आरोग्य

मुळ्याची पाने शरीरासाठी खूप गुणकारी

मुळ्याची पानं तर बहुतेक लोकं खातात, पण तुम्हांला माहिती नसेल कि मुळा भाजीची पानं खाल्ल्याने काय होते ते. तुमचा विश्वास बसणार नाही, परंतु मुळा भाजीच्या पानांत मुळ्यापेक्षा जास्त पोषक तत्वे असतात. त्यात असे भरपूर गुणधर्म आहेत, जे तुमचे आजार दूर पळवू शकतात. ते पोषण तत्वांनी परिपूर्ण आहार प्रधान करतात ज्यात लोह, कॅल्शिअम, फॉलिक ऍसिड, व्हिटॅमिन ‘सी’, आणि फॉस्फरस सारखे महत्वपूर्ण खनिजं आढळतात, जे आपल्या शरीरातील कार्यांसाठी आवश्यक आहेत.

मुळाच्या पानात असलेले लोह, शरीरातील थकवा दूर करण्यास मदत करतात. मुळाच्या पानात लोह, फॉस्फरस सारखे शरीराचे रोगांपासून रक्षण करणारी खनिजे असतात. ह्यामध्ये व्हिटॅमिन ‘सी’, व्हिटॅमिन ‘ए’, थायामीन सारखे इतर आवश्यक खनिज असतात, जे थकवा दूर करण्यास मदत करतात. एनिमिया आणि हिमोग्लोबिन चे कमी प्रमाण असलेल्या पेशंटला मुळाच्या पानांच्या सेवनाने फायदा होऊ शकतो. कारण पानांमध्ये असलेलं लोह त्यांचे आरोग्य चांगले करू शकतो.

मुळाच्या पानांत मुळाच्या तुलनेत जास्त फायबर असते. फायबरमुळे पचनक्रिया चांगली होते. मुळाच्या पानांच्या मदतीने बद्धकोष्टता आणि फुगलेले पोट (ऍसिडिटी) सारख्या अवेळी येणाऱ्या समस्यांवर अराम मिळेल.

मुळाच्या पानांचा रस हे नैसर्गिक मूत्रवर्धक आहे. हे स्टोन (मुतखडा) ला विरघळण्यास मदत करते तसेच मूत्राशय साफ करण्यास मदत करते. ह्याचे हे गुण मुळा मध्ये सुद्धा असतात. मुळाच्या पानांत मजबूत रेचक गुणधर्म असतात, जे बद्धकोष्ठता आणि स्टोन (मुतखडा) कमी करण्यास मदत करतात.

मुळाच्या पानांत रक्तशोधक गुणधर्म असतात. जे स्कर्व्ही ला रोखण्यास मदत करतात. ही आश्चर्याची गोष्ट आहे की, मुळाच्या पानांमध्ये मुळाच्या तुलने अधिक प्रमाणात व्हिटॅमिन ‘सी’ असतात आणि म्हणून मुळाच्या पानांमध्ये मुळा पेक्षा जास्त अँटी कॉर्ब्यूटिक गुणधर्म असतात.

मुळ्याच्या पानांना मूळव्याध सारख्या पीडादायक त्रासावर उपचार करण्यासाठी खूप फायदेशीर म्हटले जाते. जिवाणूविरोधी गुणधर्मामुळे मुळाची पाने सूज कमी करण्याचे काम करतात. मुळाच्या पानांना सुकवून त्याची पावडर तयार करा, ह्यानंतर बरोबर प्रमाणात साखर घ्या. साखर आणि पावडर पाण्यात मिसळून जाड पेस्ट बनवा. ह्या पेस्टला खाऊ शकता. अथवा सूज झालेल्या ठिकाणी लावू शकता.

मुळ्याच्या पानांपासून कावीळसारख्या आजाराचे उपचार होते. ह्या आजारात शरीर हायपरबिलारूबिनमिया (त्वचेचे पिवळे पडणे) ने पीडित होतो. मुळ्याच्या पानांना ह्या स्तिथीत ठीक करण्यासाठी विशेष मानले जाते. पानांना कुठून, छिद्रअसलेल्या कपड्यातुन अर्क काढून घ्या. कावीळचा इलाज करण्यासाठी हे दहा दिवस नियमित अर्धा लिटर सेवन करा. बहुतेक हर्बल औषधांच्या स्टॉकमध्ये मुळ्याच्या पानांचा रस असतो.

