महाराष्ट्र

सक्षम ताटे प्रकरणाला नवा ट्विस्ट; आंचलच्या आरोपांवर कुटुंबीयांचा पलटवार

नांदेड : राज्यभर चर्चेत आलेल्या सक्षम ताटे हत्याकांड प्रकरणात आता नवा वाद निर्माण झाला आहे. प्रियकर सक्षम ताटेच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबासोबत राहण्याचा निर्णय घेतलेल्या आंचल मामीडवारने आता ते घर सोडल्याने पुन्हा एकदा हे प्रकरण चर्चेत आले आहे.

काही महिन्यांपूर्वी आंचल मामीडवारच्या प्रियकराचा, सक्षम ताटेचा, तिच्याच वडिलांनी आणि भावाने कथितरित्या खून केल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणात आंचलने आपल्या वडिलांना आणि भावाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. तसेच सक्षमच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांचा आधार बनून त्यांच्याच घरी राहण्याचा निर्णय घेतल्याने ती चर्चेत आली होती.

मात्र, आता आंचलने सक्षमचे घर सोडले असून ती आपल्या आजीसोबत राहत असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत बोलताना आंचलने सक्षमच्या लहान भावावर गंभीर आरोप केले आहेत. तिच्या म्हणण्यानुसार, सक्षमचा भाऊ तिच्याशी अयोग्य वर्तन करत होता तसेच अनेकदा चुकीचा स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होता. याबाबतची माहिती आपण कुटुंबीयांनाही दिली होती, मात्र त्यांनी विश्वास ठेवला नसल्याने घर सोडण्याचा निर्णय घेतल्याचा दावा आंचलने केला आहे.

दरम्यान, आंचलच्या आरोपांनंतर सक्षमच्या आईने आणि आत्याने तिच्या दाव्यांना फेटाळून लावत पलटवार केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी काही मोबाईल चॅट्स दाखवत सक्षमच्या भावाला बदनाम करू नये, अशी विनंती केली. “आता आमच्याकडे एकच मुलगा उरला आहे. त्याने कोणतेही चुकीचे कृत्य केलेले नाही. तो आंचलला नेहमी ‘वहिनी’ म्हणूनच संबोधत होता,” असा दावा कुटुंबीयांनी केला.

यावेळी कुटुंबीयांनी प्रसारमाध्यमांसमोर काही संदेशही सादर केले. या संदेशांमध्ये आंचल आणि सक्षमच्या भावामध्ये संवाद झाल्याचे दिसून येत असून, त्यावरून दोघांमध्ये नियमित संपर्क होता, असा दावा कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे.

सध्या या प्रकरणात दोन्ही बाजूंकडून परस्परविरोधी दावे केले जात असल्याने सत्य नेमके काय आहे, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. संबंधित आरोपांची अधिकृत चौकशी किंवा कायदेशीर प्रक्रिया झाल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

5 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

1 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

1 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

1 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

1 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

1 दिवस ago