क्राईम

UPSC ची शेवटची संधी हुकल्याने बालविकास अधिकाऱ्याने संपवल आयुष्य

लातूर: यूपीएससीची शेवटची संधी हुकल्याने ३६ वर्षीय बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याने आत्महत्या केली आहे. लातूरमध्ये एका लॉजवर गळफास घेऊन त्यांनी स्वत:चं आयुष्य संपवलं. त्यांच्या मृतदेहाजवळ सुसाईट नोटदेखील आढळून आली आहे. याप्रकरणी लातूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

मिळालेल्या माहितीनुसार, रामदार श्रीरामे, असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. अमरावतीला ट्रेनिंग जातो, असं सांगून ते घरातून निघाले होते. त्यांनी लातूरमध्ये पोहोचत एका लॉजवर रुम भाड्याने घेतली. तसेच पहिल्या दिवसाचे पैसेही दिले. मात्र, दुसऱ्या दिवसाचे पैसे न दिल्याने लॉजवरील मुलाने त्यांच्या खोलीचा दरवाजा ठोठावला.

यावेळी आतून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने मुलाने याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत. खोलीचा दरवाजा तोडला. यावेळी रामदार श्रीरामे यांनी गळफास घेतल्याचं दिसून आलं.याठिकाणी पोलिसांनी सुसाईट नोटही आढळून आली.

या सुसाईड नोटमध्ये यूपीएससीची शेवटची संधी हुकल्याने आपण गळपास घेत असल्याचं म्हटलं आहे. पैशांची समान वाटणी करावी, अशा उल्लेखही करण्यात आला आहे. विशेष म्हणजे माझ्या मृत्यूची बातमी देऊ नका नका, अन्यथा स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे तरुण निराश होतील, असा उल्ल्लेखही त्याने सुसाईट नोटमध्ये करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीरामे यांची लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत गट ‘ब’ संवर्गात बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणून निवड झाली होती. त्यांनी नागपूर येथे ४ महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले होते. त्यांना अमरावती येथे बालविकास प्रकल्प अधिकारी या पदावर रुजू होण्यासाठी आदेश मिळाले होते. परंतु, यूपीएससी संधी हुकल्याने त्यांनी स्वत:चं आयुष्य संपवलं.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

3 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

3 तास ago

दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची साथ का सोडली? खळबळजनक गौप्यस्फोट…

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत मानले जाणारे माजी गृहमंत्री…

5 तास ago

शिरूर तालुका शेतकरी शिष्टमंडळाचे साखर आयुक्तांना निवेदन…

शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…

21 तास ago

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश; चंद्रकांत पाटील यांनी रंगवला पेपर माशे बाप्पा

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…

1 दिवस ago

कच्चा कांदा खाल्ल्याचे काय आहेत फायदे

जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…

1 दिवस ago