सांधेदुखी रोग हे जगातील सर्वात दुःखदायक आजारांपैकी एक आहे. ह्यात गुढघ्यावर दुखणे आणि भयानक सूज येते जे खूप प्रकारच्या असुविधा निर्माण करतात. मुळ्याच्या पानांना सारख्या प्रमाणात साखर घेऊन आणि त्यात पाणी मिसळून त्याची पेस्ट बनवून त्याचा वापर केला जाऊ शकतो. हे गुडघ्यावर लावू शकता. ह्या पेस्ट चा नियमित वापराने त्रास आणि सूज कमी करण्यास खूप मदत मिळेल.

मुळ्याच्या पानांत बरेच गुणधर्म असतात जे रक्तातील शर्करेचे प्रमाण कमी करण्यास मदत करतात. ह्याप्रकारे मुळ्याची पाने मधुमेहातील व्यक्तीला खाण्यासाठी देणाऱ्या पदार्थांमधील एक आहे. मुळ्याची पाने उच्च रक्त ग्लुकोज च्या पातळीला कमी करून मधुमेह होण्यापासून रोखतात.

मुळ्याच्या पानांत आवश्यक पोषण तत्व समाविष्ट असतात. ह्यात समाविष्ट असलेले पोषक तत्व आणि रोगविरोधी आणि जिवाणूविरोधी गुणधर्म शरीरातील विषयुक्त पदार्थ शरीरा बाहेर काढून टाकण्यास मदत करतात.

पानांमध्ये व्हिटॅमिन ‘सी’ भरपूर प्रमाणात असतात जे एक अँटीऑक्सीडेन्ट च्या रूपात कार्य करतात. आणि शरीरातील डीएनए पेशींना मुक्त कणांच्या हानिकारक प्रभावांना नियंत्रित करतात. ह्या रोपात उपस्थति फायटोकेमिकल्स आणि अँथोसायनिन कँसर संबंधी गुणांच्या विरोधी असतात आणि शरीराला पोट, मूत्रपिंड आणि आतड्यांच्या कँसरपासून वाचवतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

MPSC पेपरफुटीचा आरोप; तरुणांच्या भवितव्याशी खेळ थांबवा, अन्यथा भाजपाला महागात पडेल; हर्षवर्धन सपकाळ

टीईटी, नीटनंतर आता ड्रग इन्स्पेक्टर भरती परीक्षेची प्रश्नपत्रिका WhatsAppवर फिरल्याचा दावा; उद्योगबंदी आणि शालार्थ घोटाळ्यावरही…

6 मिनिटे ago

‘राजा प्रजेपर्यंत पोहोचला पाहिजे’; ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमातून सचिन अहिर यांचा संदेश

वरळीत 'छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर'चे उद्घाटन; ३९ विभागांच्या सहभागातून शेकडो नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ…

12 मिनिटे ago

MHT-CET कथित गैरप्रकारांची निष्पक्ष चौकशी करा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा; रोहित पवार

CET आयुक्त दिलीप सरदेसाई यांना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे निवेदन; विद्यार्थ्यांना न्यायाची मागणी मुंबई:…

20 मिनिटे ago

गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुतुल्य नेतृत्वाला विनम्र अभिवादन

मुंबई: भारतीय संस्कृतीत गुरूचे स्थान देवापेक्षाही श्रेष्ठ मानले गेले आहे. गुरुपौर्णिमा हा केवळ पूजनाचा उत्सव…

23 मिनिटे ago

एसटी प्रवासासाठी NCMC स्मार्ट कार्डची मुदत वाढली; आता १ सप्टेंबरपर्यंत मिळणार अतिरिक्त वेळ

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) विविध सवलत योजनांचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी (NCMC)…

27 मिनिटे ago

आनंदआश्रमात गुरुपौर्णिमेचा उत्साह; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शिवसैनिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव

ठाणे: ठाण्यातील टेंभी नाका येथील शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असलेल्या आनंदआश्रमात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी…

4 तास ago