आरोग्य

आजीबाईच्या बटव्यातील काही रामबाण घरगुती उपाय

१) कान दुखी:- कांदा बारीक करून त्याचा रस कापडानं गाळून घ्या. तो रस गरम करुन कानात ४ थेंब टाकल्यावर कानदुखी कमी होते.

२) दातदुखी:- हळद आणि खडे मीठ बारीक वाटून ते शुद्ध मोहरीच्या तेलात मिसळून दिवसातून दोनदा ब्रश केल्याने दातदुखी कमी होते.

३) दात पोकळी:- कापूराची बारीक पूड करून बोटाने दातांवर लावा आणि चोळा. छिद्र पूर्णपणे स्वच्छ करा. त्यानंतर कापूर छिद्राखाली काही वेळ दाबून ठेवल्याने दातदुखी हळूहळू कमी होते.

४) लहान मुलांच्या पोटातले जंत:- लहान मुलांच्या पोटात जंत झाले असतील तर कांद्याचा रस सकाळ संध्याकाळी गरम करून एक तोळा दिला तर जंत नक्कीच मरतात.

५) शरीरावरच्या गाठी:- कांदा बारीक करून गरम करा. नंतर त्यात गोमूत्र मिसळून छोटे गोळे तयार करा. कपड्याच्या साहाय्याने गाठीवर बांधा ,याने वेदना कमी व्हायला मदत होते.

६) पोटातील कृमी आणि जंत:- १ चमचा सोयाबीनच्या पानांचा रस आणि मध एकत्र करून सकाळी, दुपार आणि संध्याकाळी प्यावे, जंत आणि कृमी ४/५ दिवसात मरतात आणि बाहेर पडतात.

७) लहान मुलांमध्ये होणारी उलटी, जुलाब:- पिकलेल्या डाळिंबाच्या फळाचा १ चमचा रस सकाळ, दुपार आणि संध्याकाळी गरम करून लहान मुलांना दिला तर निश्चितपणे उलट्या जुलाब थांबतात.

८) बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी:- १ मोठ्या आकाराचा लिंबू कापून घ्या. रात्रभर तो अशा जागी ठेवा जिथं दव पडेल.त्यानंतर सकाळी ते लिंबू एका ग्लास साखरेच्या पाण्यात पिळून त्यात किंचित काळं मीठ टाकून सेवन केल्यानं बद्धकोष्ठता दूर होते.

९) त्वचा आगीने भाजणे:- कच्चा बटाटा बारीक करून त्याचा रस काढून तो रस जळलेल्या जागेवर लावल्यानं आराम मिळतो. याशिवाय चिंचेची साल जाळून त्याचं बारीक चूर्ण करून ते चूर्ण गाईच्या तुपात मिसळून जळलेल्या जागेवर लावलं तरी आराम मिळतो.

१०) कानात मुरुम:- मोहरीच्या तेलात लसूण शिजवून, त्या तेलाचे २ थेंब सकाळ, दुपार, संध्याकाळ कानात टाकल्याने कानातले मुरुम गळतात किंवा बरे होतात आणि वेदना कमी होतात.

११) डांग्या खोकला:- तुरटी तव्यावर भाजून बारीक वाटून घ्या. त्यानंतर तुरटीचे ३ भाग घेऊन तेव्हढीच साखर त्यात मिसळून सकाळ, दुपार, संध्याकाळ घेतलं तर डांग्या खोकला बरा होतो.

१२) लघवीची जळजळ:- ताजी कारली बारीक चिरून हाताने नीट चोळून कारल्याचं पाणी स्टीलच्या किंवा काचेच्या भांड्यात गोळा करा. त्या रसाची ५० ग्रॅमची मात्रा करून ते तीन वेळा प्यावे (सकाळी, दुपार आणि संध्याकाळ), जळजळ आणि लघवीचा कडकपणा नाहीसा होतो.

१३) शरीरावरचे फोड:- कडुनिंबाची मऊ पाने बारीक करून गाईच्या तुपात शिजवून फोडांवर हलक्या कपड्याच्या साहाय्याने बांधून ठेवली तर गंभीर आणि जुने असाध्य फोडही बरे होतात.

१४) डोकेदुखी:- सुंठ बारीक वाटून शुध्द शेळीच्या दुधात मिसळून नाकातून वारंवार ओढल्याने सर्व प्रकारच्या डोकेदुखीत आराम मिळतो.

१५) लघवीमध्ये साखर:- वाळलेल्या जांभळाच्या बीचा बारीक तुकडा टाकून कापडाने गाळून अठ्ठावीस दिवस (सकाळी, दुपार आणि संध्याकाळ) पाण्यासोबत घ्यावा, लघवीसोबत साखर येणे बंद होते. याशिवाय २ ताज्या कारल्याचा रस नियमितपणे पिणे देखील या रोगात फायदेशीर आहे.

१६) मेंदूचा अशक्तपणा:- मेंदीच्या अठरा बिया बारीक करून शुद्ध मधासोबत दिवसातून ३ वेळा (सकाळी, दुपार आणि संध्याकाळ) घेतल्यामुळे मेंदूचा अशक्तपणा दूर होऊन स्मरणशक्ती चांगली राहते. त्यामुळे डोकेदुखीतही आराम मिळतो.

१७) अर्धशिशी:- ३ भाग कापूर आणि मलयगिरी चंदन गुलाबपाण्यामध्ये (गुलाबपाण्याचे प्रमाण थोडं जास्त असावं) चोळून नाकातून ओढल्याने अर्धशिशी दुखण्यावर आराम मिळतो.

१८) रक्ताचे जुलाब:- २ तोळे जांभळं ताज्या पाण्यात बारीक करून १ ग्लास सकाळी ४/५ दिवस प्यायल्याने रक्ताचे जुलाब थांबतात, त्यात साखर किंवा इतर कोणतेही पदार्थ टाकू नयेत.

१९) सर्दी:- पाव कप गाईचे दुध गरम करून त्यात १२ दाणे काळी मिरी आणि १ तोळे साखर वाटून मिसळून रात्री झोपताना प्या. सर्दी ५ दिवसात पूर्णपणे बरी होईल किंवा १ तोळा साखर आणि ८ दाणे काळी मिरी ताज्या पाण्यात बारीक करून चहाप्रमाणे प्या आणि ५ दिवस अंघोळ करू नका.

२०) मंदाग्नी:- लिंबाच्या रसात आल्याचे छोटे तुकडे टाका आणि त्यात थोडेसे मीठ मिसळून काचेच्या भांड्यात ठेवा. दररोज ५/६ तुकडे जेवताना घ्या, मंदाग्नी दूर होईल.

२१) पोटाचे विकार:- ओवा,काळी मिरी आणि खडे मीठ एकत्र करून पावडर तयार करा. हे तिन्ही सम प्रमाणात असावेत. हे चूर्ण रात्री झोपताना गरम पाण्यासोबत नियमित सेवन केलं तर पोटाचे सर्व प्रकारचे आजार लवकर बरे होतात.

२२) लठ्ठपणा दूर करा:- १ ग्लास पाण्यात १ लिंबाचा रस रोज रिकाम्या पोटी प्यायल्याने लठ्ठपणा दूर होतो. हे ३ महिने सतत केलं पाहिजे. उन्हाळा आणि पावसाळ्याच्या दिवसात हा प्रयोग जास्त फायदेशीर ठरतो.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

3 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

3 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

3 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

3 तास ago