आरोग्य

पावसाच्या दिवसात सतत होणारा सर्दी-पडसा ‘या’ नॅचरल उपायांनी लगेच वाटेल फ्रेश

सगळीकडेच आता पावसाला जोरदार सुरूवात झाली आहे. उकाडा जाऊन आता गारवा आणि मातीचा सुगंध पसरला आहे.

वातावरणात बराच बदल झाला आहे. अर्थात वातावरण बदलाचा प्रभाव आपल्या आरोग्यावरही बघायला मिळतो. या दिवसांमध्ये सर्दी-पडस्याचा त्रास सतत होत राहतो. एकदा का सर्दी झाली तर कशातही मन लागत नाही. मग अंगदुखी आणि तापही येतो. अशात या दिवसांमध्ये सतत होणाऱ्या सर्दी-पडस्यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायही करू शकता. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

लसूण

1) पावसाच्या दिवसांमध्ये जर तुमचा कान दुखत असेल तर तुम्हाला घश्यात इन्फेक्शन असण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुम्हाला सर्दी खोकला होऊ शकतो. अशावेळी काही लसणाच्या कळ्या घ्या, त्या ठेचून कापडात बांधा व कानात वरच्यावर ठेवा. त्या कानात जाणार नाहीत याची काळजी घ्या.

2) लसणाच्या ४-५ कळ्या ठेचून त्या तुपात भाजून खा. हा सर्दी खोकल्यावरील एक सोपा उपाय आहे. याव्यतिरिक्त ४ लसणाच्या कळ्या, २ टोमॅटो व एका लिंबाचा रस काढून तो घेतल्यास इन्फेक्शन दूर होण्यास मदत होते. असेच तुम्ही लसूण व टोमॅटोचे एकत्र सूप बनवून त्यात थोडेसे मीठ टाकून पिऊ शकता.

हळद 

1) घशाच्या खवखवीवर हळद अत्यंत उपयुक्त आहे. मुळातच हळद जंतुनाशक असल्याने ती संसर्ग वाढू देत नाही. ग्लासभर गरम दुधात चिमुटभर हळद व साखर किंवा मध घालून प्या. हे दूध सर्दी – खोकला दूर करते त्याचबरोबर तुम्हाला दिवसभर उर्जा देते.

2) हळदीचा चहा सुद्धा सर्दी – खोकला दूर करतो. या चहासाठी चार कप पाण्यात एक छोटा चमचा हळद टाकून उकडा. १० मिनिटांनंतर तो गाळून घ्या व त्यात थोडेसे मध व लिंबू पिळून प्या. यामध्ये उकडताना तुम्ही तुळशीच्या पानांचा देखील वापर करू शकता.

आयुर्वेदिक काढा

हळदीच्या चहाप्रमाणेच गवती चहा, आलं, लवंग, काळामिरी व दालचीनी यांचा एकत्र काढा सर्दी खोकला बरा करतो, तसेच शरीराची रोग प्रतिकारकशक्ती सुद्धा वाढते.

कसा बनवाल काढा

1) चार वेलची, काळीमिरीचे दाणे, लवंग, ताजं आलं व दालचीनीचा छोटा तुकडा पातेल्याभर पाण्यात टाकून मंद आचेवर 10 -15 मिनिटे उकडा. उकडताना पातेल्यावर झाकण ठेवा. त्यानंतर हे मिश्रण गाळून ते गरम गरम प्या. गोडव्यासाठी त्यात थोडेसे मध घाला.

2) 10-15 तुळशीची पानं दीड कप पाण्यात उकडा. दहा मिनिटांनी हे मिश्रण गाळून त्यात चमचाभर लिंबाचा रस मिक्स करा. यातील व्हिटामिन सी व तुळस तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवतं.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

4 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

11 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

11 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

12 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

12 तास ago

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वसूल केलेली रक्कम परत द्या; चंद्रकांत पाटील

पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…

12 तास ago