महाराष्ट्र

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार

रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) येथील प्राध्यापकांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया येत्या तीन महिन्यांत पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. तसेच विद्यार्थ्यांचे निकाल वेळेत लागावेत आणि त्यांच्या पुढील शैक्षणिक वर्षाचे नुकसान होऊ नये, यासाठी शासनाकडून आवश्यक ती कार्यवाही सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विद्यापीठाच्या २८व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती जिष्णू देव वर्मा यांच्या उपस्थितीत हा समारंभ पार पडला. यावेळी पालकमंत्री भरत गोगावले, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे यांच्यासह विद्यापीठाचे कुलगुरू रजनीश कामत, कुलसचिव प्रा. अमित शेष, परीक्षा नियंत्रक डॉ. गीतांजली महामुणकर, प्राध्यापक, विद्यार्थी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

पाटील म्हणाले की, विद्यापीठातील प्राध्यापकांची रिक्त पदे, निकाल आणि विद्यार्थ्यांशी संबंधित विविध प्रश्न डिसेंबरपर्यंत सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल. निकाल वेळेत लागण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत असून, डिसेंबरनंतर विद्यापीठाच्या कामकाजात सकारात्मक बदल दिसून येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अन्य विद्यापीठात स्थलांतर करण्याची वेळ येणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

डिजिटल प्रशासनावर भर

विद्यापीठाने प्रवेश आणि परीक्षा प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन करण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर केवळ प्रशासकीय कामकाजापुरता मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांचा शैक्षणिक अनुभव अधिक प्रभावी करण्यासाठी केला पाहिजे, असे पाटील यांनी सांगितले.

‘शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन’

रायगड किल्ल्याच्या सान्निध्यात वसलेले DBATU हे ज्ञान, स्वातंत्र्य आणि सामाजिक परिवर्तनाच्या विचारांचे केंद्र आहे. चवदार तळे सत्याग्रहाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीशी या परिसराचे महत्त्वाचे नाते आहे. त्यामुळे अशा ऐतिहासिक भूमीतून शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांची सामाजिक जबाबदारी अधिक मोठी आहे, असेही पाटील म्हणाले.

“शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे सर्वात प्रभावी साधन आहे. शिक्षणामुळे समता, समानता, प्रगती आणि विकासाला चालना मिळते,” असे त्यांनी नमूद केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० हे सर्वसमावेशक आणि समतामूलक शिक्षणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल असल्याचेही त्यांनी सांगितले.

एकल मातांच्या मुलींसाठी विशेष योजनेचा प्रस्ताव

राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या एकल मातांच्या मुलींची माहिती संकलित करून त्यांची संख्या निश्चित करण्यात येणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन या विद्यार्थिनींसाठी विशेष योजना राबविण्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पाटील यांनी दिली.

एकल माता आपल्या मुलांचा सांभाळ करताना कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी पार पाडतात. त्यांच्या मुलींना उच्च शिक्षण घेताना आवश्यक आर्थिक आणि शैक्षणिक पाठबळ मिळावे, यासाठी शासन सकारात्मक पावले उचलत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लवकरच उद्घाटन

DBATUच्या परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम पूर्ण झाले आहे. या पुतळ्याचे लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहितीही चंद्रकांत पाटील यांनी दिली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

57 मिनिटे ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

58 मिनिटे ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

1 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

1 तास ago

अजित पवारांच्या अपघाताचे राजकारण करू नका; सुनेत्रा पवारांचा विरोधकांना इशारा

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी अजित पवारांच्या अपघाताच्या मुद्द्यावरून…

3 तास ago

हिंजवडीच्या प्रश्नांवर सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये; ४२६ कोटींच्या विकास आराखड्याला गती

पुणे: हिंजवडी परिसरातील रस्ते, वाहतूक कोंडी, पाणी, वीज, कचरा व्यवस्थापन आणि मेट्रोसह विविध प्रलंबित प्रश्नांच्या…

3 तास ago