आरोग्य

एका जागी बसून काम केल्यानं वाढतेय शुगर, वजनवाढ आणि डायबिटिस टाळण्यासाठीं ४ उपाय

आजच्या डिजिटल युगात लोक तासंतास लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरसमोर बसून काम करतात. तासंतास एकाच जागी बसून काम करतात. काम करताना तर काही वाटत नाही, पण नंतर काही काळानं अनेक गंभीर आजारांचा धोका वाढतो. हृदयरोग एक्सपर्ट डॉ. जेरेमी लंदन यांनी इन्स्टाग्रामवर सांगितलं की, जास्त वेळ एकाच जागी बसून काम केल्यानं कोणत्या समस्या होतात. सोबतच या समस्यांपासून बचाव करण्यासाठी काय करावं हेही त्यांनी सांगितलं.

जास्त वेळ बसून काम करण्याचे नुकसान

कंबर आणि मानदुखी

सतत एकाच जागी बसून काम केल्यानं पाठ, मान आणि कंबरेच्या स्नायूंमध्ये तणाव वाढतो. त्यामुळे या अवयवांमध्ये वेदना होतात. तसेच चुकीच्या पोश्चरमध्ये बसले तर मणक्यामध्येही समस्या होतात.

टाइप २ डायबिटीस

जेव्हा आपण सतत एकाच जागी बसून तासंतास काम करतो तेव्हा आपलं शरीर इन्सुलिनचा व्यवस्थित वापर करू शकत नाही. यामुळे ब्लड शुगर लेव्हल वाढू शकते आणि टाइप २ डायबिटीसचा धोकाही अधिक वाढतो.

लठ्ठपणा वाढतो

दिवसभर जर शरीराची अजिबात हालचाल होत नसेल तर कॅलरी बर्न होत नाहीत. त्यामुळे शरीरात चरबी जमा होते. नंतर पुढे लठ्ठपणा वाढतो आणि वजनही वाढतं. एकदा जर लठ्ठपणा वाढला तर वेगवेगळ्या गंभीर आजारांचा धोकाही वाढतो.

हृदयरोग

जास्त वेळ बसून राहणं हृदयाच्या आरोग्यासाठी देखील नुकसानकारक ठरतं. शरीराची हालचाल केली नाही तर कोलेस्टेरॉल वाढतं, ब्लश प्रेशर वाढतं. नंतर हार्ट अ‍ॅटॅक आणि स्ट्रोकचा धोकाही वाढतो.

काय कराल

दर तासाला ब्रेक घ्या

ऑफिसमध्ये काम करत असताना दर ३० मिनिटांनी किंवा ६० मिनिटांनी ब्रेक घ्या. २ ते ३ मिनिटांच्या या ब्रेकमध्ये थोडं चाला. शरीराची हालचाल करा. स्ट्रेचिंग करा. असं केल्यास आपल्याला फ्रेश वाटेल आणि वरील समस्याही टाळता येतील.

बाहेरचं खाणं टाळा

बरेच लोक ऑफिसमध्ये बाहेरचं जेवण मागवतात. एखाद्या वेळेस असं करणं ठीक आहे. पण जर नेहमीच असं करत असाल तर पुढे जाऊन मोठ्या समस्या होऊ शकतात. अशात रोज घरचं जेवणच केलं पाहिजे.

हायड्रेटेड रहा

ऑफिसमध्ये आपल्या डेस्कवर एक पाण्याची बॉटल न विसरता ठेवा. दिवसभर थोडं थोडं पाणी पित रहा. असं केल्यास शरीर हायड्रेट राहतं आणि थकवाही दूर होतो.

मेंदुला आराम द्या

कामाच्या मधे छोटे छोटे ब्रेक घेतल्यानं मेंदुला आराम मिळतो. मेंदू शांत होतो. बसल्या जागी छोट्या अ‍ॅक्टिविटी करा. यामुळे तणाव कमी होतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

23 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

23 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

23 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

23 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

23 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

23 तास ago