शिरूर तालुका

निलेश वाळुंज यांच्या तक्रारीनंतर जिल्हा शिक्षण अधिकाऱ्याची अण्णापूर शाळेला तातडीने भेट

शिरूर (अरुणकुमार मोटे): जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील शिक्षणाच्या दयनीय परिस्थितीविरोधात सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांनी उचललेल्या आवाजानंतर शिक्षण विभागाला जाग आली आहे. मागील दीड-दोन वर्षांपासून अन्नापुर ता. शिरूर येथील जिल्हा परिषद शाळेत पदवीधर शिक्षकाच्या जागा रिक्त होत्या, त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. संबंधित शिक्षकाच्या अनुपस्थितीमुळे निलंबनाची कारवाई उशिराने झाली, मात्र नवीन शिक्षक नेमण्यास शिक्षण विभागाने चालढकल केली होती.

यासंदर्भात वाळुंज यांनी जिल्हा शिक्षण अधिकारी (प्राथमिक) संजय नायकडे, अतिरिक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला. मात्र, जबाबदार अधिकाऱ्यांकडे वेळ नसल्याच्या कारणाने ही गंभीर समस्या दुर्लक्षित केली जात होती. त्यामुळे वाळुंज यांनी थेट ग्रामविकास विभाग मंत्री आणि सचिवांकडे तक्रार दाखल केली.

या पाठपुराव्याचा त्वरित परिणाम झाला असून, दि. २४ मार्च २०२५ रोजी जिल्हा शिक्षण अधिकारी (प्राथमिक) यांनी अन्नापुर शाळेला भेट देऊन एका शिक्षकाची तातडीने तोंडी नेमणूक केली. तसेच, लवकरच रिक्त असलेली पदवीधर शिक्षक आणि मुख्याध्यापक पदे भरण्यात येतील, असे आश्वासन देण्यात आले.

शिक्षण विभागाच्या गलथान कारभारामुळे शाळांचा पट कमी…

गेल्या दोन वर्षांपासून शिक्षक नसल्याने शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या जवळपास ३० ने घटली आहे. शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळे अनेक जिल्हा परिषद शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे नागरिकांतून जिल्हा परिषद शिक्षण विभागात कर्तव्यदक्ष आणि तडफदार अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभागात भ्रष्टाचार वाढल्याने योग्य प्रशासनासाठी सक्षम अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, अशीही मागणी वाळुंज यांनी केली आहे. या प्रकरणी लवकरच ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट घेऊन संपूर्ण बाब मांडणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.जर वेळ पडली, तर शिक्षण व्यवस्थेतील अन्यायाविरोधात लोकशाही मार्गाने जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देखील वाळुंज यांनी दिला आहे. शिरूर तालुक्यातील अन्य जिल्हा परिषद शाळांमध्येही अशा समस्या असल्यास त्याचा पाठपुरावा करण्यात येईल.

निलेश मंदा यशवंत वाळुंज

(सामाजिक कार्यकर्ते/व्हिसल ब्लोअर)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago