आरोग्य

पालक भाजीचे गुणधर्म

सर्व पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे. पालक ही भाजी आहारात जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच औषधी गुणधर्म असल्यामुळे आरोग्यदायीसुद्धा आहे. भारतामध्ये अगदी प्राचीन काळापासून पालकची लागवड केली जाते. पालकाची पाने ही फिकट हिरवी, टोकाकडे निमुळती, गुळगुळीत व पसरट अशी असतात. मराठीत पालक, इंग्रजीत स्पिनॅच तर शास्त्रीय भाषेमध्ये स्पिनासिया एॅलेरेकिया या नावाने ओळखली जाणारी पालक भाजी चेनोपोडिएसी या कुळातील वनस्पती आहे. पालकाचे देशी पालक आणि विलायती पालक असे दोन प्रकार पडतात. आपण सहसा देशी पालकच आहारामध्ये वापरतो. विलायती पालक हा प्रकार आशियामध्ये आढळतो.

औषधी गुणधर्म

पालकामध्ये लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस तसेच अमायनो अ‍ॅसिड, प्रथिने, खनिजे, आद्र्रता, तंतूमय व पिष्टमय पदार्थ, अ, ब व क जीवनसत्त्व, फॉलिक अ‍ॅसिड भरपूर प्रमाणात असते. आयुर्वेदानुसार पालक ही शितल, मूत्रल, सारक, वायुकारक, पचण्यास जड, पित्तशामक, रोचक व वेदनाहारी आहे. या सर्व गुणधर्मामुळे पालक ही भाजी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे व सर्व आजारांमध्ये पथ्यकर अशी भाजी आहे.

उपयोग

आरोग्य चांगले राखण्याच्या दृष्टीने शाकाहार करणाऱ्या व्यक्तींनी पालकाच्या भाजीचे नियमित सेवन करावे. कारण मटन, चिकन, अंडी, मासे, यांच्या मासांतून जेवढय़ा प्रमाणात प्रथिने मिळतात, अगदी तेवढय़ाच प्रमाणात पालकाच्या भाजीतून मिळतात. म्हणून मासांहर न घेणाऱ्यांसाठी पालक सेवन हे वरदानच आहे.

पालकाच्या भाजीत लोह व तांब्याचा (कॉपर) अंश असल्याने रक्ताल्पता (अ‍ॅनिमया) या आजारावर ही भाजी अत्यंत उपयुक्त आहे. हिच्यामध्ये रक्तवर्धक गुणधर्म असल्याने रक्तकण निर्माण होण्याची प्रक्रिया लगेच सुरू होते. तसेच पालक रक्त शुद्ध करतो व हांडाना मजबूत बनविण्याचे काम करतो. पालक, टोमॅटो, काकडी, कांदा यांचे सॅलड किंवा कोिशबीर बनवून त्यात थोडेसे िलबू पिळावे. िलबामध्ये असणाऱ्या क जीवनसत्त्वामुळे पालक भाजीमध्ये असणारे लोह संपूर्णपणे शरीरात शोषले जाण्याची प्रक्रिया होते. म्हणून सहसा पालक हा स्वच्छ धुऊन कच्च्या स्वरूपात खावा.

पालकामध्ये विपुल प्रमाणात फॉलिक अ‍ॅसिड असल्यामुळे गर्भवती स्त्रियांनी व मातांनी आहारामध्ये पालक नियमित वापरावा. पालकामध्ये असणाऱ्या फॉलिक अ‍ॅसिडमुळे गर्भाची वाढ चांगली होते व त्यामुळे गर्भपात टाळता येतो.

अनेक गर्भवती स्त्रियांमध्ये थकवा वाटणे, धाप लागणे, वजन कमी होणे, जुलाब लागणे ही लक्षणे जाणवतात. असे होऊ नये म्हणून गर्भवती स्त्रीने पोषक आहार म्हणून पालकाचा नियमितपणे वापर करावा.

