महाराष्ट्र

पंकजा मुंडेंना काँग्रेसची खुली ऑफर; ‘भाजप सोडा, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हा’

राजकारणातून रिटायर व्हावंसं वाटतं’ वक्तव्यानंतर विजय वडेट्टीवारांचे मोठे आवाहन; राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण

मुंबई : भाजपच्या वरिष्ठ नेत्या आणि राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी केलेल्या “राजकारणातून रिटायर व्हावंसं वाटतं” या वक्तव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी पंकजा मुंडे यांना भाजप सोडून काँग्रेसमध्ये येण्याची आणि महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याची खुली ऑफर दिली आहे.

विजय वडेट्टीवार म्हणाले, गोपिनाथ मुंडे यांच्या निधनानंतर भाजपमध्ये ओबीसी नेतृत्वाला अपेक्षित स्थान मिळत नसल्याची भावना आहे. पंकजा मुंडे यांनाही पक्षात न्याय मिळत नसल्याचे वाटत असेल, तर त्यांनी भाजपमधून बाहेर पडून स्वतंत्र नेतृत्व करावे. काँग्रेस त्यांना पूर्ण पाठिंबा देईल आणि पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून योग्य निर्णय घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी वडेट्टीवार यांनी ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांवरही भाष्य केले. विदर्भातील ११ जिल्ह्यांत आयोजित मंडल यात्रेद्वारे ओबीसी जातनिहाय जनगणना, स्वतंत्र ओबीसी मंत्रालय, महाज्योतीसाठी वाढीव निधी आणि ओबीसी समाजातील रिक्त पदांचा बॅकलॉग तातडीने भरण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, पंकजा मुंडे यांनी परळी महामार्गाच्या दुरवस्थेवर नाराजी व्यक्त करताना “आता कंटाळा आलाय, राजकारणातून रिटायर व्हावंसं वाटतं,” असे वक्तव्य केले होते. मात्र, सभास्थळी उपस्थित नागरिकांचा उत्साह पाहून नव्याने प्रेरणा मिळाल्याचे सांगत त्यांनी विकासासाठी काम सुरूच ठेवणार असल्याचा संदेश दिला.

राजकीय विश्लेषकांच्या मते, पंकजा मुंडे या भाजपमधील प्रभावी ओबीसी नेत्या असून त्यांचा मोठा समर्थक वर्ग आहे. त्यामुळे त्यांनी भविष्यात पक्षांतराचा निर्णय घेतल्यास राज्यातील राजकीय समीकरणांवर, विशेषतः ओबीसी मतदारांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे काँग्रेसची ही ऑफर आगामी राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाची रणनीती मानली जात आहे.

मात्र, पंकजा मुंडे यांनी काँग्रेसच्या या ऑफरवर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

19 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago