आपल्या आहारातलं तेलाचं प्रमाण हा आता जवळपास सगळ्याच वयोगटातल्या लोकांसाठी एक अतिशय महत्त्वाचा विषय झाला आहे. कारण त्या तेलावरच तुमची तब्येत बऱ्याच प्रमाणात अवलंबून असते. त्यामुळेच आपण रोजच्या स्वयंपाकासाठी कोणतं तेल खावं, ते तेल खाण्याचे फायदे- तोटे कोणते, तेल किती प्रमाणात खावं, असे कित्येक प्रश्न सर्वसामान्यांना नेहमीच पडतात त्याच प्रश्नांची तज्ज्ञांनी दिलेली ही खास उत्तरं पाहा आणि तुमचं तुम्हीच ठरवा की तुमच्या तब्येतीनुसार तुमच्यासाठी कोणतं तेल खाणं जास्त फायदेशीर ठरू शकतं.
रोजच्या स्वयंपाकासाठी कोणतं तेल जास्त चांगल
1) शेंगदाणा तेल
शेंगदाण्याचं तेल हे वातशामक असतं. सांधेदुखी कमी करण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी तसेच त्वचेसाठी हे तेल चांगले असते. या तेलाचा स्मोकिंग पॉईंट जास्त आहे. त्यामुळे फोडणी देऊन केल्या जाणाऱ्या पदार्थांसाठी तसेच डिप फ्राय करण्यासाठी हे तेल वापरणं जास्त चांगलं. या तेलामध्ये गुड फॅट्स असतात. त्यामुळे ते जर योग्य प्रमाणात खाल्लं तर त्यामुळे कोलेस्टेरॉल वाढत नाही. रोजच्या वापरासाठी डॉक्टरांनी हे तेल उत्तम असल्याचं सांगितलं आहे.
२) खोबरेल तेल
हे तेल थंड आणि पित्तशामक असतं. या तेलाचा स्मोकिंग पॉईंट कमी असतो. त्यामुळे तळण्यासाठी किंवा फोडणीसाठी ते वापरू नये. सॉटिंगसाठी ते वापरू शकता. शिवाय या तेलामध्ये बॅड फॅट्स असतात. त्यामुळे जर तुम्ही ते जास्त प्रमाणात खात असाल तर त्यामुळे कोलेस्टेरॉल वाढू शकतं.
३) सनफ्लॉवर ऑईल
सुर्यफुलाचं तेल हे वात वाढविणारं आणि रुक्ष मानलं जातं. हे तेल खूप जास्त प्रोसेस्ड असतं. त्यामुळे इतर तेलांच्या तुलनेत त्यातले पौष्टिक घटक कमी झालेले असतात. ५ पदार्थ रोज खा- त्वचेचं तारुण्य, सौंदर्य नेहमी वाढतच जाईल! फेशियल, क्लिनअपची गरजच नाही. त्यामुळे हे तेल रोजच्या स्वयंपाकासाठी वापरू नका. कधीतरी तळण्यासाठी हे तेल वापरलं तर चालते कारण त्याचा स्मोकिंग पॉईंट जास्त असतो. ओमेगा ६ फॅटी ॲसिड जास्त असतं. त्यामुळे ते जास्त प्रमाणात खाल्लं तर डायबिटीज, ट्रायग्लिसराईड, फुफ्फुसांचे आजार वाढू शकतात.
४) मोहरीचं तेल
मोहरीचं तेल उष्ण आणि कफ कमी करणारं असतं. या तेलामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि कोलेस्टेरॉल वाढत नाही. हिवाळ्यात हे तेल खाणे उत्तम आहे.
(सोशल मीडियावरून साभार)
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…
नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…