शरीरातील रक्ताच्या कमतरतेमुळे अनेकांना अशक्तपणा जाणवतो, दम लागतो, थोडे सुद्धा काम केले की थकवा जाणवतो. ह्या साठी शरीरातील रक्त वाढवणे गरजेचे आहे.
उपाय
मोड आलेल्या धान्यांचा रोजच्या आहारात समावेश करा.
दररोज एक ग्लास सफरचंदाचा ज्यूस प्यावा. सफरचंद, बीटचा रस आणि चवीनुसार मध टाकल्यास लवकर रक्त वाढण्यास मदत होते.
नियमित बीट खावे. शक्यतो कच्या बिटाची koshambir खावी.
रात्रीच्या जेवणानंतर शेंगदाणे आणि गूळ खावा.
चहा आणि कॉफी पिण्याचे प्रमाण कमी करावे.
दोन चमचे तीळ दोन तास पाण्यामध्ये भिजवून ठेवा. नंतर पाणी गाळून तिळआची पेस्ट करुन घ्या. यामध्ये मध मिसळून दिवसातुन दोन वेळेस हे मिश्रण खावे. त्यामुळे रक्ताची कमतरता दूर होण्यास मदत होते.
तसेत दिवसातून दोन वेळेस थंड पाण्याने स्नान करा. आणि सकाळी थोडा वेळ सूर्यप्रकाशात बसा.
दिवसातून एक वेळेस गवती चहा, दालचिनी, बडीशेप सम प्रमाणात घेऊन चहा तयार करुन प्या.
बीट आणि लसणाचे नियमित सेवन करावे, त्यामुळे रक्ताचे प्रमाण वाढते.
टॉमेटोमध्ये भरपूर प्रमाणात ‘व्हिटॅमिन सी’ असल्यामुळे रक्त वाढवण्यास मदत होते.
खजूर खाणे तसेच काळे मनुकेही रात्री भिजत ठेऊन सकाळी रिकाम्या पोटी खाणे.
भाजी बनविण्यासाठी लोखंडी कढईचा वापर करा.
रात्रभर तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी सकाळी प्या.
(सोशल मीडियावरून साभार)
शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…
जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…
हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्याने…
पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…
गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…