कधी कधी स्वयंपाक करताना हाताला तिखट- मीठ लागलं की नखाच्या आजुबाजुच्या त्वचेतून आग होऊ लागते. खूप सलू लागतं. मग पाहिल्यानंतर लक्षात येतं की त्या भागातल्या त्वचेची सालं निघायला लागली असून त्यातून बारीकसं रक्त सुद्धा येत आहे. ते साल एवढं बारीक असतं की नेलकटरनेही कापून निघत नाही. बऱ्याचदा तर हाताने ओढूनच काढून टाकावं लागतं. असं करताना तर खूपच वेदना हाेत लहान मुलांच्या बाबतीत तर हा त्रास जास्त दिसून येतो.
नखाच्या आजुबाजुची त्वचा कोरडी पडून सालं निघू नये म्हणून काय करावे.
१) यामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की ज्यांची त्वचा कोरडी असते, त्यांना हा त्रास हाेतो. शिवाय ऋतू बदलण्याचा जो काळ असतो, त्या काळात हा त्रास जास्त वाढतो. त्यामुळे ज्यांना वारंवार असा त्रास होतो, त्यांनी ऋतू बदलायच्या सुमारास त्वचेची थोडी जास्त काळजी घ्यावी. नखाच्या आजुबाजुला मॉईश्चरायझर, खोबरेल तेल, बदाम तेल, साजूक तूप लावून ती त्वचा अधिकाधिक हायड्रेटेड, मॉईश्चराईज राहिल याची काळजी घ्यावी.
२) शरीरात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन्सची कमतरता असणे हे देखील यामागचं एक लक्षण आहे. त्यामुळे तुम्हालाही हा त्रास वारंवार होत असेल तर तुमच्याही आहारात कॅल्शियम आणि व्हिटॅमिनयुक्त पदार्थ कमी प्रमाणात जात आहेत का हे एकदा तपासून पाहा. कॅल्शियमयुक्त पदार्थ जास्त प्रमाणात खायला सुरुवात करा.
३) नखांची, हाताची योग्य पद्धतीने स्वच्छता होत नसेल तर त्यामुळेही जंतूसंसर्ग होऊन हा त्रास होऊ शकतो. किंवा तो कमी प्रमाणात असेल तर वाढू शकतो. त्यामुळे हाताची, नखांची स्वच्छता ठेवा. नखे वेळेवर कापा. नखांमध्ये घाण जमा होऊ देऊ नका, असा सल्लाही डाॅक्टर देतात.
(सोशल मीडियावरून साभार)
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…
नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…