आरोग्य

बद्धकोष्ठता आणि घरगुती उपाय

नियमित पोट साफ न होण्याची तक्रार अनेक लोकांना असते. अयोग्य आहार घेणे, बैठी जीवनशैली, व्यायाम न करणे, जेवणाच्या वेळा न पाळणे अशा विविध कारणांनी रोजच्या रोज शौचास होत नाही. ह्या त्रासाला बद्धकोष्ठता किंवा मलावष्टंभ असेही म्हणतात. बद्धकोष्ठता असल्यास पोट साफ न होणे, शौचास घट्ट होणे, शौचाचा खडा धरणे, शौच्यावेळी जास्त जोर द्यावा लागणे असे त्रास होत असतात. शौचाचा खडा धरत असल्याने मल बाहेर येताना गुदाच्या ठिकाणी जास्त ताण व त्रास होत असतो. त्यामुळे गुदाच्या ठिकाणी जखमा होणे, मूळव्याध होणे असे आजारही नियमित पोट साफ होत नसल्यास होऊ शकतात.

रोज पोट साफ न झाल्यास

शौचास होताना त्रास होणे.

कधी कधी खडा तयार होऊन शौचास जोर द्यावा लागणे, यामुळे मूळव्याध होणे.

पोट गच्च होणे, पोटात गॅस होणे, तोंडाचा उग्र वास येणे, डोके दुखणे, अस्वस्थता.

चिडचिड होणे, कंटाळा येणे.

पोट साफ न होण्याची कारणे

अयोग्य आहार घेणे हे बद्धकोष्ठता होण्याचे प्रमुख कारण आहे. अयोग्य आहार म्हणजे फास्टफूड, जंकफूड, बेकरी प्रोडक्ट, मैद्याचे पदार्थ, पचनास जड असणारे पदार्थ, मांसाहार. या पदार्थात फायबर्सचे प्रमाण खुपच कमी असते त्यामुळे बद्धकोष्ठता होत असते. याशिवाय पोटाचा व आतड्यांचा व्यायाम न झाल्यानेही बद्धकोष्ठता होत असते. विशेषतः बैठे काम व आरामदायी जीवनशैली असणाऱ्या व्यक्ती मध्ये व्यायामाच्या अभावामुळे पोट वेळच्या वेळी साफ होत नाही. तसेच कमी पाणी पिण्याची सवय असल्यामुळेही मल खड्या सारखे घट्ट बनून कॉन्स्टिपेशन होत असते.

पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय

एरंडेल तेल: एरंडेल तेल हे सारक गुणांचे असून बद्धकोष्ठतेवर उपयुक्त असते. त्यामुळे रोज सकाळी उपाशी पोटी एक चमचा एरंडेल तेल घेऊ शकता. यामुळे पोट नियमित साफ होण्यास मदत होते.

कोमट पाणी व लिंबू: रोज सकाळी उपाशी पोटी कोमट पाण्यात एक लिंबू पिळावे. या पाण्यात चमचाभर एरंडेल तेल घालूनही ते पाणी पिऊ शकता. त्यानंतर १५ ते २० मिनिटांत प्रेशर येऊन पोट व्यवस्थित साफ होते.

त्रिफळा चूर्ण: रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम पाण्यात २ चमचे त्रिफळा चूर्ण घालून ते मिश्रण प्यावे. यामुळे सकाळी पोट साफ होण्यास मदत होते. त्रिफळा चूर्णात हिरडा, बेहडा आणि आवळा ही आयुर्वेदिक घटक असतात. यामुळे पचनशक्ती सुधारते, आतड्यांच्या मांसपेशींचे कार्यही सुधारते.

अळशीच्या बीया: रात्रभर अळशीच्या बिया भिजत घालाव्यात. सकाळी उपाशी पोटी भिजवलेली अळशी चाऊन खावी, तसेच उरलेले अळशीचे पाणी देखील प्यावे. यामुळेही पोट साफ होण्यास मदत होते.

काळे मनुके: रात्रभर पाण्यात भिजत घालाव्यात. सकाळी उपाशी पोटी भिजवलेल्या मनुक्याचं पाणी प्यावे आणि भिजलेल्या मनुकाही चावून खाल्ल्याने बद्धकोष्ठता कमी होण्यास मदत होते.

बद्धकोष्ठतेवर उपाय

वेळी अवेळी जेवणे टाळावे.

जेवताना सावकाश व प्रत्येक घास चावून खावावा. गडबडीत, पटापट खाणे टाळावे.

जेवणा नंतर लगेच झोपू नये.

आहारात हिरव्या पालेभाज्या, शेंगभाज्या, फळभाज्या, फळे यांचा समावेश करावा.

दिवसभरात पुरेसे पाणी प्यावे.

पचायला जड असणारे पदार्थ खाणे टाळावे.

नियमित व्यायाम करावा.

प्राणायाम व योगासने करावीत.

बैठी कामे असलेल्या लोकांनी रोज कमीत कमी अर्ध्या तासासाठी चालणे, पायऱ्या चढणे उतरणे, सायकलिंग यासारखे व्यायाम केल्याने पोटाच्या स्नायूंचा व्यायाम होतो व बद्धकोष्ठता दूर होते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नारळ पाणी पिण्याचे अनेक फायदे असूनही काही लोकांसाठी ठरतं घातक

हेल्दी ड्रिंक्सचा विषय निघतो तेव्हा नारळ पाण्याचं नाव सगळ्यात वर येतं. नारळ पाणी हे शरीरासाठी…

14 तास ago

आंबट ढेकर, पोटदुखीपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय

कधीकधी अपचनामुळे पोट जड होऊन वेदनाही होतात. अस्वस्थता, जळजळ आणि मळमळ असा त्रासही होतो. तर…

14 तास ago

आजारी पडण्यापुर्वी पुढील गोष्टी फक्त आयुर्वेदच करु शकतो

1) कॅन्सर होण्याची भीती वाटते.-नियमित कडीपत्त्याचा रस प्या. 2) हार्ट अँटॅकची भीती वाटते - नियमित…

14 तास ago

7 तारखेपर्यंत पगार अनिवार्य; नोकरी सोडल्यानंतर 2 दिवसांत Full & Final, नवीन कामगार नियमांची माहिती

मुंबई : कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळावे आणि नोकरी सोडल्यानंतर देय रक्कम मिळण्यासाठी होणारा विलंब टाळावा,…

14 तास ago

प्रदीप कबरे यांच्या ‘खिडकी’ अभिवाचनाचा विशेष प्रयोग ३० जुलैला दादरच्या शिवाजी मंदिरात

मुंबई: प्रसिद्ध नाटककार प्रदीप कबरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेल्या 'खिडकी' या पुस्तकातील निवडक अनुभवांवर आधारित…

14 तास ago

अपघातग्रस्त तरुणीला सुनेत्रा पवार यांची तात्काळ मदत; रुग्णालयात दाखल करून उपचाराची केली व्यवस्था

बारामतीत विकासकामांच्या पाहणीदरम्यान थांबवला ताफा; जखमी तरुणीच्या उपचारासाठी अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना बारामती: उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित…

14 तास ago