आरोग्य

तरुणांसाठी ‘सायलेंट किलर’ ठरतोय ‘हा’ आजार; वेगाने होतोय प्रसार, दिसत नाहीत लक्षण

एक काळ असा होता जेव्हा हायपरटेन्शन म्हणजेच हाय ब्लड प्रेशर हा आजार वृद्ध लोकांशी संबंधित मानला जात होता, परंतु आता ही परिस्थिती वेगाने बदलत आहे. आजच्या काळात हाय ब्लड प्रेशर ही विशेषतः तरुणांमध्ये एक सामान्य समस्या बनत चालली आहे. तज्ज्ञांच्या मते, हे एका ‘सायलेंट किलर’सारखं आहे जे शरीराला हानी पोहोचवतं आणि त्याची लक्षणं दिसत नाहीत.

आरोग्याशी संबंधित अनेक रिपोर्टमधून असं दिसून आलं आहे की, हाय ब्लड प्रेशर ही केवळ ब्लड प्रेशरची समस्या नाही तर ती मेटाबॉलिक डिसफंक्शन, सबक्लिनिकल एथेरोस्क्लेरोसिस आणि फॅटी लिव्हर सारख्या अनेक गंभीर आजारांशी देखील संबंधित आहे. सामान्य आरोग्य चाचण्यांमध्ये या सर्व समस्यांकडे दुर्लक्ष केलं जातं. तज्ज्ञांच्या मते, कधीकधी हृदयासंबंधित आजाराची सुरुवातीची लक्षणं अशा लोकांमध्ये देखील आढळतात ज्यांच्यामध्ये कोणतीही स्पष्ट लक्षणं दिसत नाहीत. तसेच काही लोकांमध्ये फॅटी लिव्हरची समस्या देखील आढळून आली.

हाय ब्लड प्रेशर हा एक सायलेंट आजार आहे, जो अनेकदा कोणत्याही लक्षणांशिवाय विकसित होतो. जर तो वेळीच नियंत्रित केला नाही तर ते हृदयरोग, स्ट्रोक, किडनी समस्या आणि इतर अनेक गंभीर आजारांना कारणीभूत ठरू शकतो.

हाय ब्लड प्रेशर का आणि कसं होत

हाय ब्लड प्रेशर अनेक कारणं आहेत. यामध्ये लाईफस्टाईल, पर्यावरण आणि अनुवांशिक घटक महत्त्वाचे आहेत. याची इतरही अनेक कारणं आहेत.

वाढतं वय 

मीठ आणि प्रक्रिया केलेले पदार्थ जास्त प्रमाणात खाणे

जास्त वजन किंवा लठ्ठपणा

शारीरिक हालचालींचा अभाव

दारू आणि धूम्रपान

ताणतणाव

फॅमिली हिस्ट्री

किडनीचा आजार किंवा हार्मोनल डिसबॅलेन्स

हाय ब्लड प्रेशरचे संभाव्य धोके

जर हाय ब्लड प्रेशरवर वेळेवर उपचार केले नाहीत तर ते शरीराच्या अनेक महत्त्वाच्या अवयवांना नुकसान पोहोचवू शकतं.

हृदयरोग (जसं की हार्ट अटॅक, हार्ट फेल्युअर, अनियमित हृदयाचे ठोके)

न्यूरोलॉजिकल समस्या (जसं की स्ट्रोक)

किडनीचा आजार आणि किडनी फेल्युअर

डोळ्यांना रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांचे नुकसान, ज्यामुळे दृष्टी कमी होऊ शकते.

पायांना रक्तपुरवठा कमी होणं.

जेव्हा मधुमेह आणि लठ्ठपणा एकत्र असतात तेव्हा धोका अनेक पटींनी वाढतो.

कसा रोखायचा ‘हा’ आजार

संतुलित आहार घ्या; मीठ कमी करा, फळं, भाज्या जास्त खा. नियमित व्यायाम करा – हे वजन नियंत्रणात ठेवण्यास आणि ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत करतं. अल्कोहोल आणि तंबाखू टाळा – हे ब्लड प्रेशर वाढवतात आणि रक्तवाहिन्यांचं नुकसान करतात. जास्त ताण घेऊ नका – योग, ध्यान, दीर्घ श्वास घेणं यासारख्या गोष्टींचा वापर करा. नियमित तपासणी करा – लक्षणं नसली तरीही ब्लड प्रेशर होऊ शकतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मेंदुत रक्ताची गाठ तयार झाल्याचं कसं ओळखाल जाणून घ्या काय दिसतात लक्षण

सामान्यपणे जेव्हा एखाद्या व्यक्तीला जखम झाली किंवा कुठं खरचटलं तर रक्त निघतं. हे रक्त निघणं…

8 तास ago

कडूलिंबातील औषधी गुण

कडूलिंबाचा प्राचीन काळापासून आयुर्वेदिक औषधी म्हणून वापर होत आहे. हे एक असं झाड आहे, जे…

8 तास ago

औषधांच्या वेळा पाळण्यापेक्षा जेवणाच्या वेळा पाळ्णं हे जास्त फायद्याच

केवळ जेवणाची वेळ बदलली तरी अनेक आजार बरे होतात, बरे नाही, निघूनच जातात कायमचे. त्यासाठी…

8 तास ago

ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणाला धक्का लावून निवडणुका नकोत! विजय वडेट्टीवारांचा सरकारला इशारा

‘आरक्षणाच्या जागा कमी झाल्यास मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जबाबदार’; ओबीसींच्या राजकीय प्रतिनिधित्वासाठी केंद्राकडे पाठपुराव्याची मागणी…

9 तास ago

शिरूर नगरपरिषदेत राजकीय भूकंप! उपनगराध्यक्ष मितेश गादिया यांची खुर्ची अविश्वास ठरावाने धोक्यात

२० नगरसेवकांचे ठरावाला समर्थन; गादियांसह राष्ट्रवादीच्या सहा नगरसेवकांचा सभात्याग शिरूर (तेजस फडके): शिरूर नगरपरिषदेच्या राजकारणात…

16 तास ago

शिरूर पोलीस ठाण्यासमोरच दोन गटांत तुफान हाणामारी

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूरमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून चक्क पोलीस ठाण्यासमोरच दोन…

16 तास ago