आरोग्य

शरीरातील वाढणारं कोलेस्ट्रॉल

बदलत्या काळानुसार प्रत्येकाची जीवनशैली बदलत चालली आहे. मात्र, बदलणारी जीवनशैली आरोग्यासाठी हानिकारक सिद्ध होत आहे. कामाचा नि कौटुंबिक गोष्टींचा वाढणारा ताण आणि त्यात चुकीच्या सवयी आरोग्याची वाट लावण्यासाठी पुरेशा आहेत. हृदय विकार, स्ट्रोक, श्वसन विकार, मानसिक अस्थैर्य, लठ्ठपणा अशा अनेक समस्यांनी आज बरेच लोक त्रासलेले आहेत.

यातील कितीतरी समस्यांचे कारण वाढते कोलेस्ट्रॉल आहे. केवळ लठ्ठ नव्हे तर शरीरयष्टीने बारीक असणाऱ्या लोकात सुद्धा वाढते कोलेस्ट्रॉलची समस्या निर्माण होत आहे. कितीतरी लोकांना आपल्या शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढली आहे किंवा वाढते आहे याचा सुगावा लागत नाही. परिणामी, अनेक वेळा शिरा पूर्णपणे बंद होई पर्यंत कोलेस्ट्रॉलची पातळी वाढत जाते आणि त्यानंतर ब्लॉकेजेस, हार्ट अटॅकचा धोका वाढतो. अशा वाढत्या कोलेस्ट्रॉलची काही लक्षणे असतात, ती जाणून घेउया.

स्नायू मध्ये वेदना होणे: अनेकदा अचानक हात, पाय दुखण्याची समस्या जाणवते. कित्येकदा असह्य वेदना होतात. ज्यांचे कारण माहित नसते. तर याचे कारण उच्च कोलेस्ट्रॉल असू शकते. जेव्हा शरीरात प्लेक जमा होतो तेव्हा, ते रक्तवाहिन्यांना अवरोधित करते. या स्थितीला ‘एथेरोस्क्लेरोसिस’ असे म्हणतात. शरीरात कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्याने रक्त वाहिन्यांवर परिणाम होतो. परिणामी स्नायूत वेदना होऊ शकतात. ज्यामुळे हात, पाय, खांदे ते अगदी बोटं सुद्धा दुखू शकतात.

अंग थरथरणे किंवा बधीरपणा येणे: बऱ्याचदा उच्च कोलेस्ट्रॉलच्या रुग्णात अंग थरथरणे आणि बधीरपणाची समस्या येऊ शकते. कारण कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्याने शरीराच्या काही भागात रक्ताभिसरणात अडथळे निर्माण होतात. परिणामी, अंगात थरकाप भरणे आणि काही प्रकरणात बधीरपणा जाणवतो. या परिस्थितीत उच्च कोलेस्ट्रॉल रक्तप्रवाहात रोख आणतो.

नखं पिवळी पडणे: शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढली असेल, तर एक महत्वाचे लक्षण जे लगेच दिसून येते, ते म्हणजे नखांचा रंग पिवळा बदलणे. उच्च कोलेस्ट्रॉलमुळे नखांचा रंग बदलून पिवळा होऊ शकतो. हा संकेत शरीरातील खराब रक्त परिसंचरण असल्याचे सांगतो. उच्च कोलेस्ट्रॉलचे हे महत्वाचे लक्षण असून अशा परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

नखांना तडा जाणे: उच्च कोलेस्ट्रॉलच्या काही प्रकरणात नखांची वाढ थांबते. इतकेच नव्हे तर कोलेस्ट्रॉलची पातळी जसजशी वाढत जाते, तसतसा नखांचा रंग बदलत जातो आणि काही प्रकरणात नखांना तडा देखील जाते. अशावेळी डॉक्टरांकडून तपासणी करून उपचार सुरु करणे गरजेचे आहे.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

16 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

1 दिवस ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago