आरोग्य

तोंड उघडे ठेवून झोपण्याची सवय असू शकतो ‘हा’ गंभीर आजार

आरोग्य चांगलं आणि निरोगी राहावं यासाठी आपण पुरेसा आहार, व्यायाम करतो.पण धावत्या जीवनशैलीत आपल्याला पुरेशा प्रमाणात झोप घेणं देखील महत्त्वाचं आहे. दिवसभराचा थकवा आणि मेंदूला नव्याने ऊर्जा मिळण्यासाठी रात्रीची किमान ७ ते ८ तासांची झोप महत्त्वाची असते. आपली झोपण्याची स्थिती देखील महत्त्वाची आहे. चुकीच्या पद्धतीने झोपल्यास पाठीचे, मानेचे किंवा कंबरेचा त्रास जाणवू लागतो.

आपल्यापैकी अनेकांना तोंड उघडे ठेवून झोपण्याची आणि घोरण्याची सवय असते.

ज्याचा आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. तोंडाने श्वास घेतल्यास अनेक समस्या उद्भवतात. सतत तोंडात कोरडेपणा जाणवतो, ज्यामुळे दात आणि आरोग्याच्या इतर समस्या होतात. हिरड्यांचे आजर होऊन दातांवर घाण साचू लागते.

उघडे ठेवून झोपल्याने आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. झोपेच्या वेळी तोंड उघडे ठेवल्याने शरीराच्या आतील भागात असणाऱ्या गंभीर समस्यांकडे दुर्लक्ष केले जाते. जर एखाद्याला सर्दी, खोकला, कफ किंवा इतर कोणतीही समस्या नसेल आणि तरीही तोंड उघडे ठेवून झोपत असाल तर हे गंभीर समस्यांचे लक्षण आहे.

झोपताना तोंड उघडे ठेवण्यामागे सेप्टम कार्टिलेज असू शकते. याला नाकाचा सेप्टम कार्टिलेज असेही म्हणतात. नाकाचा सेप्टम कार्टिलेज ही नाकाच्या आत एक पातळ लवचिक रचना आहे, जी नाकाच्या मार्गाला दोन भागांमध्ये विभाजित करते.

हे आपल्या नाकाच्या छिद्रांना आधार देते. यामुळे नाकाचा एक भाग बंद होतो,ज्यामुळे आपण तोंडाने श्वास घेऊ लागतो.

तोंड उघडे ठेवून झोपल्याने हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त प्रमाणात असतो. झोपेदरम्यान नाकाऐवजी तोंडाने श्वास घेतला जातो, ज्यामुळे शरीराला पुरेसे ऑक्सिजन मिळत नाही.

ज्यामुळे रक्तवाहिन्यांमधील रक्तप्रवाहावर परिणाम होऊन थेट हृदयाचे आरोग्य बिघडते. तोंड उघडे ठेवून झोपल्याने दम्याचा धोका वाढतो. कारण यामुळे फुफ्फुसांना अधिक जोमाने काम करावे लागते. ज्याचा जोर आपल्या हृदयावर येतो. तोंड उघडे ठेवून झोपल्याने तोंडात बाहेरचे बॅक्टेरिया सहज प्रवेश करतात. जर आपल्यालाही तोंड उघडे ठेवून झोपण्याची सवय असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

(सोशल मीडियावृरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर तालुक्यात वेश्या व्यवसायवर पोलिसांचा छापा; परदेशी महिलांसह सात महिलांची सुटका…

शिरूर (तेजस फडके): पुणे-नगर महामार्गावरील कारेगाव (ता. शिरूर) येथील जयश्री फर्निचरच्या बाजूला असलेल्या लॉजिंगमध्ये सुरू…

2 दिवस ago

शिरूरच्या करडे घाटात गोळीबार, विशाल काळेसोबत नेमकं काय घडलं…

शिरूर : शिरूर तालुक्यातील करडे घाटात दोन गुन्हेगार गटांच्या वादातून झालेल्या गोळीबारात विशाल सुनील काळे…

3 दिवस ago

सांस्कृतिक कार्य विभागातील संचालकपदाची नियुक्ती रखडली; मंत्रालयात चर्चांना उधाण

मुंबई: राज्याच्या सांस्कृतिक चळवळीला दिशा देणाऱ्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातील संचालकपद गेल्या दीड महिन्यांपासून रिक्त असल्याने…

3 दिवस ago

स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याचा ‘गेम ओव्हर’…

पुणे : पुणे शहरातील स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात एका प्रवासी युवतीवर 25 फेब्रुवारी 2025 रोजी…

3 दिवस ago

शिरूर तालुक्यात कारने एकमेकांना धडक देत केला गोळीबार; एकाचा मृत्यू….

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसर आज (सोमवरा) सायंकाळी पाच…

3 दिवस ago

हिंदकेसरी महेंद्र गायकवाड यांचा भव्य नागरी सत्कार; जयकुमार गोरे यांची उपस्थिती

मंगळवेढा: सातारा येथे झालेल्या ५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत मानाचा ‘हिंदकेसरी’ किताब पटकावून मंगळवेढा तालुक्यातील…

4 दिवस ago