आरोग्य

नाश्ता करण्याची योग्य वेळ

सकाळचा नाश्ता दिवसाचं पहिले अन्न असते, जे शरीराला दिवसभर उर्जा देण्यासाठी फायदेशीर ठरते. नाश्ता वेळच्यावेळी करणं महत्वाचं असतं. नाश्ता वेळेवर केला नाही तर थकवा येतो नि अशक्तपणा जाणवतो आणि दिवसभर उत्साह वाटत नाही, कामात मनही लागत नाही. सकाळच्या वेळी नाश्ता केल्याने रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहते आणि आजारांपासून बचाव होतो. म्हणूनच रोज नाश्ता करून दिवसाची सुरूवात करावी.

सकाळी ७ ते ८ दरम्यान नाश्ता करण्याची सगळ्यात योग्य वेळ असते. जर या वेळेत नाश्ता करू शकत नसाल तर सकाळी १० च्या आत नाश्ता करा. कारण रात्रभर उपाशी राहिल्यामुळे सकाळी शरीराला एनर्जीची आवश्यकता असते. सकाळी शरीरातील ग्लुकोजचा स्तर कमी असतो. नाश्ता केल्यानं शरीराला पुरेपूर एनर्जी मिळते आणि पचनक्रियाही चांगली राहते. सकाळी जर उशीरा उठलात तर उठल्यानंतर एक तासाच्या आत नाश्ता करायला हवा. सकाळी वेळेवर नाश्ता केल्यानं डायबिटीस, बीपीचे त्रास उद्भवत नाहीत. जर वेळेवर नाश्ता करत नसाल तर वजन वाढू शकतं, कारण नाश्ता स्किप केल्यामुळे इतर पदार्थ खाण्याचे क्रेव्हिग्स होतात. अशा वेळी जास्त खाऊ शकल्याने वजन वाढू शकतं.

नाश्त्यासाठी उत्तम पदार्थ

ओट्स हा एक हेल्दी आणि पौष्टीक नाश्ता आहे. यात फायबर्स मोठ्या प्रमाणात असते. ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते. ओट्स दूध, दही किंवा पाण्यासह खाऊ शकता.

दलिया ओट्स प्रमाणे एक पौष्टीक पदार्थ आहे. दलिया खिचडी किंवा दलिया उपमाचा नाश्त्याला समावेश करू शकता.

फळं आणि दही: फळं आणि दही एक स्वादीष्ट, पौष्टीक कॉम्बिनेशन आहे. दह्यातून प्रोटीन आणि कॅल्शियम मिळते, ज्यामुळे स्नायू चांगले राहतात.

पोहे खाल्ल्याने शरीराला भरपूर फायबर्स मिळतात. पोहे खाल्ल्या नंतर जवळपास ३ ते ४ तास भूक लागणार नाही.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुका दुष्काळाच्या छायेत असताना घोड धरणातील अवैध वाळू उपशामुळे शेतकरी चिंताग्रस्त

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असुन घोड धरणातील नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू…

8 तास ago

पुणे जिल्हा बँकेसाठी शिरुरमध्ये शिवसेनेची मोर्चेबांधणी; जिल्हाप्रमुख बाप्पुसाहेब शिंदे यांचे नाव चर्चेत

रांजणगाव गणपती (तेजस फडके) पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली असुन, जिल्ह्यातील…

9 तास ago

संतुलित आरोग्यासाठी मेडिटेशन करण्याचे फायदे

आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी अनेकदा डॉक्टर मेडिटेशन करण्याचा सल्ला देतात. मेडिटेशन हे केवळ मानसिक नव्हे तर…

12 तास ago

जिमला जायला वेळ नाही? बेली फॅट कमी करण्यासाठी फॉलो करा या सोप्या गोष्टी

पोटावर वाढलेली चरबी आपला पूर्ण लूक खराब करू शकते. हट्टी बेली फॅट कमी करण्यासाठी बऱ्याच…

12 तास ago

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींच्या लग्नासाठी शिवसेनेचा मदतीचा हात; एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी कुटुंबांना दिलासा देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची घोषणा…

12 तास ago

‘व्होट चोरी’च्या आरोपांवर संजय निरुपमांचा पलटवार; ‘पराभवानंतर निवडणूक आयोगाला लक्ष्य करणे योग्य नाही’

मुंबई: निवडणूक आयोग आणि मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणावरून सुरू असलेल्या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना…

12 तास ago