आरोग्य

पावसाळ्यात साप निघण्याचं प्रमाण वाढतं! खबरदारी म्हणून ५ गोष्टी करा, सापांपासून बचाव होईल

पावसाळ्याच्या दिवसांत साप निघण्याचं प्रमाण बरंच वाढत असतं. त्यामुळे सापांपासून बचाव हाेण्यासाठी काही गोष्टींची काळजी घ्यायलाच हवी.

ज्या ठिकाणी साप निघण्याचा धोका असतो त्यांनी बूटं कधीही उघड्यावर ठेवू नयेत. बुटांमध्ये साप जाऊन बसण्याची शक्यता असते.

पावसाळ्यात घराभोवती गवत खूप वाढतं. हे सगळं रानगवत काढून टाका आणि घराच्या आजुबाजुचा परिसर स्वच्छ करून घ्या. स्वच्छ, मोकळ्या परिसरात साप फिरत नाहीत.

घरातल्या एखाद्या खोलीत अडगळीचं सामान ठेवलेलं असेल तर ती खोली व्यवस्थित पॅक करा. त्या खोलीचे दरवाजे, खिडक्या उघड्या ठेवू नका. अन्यथा अडगळीमध्ये साप जाऊन बसण्याची शक्यता जास्त असते.

डांबर गोळ्यांच्या वासाने साप दूर जातो. त्यामुळे जिथून साप येण्याची भीती असते त्या सगळ्याच ठिकाणी डांबर गोळ्या टाकून ठेवा.

घराच्या आजुबाजुला गवतीचहा, झेंडू, कांद्याची पात, लसणाची पात, पुदिना अशी रोपं लावा. या रोपांच्या वासामुळे साप लांब राहण्यास मदत होते.

cedarwood essential oil घ्या आणि त्यामध्ये दालचिनी, लवंग पावडर घाला. हे तेल घराच्या आजुबाजुला नियमितपणे शिंपडा. साप दूर पळतील.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

5 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

11 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

12 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

12 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

12 तास ago

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वसूल केलेली रक्कम परत द्या; चंद्रकांत पाटील

पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…

12 तास ago