आरोग्य

सकाळी नाश्ता न करणं पडू शकतं महागात, जाणून घ्या होणारे गंभीर परिणाम

ब्रेकफास्ट म्हणजेच नाश्ता आपला दिवसातील सगळ्यात महत्वाचा आहार असतो. मात्र, काही लोक सकाळच्या नाश्त्यात इतकं महत्व देत नाहीत. पण त्यांना हे माहीत नसतं की, सकाळचा नाश्ता स्कीप करणं शरीरासाठी महागात पडू शकतं. तुम्हाला सुद्धा नाश्ता न करण्याची सवय असेल तुम्हाला आरोग्यासंबंधी अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

अमेरिकन रोग नियंत्रण केंद्राच्या आकडेवारीनुसार, २०२५ ते २०१८ पर्यंत २० वर्षापेक्षा अधिक वयोगटाच्या १५ टक्के लोकांनी नियमित रूपाने नाश्ता करणं सोडलं. सकाळची धावपळ, उपवास किंवा वजन कमी करण्याचा प्रयत्न यामुळे हे चलन वाढलं. तर काही लोकांना दिवसाची सुरूवात जेवणाने करायची नसते.

नाश्ता न करण्याचे नुकसान

सकाळचा नाश्ता न करणं भरपूर नकारात्मक प्रभाव टाकू शकतं. याने शरीरात तणाव निर्माण होतो, ज्यामुळे कार्टिसोल हार्मोन्स जास्त रिलीज होतात. याने पुढे जाऊन पोटावरील चरबी वाढते. नाश्ता न केल्याने लो ब्लड शुगरची समस्याही होते. कारण मेंदुला सकाळी खाण्याची गरज असते, जेव्हा ते मिळत नाही तेव्हा मेंदू स्पष्टपणे विचार करू शकत नाही. ग्लूकोजला मेंदुचं प्राथमिक ईंधन मानलं जातं.

नाश्ता करणं सोडल्याने मेंदुच्या आरोग्यावर नकारात्मक प्रभाव बघायला मिळतो. अभ्यासकांनी रिसर्चमध्ये सहभागी लोकांचे दोन ग्रुप केले. जेणेकरून नाश्ता सोडणाऱ्यांची तुलना नाश्ता करणाऱ्यांसोबत करता यावी. यात सहभागी लोकांचा एमआरआय करण्यात आला. ज्यात नाश्ता न करणाऱ्या लोकांचा मेंदू आकुंचन पावलेला दिसला. जो डिमेंशियाच्या लक्षणाचा भाग आहे. त्याशिवाय ब्लड टेस्ट करण्यात आली. त्यात काही न्यूरो डिजनरेशन बायोमार्करचा स्तर त्या लोकांमध्ये अधिक होता जे नाश्ता स्कीप करत नव्हते. अशात डिमेंशियापासून बचाव करण्यासाठी नाश्ता आवश्यक आहे.

सकाळचा नाश्ता स्कीप केल्याने व्यक्ती डिमेंशियाचा शिकार होऊ शकतो. डिमेंशिया मेंदुसंबंधी एक आजार आहे. यात मेंदुच्या कोशिकांचं नुकसान होतं आणि समजण्या-विचार करण्याची क्षमता कमी होते. डिमेंशियामध्ये स्मरणशक्ती, निर्णय घेण्याची क्षमता आणि शिकण्याची क्षमता प्रभावीत होते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

14 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

21 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

21 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

22 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

22 तास ago

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वसूल केलेली रक्कम परत द्या; चंद्रकांत पाटील

पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…

22 तास ago