शिरूर तालुका

अॅड. उदय सरोदे यांना ‘भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल हिंदुरत्न पुरस्कार’ जाहीर

सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल, ३१ ऑक्टोबर रोजी पुण्यात होणार सन्मान सोहळा

शिरूर (अरुणकुमार मोटे): उरुळी कांचन (ता. हवेली) येथील डॉ. मणिभाई देसाई मानव सेवा ट्रस्ट व डॉ. रवींद्र भोळे आरोग्य सेवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी दिला जाणारा “भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल हिंदुरत्न पुरस्कार – २०२५” यंदा घोडनदी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. उदय सरोदे यांना जाहीर झाला आहे.

हा पुरस्कार राष्ट्रपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त समाजसेवा, राष्ट्रीय एकता व मानवकल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. पुरस्कार प्रदान समारंभ ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी पुणे येथे पार पडणार असून विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत अॅड. सरोदे यांचा गौरव करण्यात येणार आहे.

अॅड. उदय सरोदे हे न्हावरे फाटा (ता. शिरूर) येथे मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी निवासी विद्यालय चालवतात. शिक्षण, संस्कार आणि समाजाभिमुख मूल्ये जोपासणाऱ्या या संस्थेमुळे अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनात परिवर्तन घडले आहे. सामाजिक जाण, मानवतेची भावना आणि दुर्बल घटकांसाठी सातत्याने कार्य करण्याची त्यांची वृत्ती या सर्व कारणांमुळेच या प्रतिष्ठित सन्मानासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.

या पुरस्कारामुळे केवळ अॅड. सरोदे यांचा नव्हे, तर घोडनदी बार असोसिएशन व शिरूर तालुक्याचा मान अधिक उंचावला आहे. स्थानिक नागरिक, सहकारी व सामाजिक संस्थांकडून अॅड. सरोदे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.समाजातील उपेक्षित घटकांसाठी कार्य करणे हीच खरी देशसेवा आहे. हा पुरस्कार माझ्यासाठी प्रेरणादायी ठरेल,” असे अॅड. सरोदे यांनी या प्रसंगी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

5 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

11 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

12 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

12 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

12 तास ago

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वसूल केलेली रक्कम परत द्या; चंद्रकांत पाटील

पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…

13 तास ago