आरोग्य

बाळाला बाटलीने दूध पाजण पडू शकत महागात; ‘या’ सिंड्रोमचा धोका

लहानपणापासूनच दातांची योग्य काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे, परंतु अनेक वेळा पालक नकळत अशा काही चुका करतात ज्यामुळे मुलांच्या दातांच्या आरोग्याला हानी पोहोचते. जगात सुमारे ३५० कोटी लोक तोंडाशी संबंधित लहान-मोठ्या आजारांनी ग्रस्त आहेत.

दरवर्षी २० मार्च रोजी वर्ल्ड ओरल हेल्थ डे साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश दाताच्या आणि तोंडाच्या आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करणं आहे. लहानपणापासूनच दातांची योग्य काळजी घेणं महत्त्वाचं आहे. बेबी बॉटल सिंड्रोम, हा लहान मुलांना बाटलीतून दूध पिण्यामुळे होऊ शकतो.

बेबी बॉटल सिंड्रोम

बेबी बॉटल सिंड्रोमला ‘बॉटल कॅरीज’ किंवा ‘नर्सिंग बॉटल कॅरीज’ असंही म्हणतात, ही एक डेंटल कंडीशन आहे ज्यामध्ये लहान मुलांचे दुधाचे दात किडायला लागतात. जेव्हा मुलाला वारंवार बाटलीतून दूध, ज्यूस किंवा गोड पेयं दिली जाता तेव्हा ही समस्या उद्भवते. याचे मुख्य कारण म्हणजे बाटलीतून घेतलेल्या द्रवात असलेली साखर, जी दातांवर जमा होते आणि बॅक्टेरियांना वाढण्याची संधी देते.

हे बॅक्टेरिया एसिड तयार करतात जे दातांच्या वरच्या थराला (इनेमल) नष्ट करतात आणि पोकळी निर्माण करतात ज्यामुळे दात किडतात. जर त्याची लक्षणे दुर्लक्षित केली तर मुलाला दात दुखणं, दात पडणं, हिरड्यांचा इन्फेक्शन आणि बोलण्यात अडचण यासारख्या समस्या येऊ शकतात.

बेबी बॉटल सिंड्रोमची लक्षण

दातांवर पांढरे किंवा तपकिरी डाग हे कॅविटीचं सुरुवातीचं लक्षण असू शकतं. दात दुखतात, गरम किंवा थंड अन्न खाल्ल्याने झिनझिन्या येतात. दात पिवळे किंवा काळे पडणे, दात किडल्यामुळे दातांचा रंग बदलू शकतो. बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे हिरड्यांना सूज येते किंवा रक्तस्त्राव होतो. दात किडण्याचे प्रमाण वाढल्याने तोंडाला दुर्गंधी येते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुका दुष्काळाच्या छायेत असताना घोड धरणातील अवैध वाळू उपशामुळे शेतकरी चिंताग्रस्त

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असुन घोड धरणातील नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू…

8 तास ago

पुणे जिल्हा बँकेसाठी शिरुरमध्ये शिवसेनेची मोर्चेबांधणी; जिल्हाप्रमुख बाप्पुसाहेब शिंदे यांचे नाव चर्चेत

रांजणगाव गणपती (तेजस फडके) पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली असुन, जिल्ह्यातील…

8 तास ago

संतुलित आरोग्यासाठी मेडिटेशन करण्याचे फायदे

आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी अनेकदा डॉक्टर मेडिटेशन करण्याचा सल्ला देतात. मेडिटेशन हे केवळ मानसिक नव्हे तर…

12 तास ago

जिमला जायला वेळ नाही? बेली फॅट कमी करण्यासाठी फॉलो करा या सोप्या गोष्टी

पोटावर वाढलेली चरबी आपला पूर्ण लूक खराब करू शकते. हट्टी बेली फॅट कमी करण्यासाठी बऱ्याच…

12 तास ago

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींच्या लग्नासाठी शिवसेनेचा मदतीचा हात; एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी कुटुंबांना दिलासा देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची घोषणा…

12 तास ago

‘व्होट चोरी’च्या आरोपांवर संजय निरुपमांचा पलटवार; ‘पराभवानंतर निवडणूक आयोगाला लक्ष्य करणे योग्य नाही’

मुंबई: निवडणूक आयोग आणि मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणावरून सुरू असलेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना…

12 तास ago