घरात बाळ असले म्हणजे आईची सारखी धावपळ चाललेली असते. बाळाची आंघोळ, त्यांना नटवणे इत्यादी. बऱ्याच महिला बाळाच्या डोळ्यात काजळ घालतात. घरातील वयोवृद्ध स्त्रिया बाळाला काजळ लावण्याचा आग्रह धरतात. त्यांच्या मते काजळ घातल्याने बाळाचे डोळे मोठे होतात, पाणीदार होतात व दृष्टी सुधारते. बरेच डॉक्टर मात्र डोळ्यात काजळ घालू नका असे कटाक्षाने सांगतात. काजळ डोळ्यात घालताना काजळातील जंतू व काजळ घालणाऱ्याच्या बोटावरील जंतू बाळाच्या डोळ्यात जातात व त्याला जंतू संसर्ग होऊ शकतो. क्वचित प्रसंगी काजळातील घटकांची अॅलर्जी असल्यास डोळ्यांना त्रास होईल. नखाने तर डोळ्याला इजाही होऊ शकते.
काजळ घालण्यामागचे व त्याच्या फायद्या तोट्या विषयी आपण बघितले. मग करावे तरी काय? स्वच्छ व निर्जंतुक पद्धतीने तयार केलेले काजळच (जर डोळ्यात काजळ घालायचेच असेल तर) डोळ्यांत घातल्यास त्याचे दुष्परिणाम होणार नाहीत. काजळाने डोळे मोठे दिसत असतील पण प्रत्यक्षात मोठे होत नाहीत. जळजळ झाल्याने डोळ्यांतून पाणी येऊन ते पाणीदार वाटले, तरी खऱ्या पाणीदार डोळ्यांसाठी सुयोग्य अशा पोषणाचेच सर्वाधिक महत्त्व असते.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…
लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…
नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…
मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…
तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…
शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…