आरोग्य

जवस तेलाचे उपयोग

जवस हे एक गळिताचे धान्य आहे. यालाच मराठीत अळशी, गुजराथीत अलसी, हिंदीत अलसी किंवा तिसी, कानडीत अल्सी आणि आलसी आणि संस्कृतमध्ये अलसी, अतसी, अतसिका, हैमवती, मदगंधा, मलीना, तैलोत्तमा, नीलपुष्पी, उमा किंवा क्षुमा म्हणतात.

जवसाचा उगम इजिप्त देशातील आहे. महाराष्ट्रात व भारतात जवस हे हिवाळ्यातले (रब्बीचे) पीक आहे… याच्या एका फळात दहा टोकदार चकचकीत चपट्या बिया असतात. त्या बियांपासून तेल निघते. विदर्भात जवसाचे तेल खाद्यपदार्थांमध्ये वापरतात. याच्या वापराने दृष्टी मंदावते आणि नपुंसकत्व येते असा समज आहे.

जवसाच्या बियांची भुकटी करून चविष्ट चटणी करतात. खोडाच्या अंतर्सालीपासून धागा निघतो. जवस हे समशीतोष्ण प्रदेशातील रोप आहे. रेशेदार पिकात याचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. याच्या रेशेपासुन कापड, दोरी, रस्सी आणि टाट बनवले जाते याच्या बियांपासून तेल निघते या तेलाचे वापर वार्निश, रंग, साबुन, रोगन, पेन्ट तयार करण्यासाठी केला जातो. चीन सनचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे रेशे साठी सनला उत्पादित करणारे देशात रूस, पोलैण्ड, नीदरलैण्ड, फ्रांस, चीन आणि बेल्जियम प्रमुख आहे व बी काढण्यातील देशात भारत, संयुक्त राज्य अमरीका आणि अर्जेण्टाइनाचे नाव उल्लेखनीय आहे. सनचे प्रमुख निर्यातक रूस, बेल्जियम तथा अर्जेण्टाइना आहे.

जवसाला मंदगंधयुक्त, मधुर, बलकारक, किंचित कफवात-कारक, पित्तनाशक, स्निग्ध, पचनास भारी, गरम, पौष्टिक, कामोद्दीपक, पाठीच्या दुखणे कमी करणारे व सूजेला नष्ट करणारे म्हटले अाहे… गरम पाण्यात टाकून बीज किंवा याच्या बरोबर एक तृतीयांश भाग मुलेठीचा चूर्ण मिसळून क्वाथ (काढ़ा) बनवले जाते जे रक्तातिसार आणि मूत्र संबंधी आजारात उपयोगी म्हणले आहे.

जवस तेलाचे उपयोग

हे तेल वापरून तैलरंग, व्हॉर्निश, सौम्य साबण, छपाईची शाई वगैरे बनते. वंगणे, मलमे आणि चामड्याचे पॉलिशसाठीही अळशीच्या तेलाचा उपयोग होतो. तेल काढून उरलेली पेंड, गुरांच्या सकस खाद्यासाठी अणि खत म्हणून वापरतात. पशुवैद्य या तेलाचा उपयोग दुभती जनावरे आणि घोडे यांच्याकरिता रेचक म्हणून करतात.

औषधी गुणधर्म

बियांच्या वापराने पित्तभावना, पाठदुखी आणि दाह-क्षोभ आदी कमी होते. व्रण आणि लघवीच्या त्रासावर गुणकारी. खोकल्यावर आणि मूत्रपिंडाच्या विकारांवर आराम पडण्यासाठी जवसाच्या बिया चांगल्या असतात. साल आणि पाने परम्यासाठी उपयोगी, तर जाळलेली साल भळभळ वाहणारे रक्त थांबवते आणि जखमा भरण्यास उपयोगी पडते. फुले मेंदू आणि हृदयासाठी पौष्टिक. युनानी वैद्य अंतर्गत जखमांसाठी बियांचे सेवन करण्यास सांगतात तर त्याच बियांचा गजकर्णादी वापर त्वचारोगांवर बाह्योपचाराने करतात. चुन्याच्या निवळीत मिसळलेले तेल हा कातडीच्या भाजण्यावरचा फायदेशीर उपाय आहे.

जवसामध्ये ‘ओमेगा-३’ या मेदाम्लाचे प्रमाण सुमारे ५८% राहते त्यामुळे, हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्या अवरुद्ध होत नाहीत… जवस हे रक्तातील कॉलेस्टेरॉलचे प्रमाण ९ ते १८ टक्क्याने कमी करते. हे सांधेदुखी कमी करते तसेच यामुळे ‘ग्लिसराईड’चे प्रमाण कमी होते.याचे सेवनाने आतड्याचा कर्करोग होत नाही. अकाली वृद्ध्त्व टळते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

तीन हजारांच्या पारितोषिकासाठी अनवाणी धावली आई; आता देशभरातून मदतीचा हात

बीड : मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी अवघ्या तीन हजार रुपयांच्या पारितोषिकाच्या आशेने अनवाणी धावत, हातात…

3 तास ago

हेक्टरी १ लाखांची मदत, सरसकट कर्जमाफी आणि विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्याची हर्षवर्धन सपकाळांची मागणी

मुंबई/बुलढाणा: मागील ४० ते ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके करपून गेली असून राज्यातील शेतकरी गंभीर…

4 तास ago

शिरूर तालुक्यात क्रिकेट खेळण्यावरून तुफान राडा; बॅट-स्टंपने मारहाण; पाच जणांना अटक…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…

19 तास ago

पाबळ-कान्हूर-केंदूर! निवडणूक आली की पाण्याची चर्चा; टंचाई मात्र कायमच!

पाबळ (सुनिल जिते) : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील पाबळ, कान्हूर मेसाई आणि केंदूर परिसरात यंदा…

19 तास ago

रांजणगावमध्ये कोयत्याने जीवघेणा हल्ला करणारे आरोपी 12 तासात अटक LCB आणि रांजणगाव MIDC पोलिसांची संयुक्त कारवाई

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव येथील वामन वाईन्ससमोर किरकोळ वादातून तरुणावर आणि त्याला वाचवण्यासाठी मध्ये…

1 दिवस ago

शिरुर शहरात गोळीबार करणाऱ्या तिघांना DB पथकाने सुपा टोलनाक्यावर सापळा लावत ४८ तासांत घेतलं ताब्यात

शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील लाटेआळी-आंबेडकरनगर परिसरात शुक्रवारी (१८) सकाळी साडे-सहाच्या सुमारास झालेल्या गोळीबारात हरिष…

1 दिवस ago