आरोग्य

हाताच्या कोपरांचा काळपटपणा सहज दूर करणारे सोपे घरगुती उपाय

हाताच्या कोपरांचा ही एक चिंताजनक समस्या आहे. कोपरांचा रंग काळा झाला तर अनेक महिलांना स्लीव्हजलेस ड्रेस घालता येत नाही. किंवा लांब बाह्यांचेच कपडे वापरणं भाग असतं. अनेक केमिकल्स, क्रीमचा उपाय करूनही काळपटपणा दूर होत नाही. अशात ही समस्या दूर करण्यासाठी काही घरगुती गोष्टींची मदत घेऊ शकता.

बटाट्याचा रस: बटाट्याचा रस कोपरांचा काळपटपणा कमी करण्यासाठी वापरू शकता. बटाट्याच्या रसामध्ये व्हिटॅमीन सी असतं, जे त्वचेवरील डेड स्कीन दूर करतं. यासाठी बटाट्याचा रस १५ ते २० मिनिटांसाठी लावून ठेवा, नंतर पाण्यानं धुवून घ्या.

हळद आणि दही: हळद आणि दह्याचं मिश्रणकाळपटपणा दूर करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. हळदीमध्ये करक्यूमिन नावाचं तत्व असतं जे त्वचेवरील डेड स्कीन दूर करतं. तर दह्यातील लॅक्टिक अॅसिडमुळे त्वचा चमकदार होते. यासाठी दह्यात हळद मिक्स करून १५ ते २० मिनिटं कोपरांवर लावून ठेवा. नंतर पाण्यानं धुवून घ्या.

लिंबू आणि साखर: लिंबू आणि साखरेचं मिश्रण देखील कोपरांचा काळपटपणा दूर करण्यासाठी फायदेशीर ठरतं. लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असतं, जे त्वचेवरील डेड स्कीन दूर करतं. तर साखरेमध्ये एक्सफोलिएटिंग गुण असतात. ज्यानं त्वचा चमकदार होते. यासाठी या दोन्ही गोष्टीचं मिश्रण १५ ते २० मिनिटं लावू ठेवा. नंतर पाण्यानं धुवून घ्या.

बेसन आणि दही: कोपरांचा काळपटपणा दूर करण्यासाठी बेसन आणि दह्याचं मिश्रणही फायदेशीर ठरतं. बेसनांमध्ये एक्सफोलिएटिंग गुण असतात, जे त्वचेवरील डेड स्कीन दूर करतात. तर दह्यातील लॅक्टिक अॅसिडनं त्वचा चमकदार होते.

तांदळाचं पीठ: तांदळाचं पीठ देखील कोपरांचा काळेपणा दूर करतं. यात एक्सफोलिएटिंग गुण असतात, जे त्वचेवरील डेड स्कीन दूर करतात. तांदळाचं पीठ पाण्यात मिक्स करून लावा. १५ ते २० मिनिटांनी धुवून घ्या.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात विद्युत रोहित्र चोरट्यांच्या निशाण्यावर; रोहित्र फोडले अन्…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना वीजपुरवठा करणारी विद्युत रोहित्रे आता चोरट्यांच्या निशाण्यावर…

1 दिवस ago

गोकुळच्या अध्यक्षपदासाठी सत्तेचा खेळ? संचालकांना परराज्यात नेल्याने वडेट्टीवार संतप्त

१० नोव्हेंबरच्या निवडणुकीत सर्व संचालकांना मतदानाची संधी द्या; सतेज पाटील यांच्या पाठीशी काँग्रेस ठाम मुंबई: गोकुळ…

2 दिवस ago

संसार दोघांचा, त्याग मात्र एकटीचाच का? कुंकवाचा मान राखता, मग स्त्रीच्या भावनांचा सन्मान कुठे

लग्न म्हणजे केवळ दोन जीवांचे मिलन किंवा दोन कुटुंबांचे नाते नाही, तर दोन व्यक्तींनी एकमेकांच्या…

2 दिवस ago

चित्रपताका मराठी चित्रपट महोत्सवाचे अधिकृत संकेतस्थळ सुरू; १५ नोव्हेंबरपासून प्रभादेवीत रंगणार चित्रपटांची मेजवानी!

नोंदणी शुल्क मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार; ३५ मराठी चित्रपट, ७ परिसंवाद, ४ विशेष मुलाखती आणि…

2 दिवस ago

राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाची चार विभागीय केंद्रे; आठ विद्यापीठांत उपकेंद्रे सुरू होणार

चंद्रकांतदादा पाटील यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश; कुलगुरूंना जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना…

2 दिवस ago

मनसेचे प्रदेश सरचिटणीस रणजित शिरोळे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; भाजप, आपच्या पदाधिकाऱ्यांचाही पक्षप्रवेश!

राहुल गांधींचे हात बळकट करण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश; हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत टिळक भवनात पक्षप्रवेश सोहळा…

2 दिवस ago