आरोग्य

गरम पदार्थ खाल्ल्यानंतर थंड पाणी पिण्याची सवय पडू शकते महागात

घशाला आराम देण्यासाठी आणि शरीराला उष्णतेपासून वाचवण्यासाठी आपण पाणी पितो. गार पाणी प्यायल्याने कोरड्या घशाला आराम तर मिळतो तसेच मन देखील तृप्त होते. थंड पाणी प्यायल्यानंतर गरमा गरम जेवल्याने आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. थंड गरम पदार्थ खाल्ल्याने आरोग्य बिघडते. यामुळे शरीराचे तापमान वाढू शकते. तसेच कोणतेही पदार्थ खाताना ऋतुमानानुसार खावे. अचानक थंड आणि गरम पदार्थ खाल्ल्याने शरीराला नुकसान कसे होते.

थंड पाणी शरीराच्या पचनसंस्थेवर परिणाम करते. अन्न पचवण्यासाठी पचनसंस्थेत एन्झाईम्स आणि जठरासंबंधी रस सक्रिय असतात. ज्यावेळी आपण थंड पाणी पितो तेव्हा शरीराचे अंतर्गत तापमान अचानक कमी होते. ज्यामुळे पचनक्रिया मंदावते. खूप थंड पाणी पोटाची आग कमकुवत करते. ज्यामुळे अन्न व्यवस्थित पचत नाही.

थंड-गरम पदार्थ खाल्ल्याने होणारा परिणाम 

1) शरीराचे तापमान सुमारे ३७ अंश सेल्सिअस असते. जर गरम पदार्थ खाल्ल्याने लगेच थंड पदार्थ खाल्ले तर शरीराच्या तापमानावर परिणाम होतो. यामुळे घसा खवखवणे, सर्दी-खोकल्यासारखे आजार उद्भवतात.

2) जास्त थंड पाणी प्यायल्याने शरीरातील नैसर्गिक तापमानावर परिणाम होतो. आरोग्यतज्ज्ञांच्या मते यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊ शकते. थंड पाण्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. ज्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह मंदावतो.

3) थंड पाण्यामुळे पचन एंजाइमची प्रक्रिया मंदावते. या पचनाच्या समस्येमुळे शरीराच्या चयापचय प्रक्रियेवर परिणाम होतो. त्यामुळे वजन वाढण्याचा धोका असतो.

4) गरम पदार्थांसोबतच शरीराचे तापमान जास्त असताना थंड पाणी पिण्याची काळजी घ्यायला हवी. व्यायाम केल्यानंतर लगेच फ्रीजमधले पाणी पिणे शरीराला हानिकारक ठरु शकते. व्यायाम केल्यानंतर शरीर गरम होते आणि अचानक थंड पाणी प्यायल्याने शरीराच्या तापमानात बदल होतो. ज्यामुळे स्नायूंचा कडकपणा आणि थकवा वाढू शकतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘मतदारांची नावे वगळल्याचा’ आरोप; ज्ञानेश कुमार यांच्या अटकेच्या मागणीसाठी काँग्रेसचे २८ सप्टेंबरला राज्यभर आंदोलन

मुंबई: निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फी…

10 तास ago

मोतीबन-कोठारी परिवार म्हणजे एकत्र कुटुंब, आदर्श कुटुंब!

एकत्र आणि मोठे कुटुंब असणे ही केवळ संख्येची बाब असते; मात्र त्या मोठ्या कुटुंबातील माणसांची…

11 तास ago

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; विविध सवलती लागू

मुंबई: खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये…

12 तास ago

अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसची निवडणूक समिती जाहीर; ११ जणांवर जबाबदारी

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमरावती विभाग…

12 तास ago

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा मदतीचा जीआर; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

चंद्रपूर: राज्य सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आश्वासने…

12 तास ago

दुष्काळ जाहीर करून चालणार नाही; हेक्टरी १ लाख रुपये तातडीने खात्यात जमा करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील ७५ टक्के भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना ठोस आणि भरीव…

12 तास ago