आरोग्य

हार्ट अटॅकपासून वाचवते आंबट-गोड ‘चिंच’; इम्युनिटी मजबूत- कॅन्सरचा धोका होईल कमी

हिवाळ्यात हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका वाढतो. विशेषत: हार्ट अटॅकच्या घटना या दरम्यान अधिक दिसतात. आपल्या स्वयंपाकघरात असलेली आंबट-गोड चिंच हिवाळ्यात हृदयाच्या आरोग्याची काळजी घेण्यास मदत करू शकते. चिंच फक्त इम्युनिटी मजबूत करत नाही तर कॅन्सरपासून बचाव करण्यासाठीही प्रभावी आहे.

इम्युनिटी मजबूत

चिंचेमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि फ्लेव्होनॉइड्स आपल्या शरीराची इम्युनिटी वाढवतात. हे अँटिऑक्सिडंट्स शरीरातील फ्री रॅडिकल्सशी लढतात आणि ऑक्सिडेटिव्ह नुकसान कमी करतात. त्यामुळे शरीरातील सेल्स सुरक्षित राहतात, तसेच कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा धोकाही कमी होतो.

हृदयाची घ्या काळजी 

चिंचेमध्ये फ्लेव्होनॉइड्स असतात, जे खराब कोलेस्ट्रॉल कमी करून नसा स्वच्छ ठेवण्यास मदत करतात. यामुळे हार्ट अटॅकचा धोका कमी होतो. याशिवाय चिंचेमुळे जळजळ कमी होते, जी शरीराची इम्युनिटी सुधारण्यासाठी आवश्यक असते.

पचनक्रिया सुधारते

पचनसंस्थेसाठीही चिंच फायदेशीर आहे. चिंचेच्या सेवनाने बद्धकोष्ठता, जुलाब आणि पोटदुखी यांसारख्या पोटाच्या समस्यांपासून आराम मिळतो.

वजन कमी करण्यास मदत 

चिंचेमध्ये भरपूर फायबर असतात आणि त्यात कॅलरीज कमी असतात, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. याशिवाय यामध्ये असलेले अमीनो ॲसिड शरीराचे टिश्यू मजबूत करण्याचं काम करतात.

चिंचेचा असा करा वापर

चिंचेचा वापर चटणी किंवा सूपमध्ये करता येतो. तुम्हाला हवी असल्यास किंवा आवडत असल्यास तुम्ही अशीही खाऊ शकता. परंतु हे लक्षात ठेवा की, त्याचं जास्त प्रमाणात सेवन करणं महागात पडू शकतं.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

ठाणे अंतर्गत मेट्रोबाबतचे गैरसमज दूर करा; नागरिकांशी संवाद साधा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महारेलला जनजागृती, चर्चासत्रे आणि तीन आठवड्यांत पर्यायी मार्गाचा अभ्यास करण्याचे निर्देश ठाणे : ठाणे अंतर्गत…

8 तास ago

म्हाडाचे घर देण्याच्या आमिषाने निवृत्त बँक अधिकाऱ्याची 29 लाखांची फसवणूक; शिवाजी पार्क पोलिसांत गुन्हा

सहा वर्षे आश्वासनांची मालिका, 'स्टॉप पेमेंट' धनादेशांचा धक्का; तिघांविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्रे व संगनमताचे गंभीर…

11 तास ago

आज ना उद्या माझा पुतण्या भारताचा पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांबद्दल काकांचा मोठा दावा

'देवाभाऊ' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बाळासाहेब फडणवीस यांचे वक्तव्य; चंद्रकांत पाटील यांच्याकडूनही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाचे कौतुक पुणे…

11 तास ago

एफडीएची राज्यभर धडक मोहीम! 88 कारवाया, 9.50 कोटींचा बनावट औषधसाठा जप्त; 10 आरोपी गजाआड

मुंबई: अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) जून-जुलै 2026 या कालावधीत राज्यभर बनावट औषधे, विनापरवाना उत्पादन-विक्री,…

11 तास ago

ओबीसींच्या हक्कांसाठी काँग्रेसची ‘मंडल यात्रा’; सरकारला वडेट्टीवारांचा इशारा

नागपूर: भंडारा येथून सुरू झालेल्या विदर्भातील ११ जिल्ह्यांच्या 'मंडल यात्रा'च्या पार्श्वभूमीवर काँग्रेस विधिमंडळ नेते विजय…

11 तास ago

‘इथेनॉल घोटाळ्याप्रकरणी नितीन गडकरींचा राजीनामा घ्या; मोदींनी देशाची माफी मागावी’; हर्षवर्धन सपकाळ

ई-२० धोरण घाईत राबवले; वाहनधारकांचे नुकसान झाल्याचा काँग्रेसचा आरोप, फडणवीसांच्या दिल्लीवारीवरही निशाणा मुंबई: पेट्रोलमध्ये इथेनॉल…

11 तास ago