महाराष्ट्र

ग्रामीण-शहरी वाद नव्हे, तरुणाईच्या एकतेतूनच घडेल सक्षम महाराष्ट्र; दिनेश शिंदे

मुंबई: राज्यातील स्पर्धा परीक्षांबाबत ग्रामीण आणि शहरी तरुणाईमध्ये तुलना करण्याऐवजी त्यांच्या सामर्थ्यांचा संगम घडवून महाराष्ट्राच्या विकासाला चालना देण्याची गरज असल्याचे मत शिवसेना पक्षाचे राष्ट्रीय सह समन्वयक व प्रसार माध्यम समन्वयक दिनेश शिंदे यांनी व्यक्त केले आहे.

शिंदे म्हणाले की, महाराष्ट्राची तरुणाई ही राज्याच्या प्रगतीची सर्वात मोठी ताकद असून MPSC, UPSC आणि SSC सारख्या स्पर्धा परीक्षा केवळ सरकारी नोकरीचे माध्यम नसून नेतृत्व, लोकसेवा आणि राष्ट्रनिर्मितीचे प्रभावी व्यासपीठ आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी अत्यल्प साधनांमध्ये कठोर परिश्रमाच्या जोरावर उल्लेखनीय यश मिळवले आहे. तर मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि एमएमआर परिसरातील तरुणांसमोर माहिती-तंत्रज्ञान, वित्तीय सेवा, स्टार्टअप, संशोधन आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील विविध संधी उपलब्ध असल्याने त्यांच्या करिअरच्या निवडी वेगळ्या असल्याचे त्यांनी नमूद केले.

स्पर्धा परीक्षांमधील मर्यादित रिक्त पदे, भरती प्रक्रियेतील विलंब, परीक्षा वेळापत्रकातील अनिश्चितता आणि न्यायालयीन प्रक्रियेमुळे अनेक विद्यार्थ्यांवर मानसिक तणाव निर्माण होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. या समस्येचे उत्तर समाजात मतभेद निर्माण करण्यात नसून अधिक पारदर्शक, वेगवान आणि परिणामकारक भरती व्यवस्था उभारण्यात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शासनाने रिक्त पदांची नियमित भरती, स्पर्धा परीक्षांचे निश्चित वार्षिक वेळापत्रक, पारदर्शक निवड प्रक्रिया, गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, कौशल्य विकास, ग्रामीण भागात दर्जेदार मार्गदर्शन केंद्रे तसेच प्रत्येक जिल्ह्यात करिअर समुपदेशन आणि मानसोपचार सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

स्पर्धा परीक्षेतील यश-अपयश हे कोणत्याही एका समाजघटकाचा विजय किंवा पराभव नसून प्रत्येक यशस्वी अधिकारी हा संपूर्ण देशाचा लोकसेवक असतो, असे सांगत ग्रामीण विद्यार्थ्यांची जिद्द आणि शहरी विद्यार्थ्यांची तांत्रिक क्षमता यांचा समन्वय साधल्यास महाराष्ट्राला अधिक सक्षम आणि दूरदर्शी नेतृत्व मिळेल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

5 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

5 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

5 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

5 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

5 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

5 तास ago