आरोग्य

साखर की गूळ, तब्येतीसाठी काय फायद्याचं? शुगर-वजन वाढू नये म्हणून काय खाव

वजन कमी करण्यासाठी जेव्हा लोक हेल्दी डाएटचा आधार घेतात तेव्हा सगळ्यात आधी आहारातून साखर हटवतात. जितकं होईल तितकं कमी कमी साखरेचं सेवन करतात. साखरेऐवजी गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे तुम्ही फक्त फिट राहत नाहीत तर अनेक हेल्थ बेनिफिट्सही मिळतात.

जे लोक गोड खाण्याचे शौकिन असतात त्यांच्यासाठी साखर सोडणं खूपच कठीण असतं. खासकरून जेव्हा गोड पदार्थ खाण्याचे क्रेव्हिंग्स होतात तेव्हा साखरेपासून तयार झालेले पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. पण जास्त प्रमाणात साखर खाल्ल्यानं डायबिटीस, लठ्ठपणा यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. साखर ब्लड प्रेशर वाढण्यासाठी कारणीभूत ठरते.

वजन कमी करण्यासाठी साखर उत्तम की गूळ असा प्रश्न अनेकांना पडतो. साखर आणि गूळ या दोन्हींमध्ये गोडवा असतो. साखर खावी की गूळ याबाबत लोकांच्या मनात बरेच प्रश्न असतात.अधिक साखर खालल्यानं शरीराला जास्त कॅलरीज मिळतात ज्यामुळे वजन वाढू लागते. साखरेमुळे लठ्ठपणाचा धोका जास्त असतो. ज्यामुळे हार्ट डिसिज,कॅन्सर, टाईप २ डायबिटीस यांसारख्या आजारांचा धोका वाढतो. अधिक साखर खाल्ल्यांन दात किडतात. याशिवाय लिव्हरच्या समस्यांचा धोका असतो. जास्त साखर खाल्ल्यानं शरीरात कोलेजन फॉर्मेशन व्यवस्थित होत नाही.

१०० ग्रॅम गुळात जवळपास ३८५ कॅलरीज असतात ज्यामुळे वजन वाढू शकते. गुळ साखरेपेक्षा उत्तम ठरतो. पण गुळाच्या सेवनानंही शुगर लेव्हल वाढू शकते. काही लोकांमध्ये एलर्जीचं कारण ठरू शकते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत गुळाचे सेवन केल्यानं शरीरात गरमी वाढते. हेल्थ एक्सपर्ट्सच्यामते ऊन्हाळ्यात पचनासंबंधित समस्या उद्भवू शकतात.

गूळ एक सुपरफूड आहे. ज्यामुळे अनेक आजारांचा धोका कमी होतो. गुळात आयर्न असते ज्यामुळे एनिमियाची समस्या दूर होते. हाडं मजबूत होतात. यात पचन एंजाईम्स असतात ज्यामुळे पोटाशी संबंधित समस्या उद्भवत नाहीत. गुळाच्या सेवनानं ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवता येतं. गुळानं इम्यून सिस्टिम मजबूत राहते. गूळ आणि साखर दोन्हींचा स्त्रोत ऊस हाच असतो.

दोन्ही बनवण्याची प्रोसेस वेगवेगळी असते. गूळ एक नैसर्गिक स्विटनर आहे. जो कमीत कमी प्रोसेसमध्ये तयार केला जातो. यात साखरेच्या तुलनेत व्हिटामीन्स, खनिजं जास्त असतात. तर साखर बनवताना वेगवेगळ्या प्रकारच्या केमिकल्सचा वापर केला जातो. याशिवाय यात कॅलरीज खूप जास्त असतात.

गूळ तयार करताना ऊसाच्या रसातील अनेक पोषक तत्व घातले जातात. साखरयुक्त उत्पादनांचे अत्याधिक सेवन वाढवल्यास डायबिटीस, लठ्ठपणा यांसारख्या समस्या वाढू शकतात. याशिवाय उसापासून तयार झालेल प्रोडक्ट्स आहारात समाविष्ट केल्यानं व्यक्तीला लाभदायक फायदे मिळू शकतात.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

15 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

15 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

15 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

15 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

15 तास ago

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

19 तास ago