आरोग्य

थंडी म्हणजे सांधेदुखी आलीच हे ५ नियम लक्षात ठेवा, शरीर अजिबात आखडणार नाही

थंडीची चाहूल लागली की अनेकांना गुडघे, खांदे, पाठीचे किंवा मनगटाचे दुखणे वाढल्याचे जाणवते. विशेषतः ज्यांना संधिवात, जुनी इजा किंवा स्नायूंच्या वेदनांचा त्रास असतो, त्यांच्यासाठी हिवाळा त्रासदायक ठरतो. या दिवसांत शरीर आखडल्यासारखं वाटतं, हालचाल करणे कठीण होते आणि थोडं चाललं तरी वेदना वाढतात. पण नेमकं असं का होतं आणि यावर काय करायला हवं हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

हिवाळ्यात तापमान घटल्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण मंदावतो. यामुळे सांध्यांपर्यंत पुरेसं रक्त पोहोचत नाही, त्यामुळे स्नायू, लिगामेंट्स आणि जोडणारे ऊतक घट्ट आणि ताठर होतात. याच अवस्थेला ‘सांधे आखडणे’ असं म्हणतात. थंड हवेत शरीरातील नैसर्गिक स्नेहन द्रव म्हणजेच joint fluid घट्ट होतो, त्यामुळे सांध्यांची हालचाल सुरळीत होत नाही आणि दुखणे जाणवते. परिणामी, चालताना किंवा उठबस करताना वेदना होतात. थंड वातावरणामुळे लोक कमी हालचाल करतात, व्यायाम टाळतात, ज्यामुळे स्नायू अधिक कमकुवत होतात आणि दुखण्याची तीव्रता वाढते.

थंडीमध्ये सांधेदुखी वाढण्यामागे अनेक कारणं असतात. रक्ताभिसरण कमी होणं, स्नायू ताठ होणं, पाण्याचं प्रमाण घटणं आणि शरीरात उष्णता टिकवण्याच्या प्रयत्नात ऊर्जा खर्च होणं ही प्रमुख कारणं आहेत. काही वेळा जुन्या इजा, संधिवात, किंवा हाडांतील झीज यामुळेही हिवाळ्यात वेदना वाढतात. शरीराच्या स्नायूंना आणि हाडांना पुरेसा उबदारपणा मिळाला नाही, तर हालचाल करताना प्रत्येक सांधा जणू जड वाटू लागतो. यावर उपाय म्हणून सर्वात पहिले शरीर उबदार ठेवणं आवश्यक आहे. थंडीच्या दिवसांत गरम कपडे वापरा, विशेषतः गुडघे आणि हात झाकून ठेवा. रात्री झोपताना अंगावर चादर घ्या, पाय झाकलेले ठेवावा. सकाळी उठल्यावर हलका व्यायाम करा. चालणे, योगासनं, स्ट्रेचिंग यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि स्नायू सैल होतात.

गरम पाण्याने अंघोळ करणे हा सर्वात सोपा आणि परिणामकारक उपाय आहे. गरम पाण्यामुळे स्नायू शिथिल होतात आणि वेदना कमी होते. काहींना गरम पाण्याची पिशवी ठेवण्यानेही आराम मिळतो. मात्र सांध्यांमध्ये सूज असेल तर थंड पट्टी उपयोगी ठरते. आहारात कॅल्शियम, जीवनसत्त्व डी आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड यांचा समावेश असणारे पदार्थ घ्या. दूध, दही, तीळ, बदाम हे पदार्थ सांध्यांना बळकटी देतात. थंडीत तहान कमी लागते, पण पाणी पुरेसं पिणं विसरू नका. शरीरातील द्रव कमी झाल्यास सांध्यांतील स्नेहन द्रव घट्ट होतो आणि वेदना वाढतात.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ, दोन शेळ्या, दोन बोकड, अन एक बकरु ठार, गाय जखमी…

कारेगाव (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील निमगाव भोगी येथे बिबट्याने मध्यरात्री गोठ्यात घुसून जनावरांवर हल्ला केल्याची…

30 मिनिटे ago

राज्य नाट्य स्पर्धेच्या परीक्षणासाठी अनुभवी कलाकारांकडून अर्ज मागविले

२५ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे आवाहन मुंबई : महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेतील नाटकांच्या…

3 तास ago

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचा ऐतिहासिक दसरा मेळावा; एकनाथ शिंदे

मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सामाजिक बांधिलकी जपत शिवसेनेने यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा बळीराजाला समर्पित…

3 तास ago

५ हजारांत शेतकऱ्यांची दिवाळी कशी गोड होणार?; हर्षवर्धन सपकाळांचा महायुती सरकारवर घणाघात

हेक्टरी १ लाख रुपये मदत आणि संपूर्ण कर्जमाफी द्या; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सपकाळांनी मांडली…

3 तास ago

शाळा प्रवेशासाठी वयोमर्यादा निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी

मुंबई: राज्यातील पूर्वप्राथमिक ते इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी राज्य शासनाने बालकांचे किमान वय निश्चित केले आहे. नव्या…

6 तास ago

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत

पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…

14 तास ago