पायांना सूज येणे हि एक सामान्य समस्या आहे. पण ती जरी सामान्य समस्या असली तरी यामुळे आपल्या दैनंदिन आयुष्यावर मोठा प्रभाव पडतो. आपण जास्त हालचाल करू शकत नाही. एकाच ठिकाणी बसून राहावे लागते. जास्त चालू शकत नाही. रोजची कामे करू शकत नाही. अशावेळी आपण एकच प्रार्थना करत असतो की हि सूज लवकर कमी होऊन पाय पूर्ववत होऊ दे. अशा स्थितीत कधी कधी डॉक्टरांकडे जाणे सुद्धा शक्य होत नाही किंवा डॉक्टर कधी कधी उपलब्ध नसतात.
अशी वेळ आल्यास काय करावे…
तर तुम्ही काही घरगुती उपचार करून पायाची हि सूज कमी करू शकता. तुम्हाला पायाची सूज कमी करू शकतील असे काही लाभदायक उपाय सांगणार आहोत, जे तुम्ही घरच्या घरी करून पायाच्या सुजेपासून आराम मिळवू शकता. चला जाणून घेऊया काय आहेत ते उपचार.
जाडे मीठ म्हणजे हाइड्रेटेड मॅग्नीशियम सल्फेटचे क्रिस्टल असतात, जे स्नायुंमधील वेदनेपासून आराम मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. अर्धा कप जाडे मीठ गरम पाण्याने भरलेल्या एक टब किंवा बादलीमध्ये टाकावे. आता या पाण्यात १० ते १५ मिनिटे आपले पाय बुडवून ठेवावे. रात्री झोपण्यापूर्वी हा उपाय करणे जास्त फायदेशीर ठरत असल्याचे दिसून आले आहे. मिठातील हाइड्रेटिड मॅग्नीशियम सुजेवर हळूहळू परिणाम करून पायांना आराम मिळवून देतं.
हा उपाय तुम्हाला सर्वांना माहित असेलच आणि कोणत्याही अवयवावर सूज आली किंवा अवयव दुखू लागला, वेदना होऊ लागल्या तर हा सगळ्यात सोप्पा पर्याय आपण वापरून पाहतोच. तर जेव्हा पायाला सूज येते तेव्हा एका स्वच्छ कपड्यात ४ ते ५ बर्फाचे तुकडे घेऊन ज्या ठिकाणी सूज आली आहे त्या ठिकाणी किमान १० मिनिटे तरी शेक द्यावा. बर्फ लावल्याने रक्तप्रवाह अधिक चांगला होतो आणि यामूळेच सूज आणि वेदना सुद्धा कमी होते. डॉक्टरकडे जाण्यापूर्वी आवर्जून हे उपाय वापरून पहा, जर या उपायांनी सुद्धा काही फरक पडत नसले तर मात्र तुम्ही शक्य तितक्या लवकर तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…