अ जीवनसत्त्वाने परिपूर्ण अशी पालक भाजी खाल्ल्याने डोळ्यांच्या तक्रारी कमी होतात. तसेच रातांधळेपणा या विकारावर पालक हे एक उत्तम परिपूर्ण औषध आहे.

पालक ही भाजी जीवनशक्तीचे मूलस्रोत आहे. त्यामुळे एखाद्या स्तन्यपान देणाऱ्या मातेला पुरेसे दूध येत नसेल तर अशा वेळी बालकाच्या वाढीसाठी बाळ चार महिन्यांचे झाल्यानंतर पालक पानांचे सूप करून बाळाला पाजावे. यामुळे बाळाची वाढ चांगली होते.

पालकाच्या सेवनाने रक्तदाब नियंत्रणात राहतो.

अंगावर गाठ येऊन जर सूज आली असेल तर अशा वेळी पालक पानांचे पोटीस गरम करून त्याजागी बांधावे.

पालकामध्ये रक्तशोधक गुणधर्म असल्यामुळे यकृताचे विकार, कावीळ, पित्तविकार यामध्ये उपयुक्त आहे.

आतडय़ांची ताकद वाढविण्यासाठी व त्यांना क्रियाशील बनविण्यासाठी पालकाचा एक ग्लासभर रस अनुशापोटी नियमितपणे सेवन करावा याच्या सेवनाने आतडय़ांतील मलाचे निस्सारण होण्यास मदत होते व शौचास साफ होऊन पोट स्वच्छ राहते.

शहाळ्याच्या पाण्यातून ताजा पालक रस दिवसातून दोन वेळा १-१ कप घेतल्यास मूत्र प्रमाण वाढून मूत्रातील आम्लता कमी होते व त्यामुळे लघवीला जळजळ, थेंब थेंब लघवी होणे अशी लक्षणे नाहीशी होतात.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पिंपरी-चिंचवड पोलिसांना आधुनिक तंत्रज्ञानाचे बळ! ६५ नवीन वाहने, ४ ड्रोन अन् AI CCTV नेटवर्क

पिंपरी-चिंचवड : वाढत्या पिंपरी-चिंचवड शहराच्या सुरक्षिततेचा पाया अधिक मजबूत करण्यासाठी पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाला राज्य सरकारने…

15 तास ago

पदवीधर-शिक्षक मतदारसंघातील निकालांचे काँग्रेसकडून पोस्टमार्टम

थोरात, हंडोरे, नसीम खान यांच्यासह चौघांची समिती; तीन आठवड्यांत अहवाल सादर होणार मुंबई: नागपूर पदवीधर,…

17 तास ago

काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यासाठी प्रदेश नेतृत्व ॲक्शन मोडमध्ये

मुंबई: महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी प्रदेश नेतृत्वाने आता नियोजनबद्ध पावले उचलण्यास सुरुवात…

17 तास ago

शिरूर तालुक्यात सशस्त्र दरोडा; वृद्ध महिलेचे दागिने ओरबडल्याने रक्तबंबाळ…

शिरूर (अरुणकुमार मोटे): मलठण (ता. शिरूर) येथील मलठण-शिक्रापूर रस्त्यावरील एकनाथ दंडवते यांच्या घरावर रात्री सुमारे…

22 तास ago

झटपट रक्त वाढवण्याचे घरगुती उपाय

अनेक वेळा रक्ताच्या कमतरतेमुळे थकवा येणे, अशक्तपणा, त्वचा पिवळी पडणे, हात-पाय सुजणे इत्यादी एनिमियाचे लक्षण…

1 दिवस ago

फळ खाण्यापेक्षा फळांचा ज्यूस पिण्याचे फायदे

फळं खाण्यापेक्षा फळांचा रस पिणं हे जास्त आरोग्यदायी आहे. फळांचा रस घेतल्यानं वजन कमी होतं.…

1 दिवस ago