आरोग्य

पोट साफ होण्यासाठी उपाय

सकाळी उठल्या उठल्या पोट साफ होणं ही नैसर्गिक गोष्ट आहे. पोट साफ झालं की फ्रेश वाटतं. शरीरातील अनावश्यक घटक शरीरा बाहेर टाकणं ही आरोग्य उत्तम राहण्यासाठी अतिशय महत्त्वाची क्रिया असते. पण सकाळी उठल्यावर पोट साफ झालं नाही की, दिवसभर अस्वस्थ आणि आळसावल्या सारखं होतं. बद्धकोष्ठता, पाणी कमी पिणे, आहाराच्या चुकीच्या पध्दती, ताणतणाव यांसारख्या गोष्टींमुळे पोट साफ होण्यात अडथळे येतात. मग कधी आपण घरगुती उपाय करतो, नाहीतर डॉक्टरांकडे जाऊन औषधे घेतो. पोट वेळच्या वेळी साफ होण्यासाठी कोणते उपाय करायचे याविषयी माहिती जाणून घेऊया.

१) दही आणि जवस: दह्यात प्रोबायोटीक घटक असतात, पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी हे घटक महत्त्वाचे असतात. त्यामुळे पोट साफ होत नसेल तर दह्याचा आहारात अवश्य समावेश करावा. तर जवसात सोल्यूबल फायबर असते जे पाण्यात विरघळते आणि विष्ठा मऊ करण्याचे काम करते. त्यामुळे जवसाची चटणी, लाडू या गोष्टींचाही आहारात समावेश असावा.

२) आवळा ज्यूस: ३० मिलीग्रॅम आवळ्याचा रस पाण्यात मिक्स करुन सकाळी उठल्यावर घेतल्यास, पोट साफ होण्यास चांगला उपयोग होतो.

३) दूध आणि तूप: तूप हे शरीरात वंगणा सारखे काम करते. त्यामुळे पोटात साठलेले अनावश्यक घटक शरीरातून बाहेर पडण्यास मदत होते. रात्री झोपताना कपभर गरम दुधात १ चमचा तूप घालून घेतल्यास, पोट साफ होण्यास मदत होते.

4) पालेभाज्या: पालक, ब्रोकोली किंवा इतर पालेभाज्यात फायबरचे प्रमाण जास्त असते. या भाज्यात फोलेट, व्हिटॅमिन-सी आणि के हे घटक योग्य प्रमाणात असतात. या घटकामुळे पचनक्रिया सुरळीत होते आणि पोट साफ होण्याची क्रिया सोपी होते. म्हणून आहारात पालेभाज्यांचा अवश्य समावेश करावा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एका मुलाखतीने बदलले आयुष्य; तांदळीतील आजोबांच्या मदतीला प्रशासन धावले

७५ वर्षीय केरबा खोरे यांच्या व्यथेला राज्यभरातून प्रतिसाद; तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व आमदार माउली कटके…

15 तास ago

शिरुर; शेतकरी गोवंश कायद्याच्या कचाट्यात; तांदळीत तीन महिन्यांत 8 ते 10 बेवारस वासरांना सोडले रस्त्यावर

शिरुर (तेजस फडके) गोवंश संरक्षणाच्या उद्देशाने लागू करण्यात आलेल्या 'महाराष्ट्र पशु संरक्षण' कायद्याचा हेतू जरी…

17 तास ago

चासकमान कालव्याची गळती ‘हेड’ला, अस्तरीकरण ‘टेल’ला… उलट्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…

1 दिवस ago

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

2 दिवस ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

2 दिवस ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

2 दिवस ago