऊ भात व वांग्याची भाजी, ताप खोकल्या मध्ये उत्तम आराम देणारी योजना आहे.

3) मुळव्याध: मूळव्याधीच्या लोकांना पांढरे वांगे खाण्याचा सल्ला देला जातो. व काहींना वांगी भाजून ते फडक्यात बांधून त्याने ही जागा शेकायला सांगीतली जाते. मात्र ते काळजीपूर्वक करावे.

4) झोप येण्यासाठी: झोप येण्यासाठी, वांगे खूपच फायदेशीर ठरते. वांग्यांच्या पानांचा रस दोन चमचे, खडीसाखरेसह घेतल्यास उत्तम झोप लागते .तसेच वांग्याचा वर सांगितल्याप्रमाणे भरीत खायला सांगतो, त्याने छान आराम पडतो.

5) वजनदार व्यक्तींसाठी: काही लोकांच् शरीर हे फुगते, त्यांच्यामध्ये मेद खूपच वाढलेला असतो, त्यांनी अजून मधून वांग्याची भाजी जरूर खावी. अशक्त माणसांनीही भाजी खाल्ली, तर थोड्या दिवसात शक्ती आल्या सारखे वाटेल, गाठीवरती वांगे भाजून लावण्याची काही ठिकाणी पद्धत आहे. अशक्तपणा वरती, वांग्याची भाजी ही खूपच चांगली आहे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मालवणीत दहीहंडी उत्सवाला गालबोट; ७ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई:💞 मालवणी परिसरात दहीहंडी उत्सवादरम्यान घडलेल्या दुर्दैवी घटनेत ७ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला. हंडी फोडताना विटांचा…

4 तास ago

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

18 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

18 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

18 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

18 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

18 तास ago