आरोग्य

पचन व्यवस्थित होण्यासाठी काही घरगुती उपाय…

अनेक ज्येष्ठांना अपचनाचा त्रास सतावत असतो. अशावेळी त्यांनी आपल्या आहारात काय समावेश करायला हवे हे जाणून घेऊया.

चेरी, द्राक्ष, बदाम अशा फायबरयुक्त पदार्थांचा आहारात समावेश असावा. त्यामुळे अन्नाचे पचन चांगले होते.

दररोज दुपारी एक वाटी दही प्या. दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात. ते पचनव्यवस्था सुधारतात.

ज्या लोकांना मांसाहार जास्त आवडतो अशा लोकांनी कमी चरबी असलेले मांस खायला हवे. कारण मांस पचायला वेळ लागतो.

आलं, काळे मिरे, सैंधव मीठ आणि धणे या मसाल्यांचा जेवणात समावेश असायला हवा. हे मसाले जेवणाचा स्वादच वाढवत नाही तर पचनकार्य सुधारतात.

व्हिटॅमिन-सी असलेले ब्रोकोली, टोमॅटो, किवी फळ, स्ट्रॉबेरी हे खावेत. रंगीत फळं,भाज्या भरपूर साऱ्या खाव्यात त्याने पोट साफ होते आणि अपचनाचा त्रास होत नाही.

सकाळी उठल्यावर व्यायाम आणि पोटाला मालीश केल्यास पचनशक्ती वाढते. काही चांगल्या तेलांनी पोटाची मालीश करावी.

सकाळी गरम पाणी प्यायला आवडत नसेल तर कोमट पाण्यात लिंबाचा रस घालून प्यावा, पोटातले ऑसिड कमी होऊन पोट साफ राहील.

भूकेपेक्षा थोडे कमी खावे, त्यामुळे पचन व्यवस्थितपणे व्हायला मदतच होईल. तुम्ही कोणत्या प्रकारे खाता, कशा प्रकारे खाता यावरही पचन कार्य अवलंबून असते.

जेवायला मांडी घालून म्हणजे सुखासनात (भारतीय बैठक) बसावे. प्रत्येक घास बत्तीस वेळा चावला गेला पाहिजे, प्रत्येक घासाचा ज्युस बनवून पिला पाहिजे.

शांतपणे, समाधानाने, जेवणाचा आनंद घेत जेवले पाहिजे. त्यासाठी एखादा श्लोक म्हणून घरातील सर्व सदस्य एकत्र मिळून जेवायला बसायला हवे.

(सोशल मीडियावरुन साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

3 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

5 दिवस ago

तळेगाव ढमढेरे ते एल अँड टी फाटा रस्त्यावरील ‘ते’ बॅनर ठरत आहेत चर्चेचा विषय

तळेगाव ढमढेरे (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गावातील अतिशय महत्त्वाचा तसेच वर्दळीचा आणि पुणे-नगर…

5 दिवस ago

Video; तळेगाव-न्हावरे रस्त्यावर नियंत्रण सुटल्याने मालवाहू ट्रक उलटला; चालक गंभीर जखमी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव-न्हावरे रस्त्यावर (NH548D) न्हावरेच्या बाजुने तळेगाव ढमढेरेच्या दिशेने जाणारा भरधाव…

5 दिवस ago

आज दिवसभर प्रेक्षकांना ZEE TV वर ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ चित्रपटाची पर्वणी

शिरुर (तेजस फडके) आज (दि 12) मे रोजी दिवसभर झी वाहिनीच्या विविध चॅनलवर स्वराज्याचे दुसरे…

6 दिवस ago

जेव्हा सगळे शेपूट घालुन बसले होते. तेव्हा हा पठ्या भांडलाय तुमच्यासाठी; डॉ कोल्हे यांचा अजित पवारांना टोला

शिरुर (तेजस फडके) ज्या भारतीय जनता पक्षाची तळी घेऊन आता तुम्ही एका शेतकऱ्याच्या पोराला पाडायला…

1 आठवडा ago