आरोग्य

ऑटोइम्यून डिसऑर्डर म्हणजे काय? आपलंच शरीर आपल्यावरच हल्ला करतं ते कशामुळे, काय उपाय

ऑटोइम्यून डिसऑर्डर हा शब्द तुम्ही कधी ना कधी ऐकला असेल किंवा कुठे वाचला असेल. ही एक गंभीर स्थिती आहे. यात शरीराची इम्यूनिटी बाहेरील वायरसऐवजी आपल्याच सेल्स आणि टिश्यूंना आपला वैरी मानतात. विचार करा अशात शरीरात किती समस्या होतील. त्यामुळे ऑटोइम्यून डिसऑर्डर काय आहे आणि तो कशामुळे होतो हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. कारण आजकाल या आजारांच्या भरपूर केसेस समोर येत आहेत.p

ऑटोइम्यून डिसऑर्डर का होतो…

ऑटोइम्यून डिसऑर्डर होण्याचं मुख्य कारण व्हिटॅमिन डी ची कमतरता आहे. जास्तीत जास्त लोकांचा जास्त वेळ घरात किंवा ऑफिसमध्ये जातो. उन्हाच्या संपर्कात कमी राहत असल्यानं शरीराला पुरेसं व्हिटॅमिन डी मिळत नाही. अशात ऑटोइम्यून डिसऑर्डर सोबतच आरोग्यासंबंधी इतरही समस्यांचा धोका वाढतो.

ऑटोइम्यून डिसऑर्डरची लक्षणं…

ऑटोइम्यून डिसऑर्डर झाल्यास किडनी, फुप्फुसं, हृदय आणि मेंदूसहीत कोणतेही अवयव प्रभावित होऊ शकतात. यामुळे सूज, स्नायूंमध्ये वेदना, कमजोरी, काविळ, खाज, श्वास घेण्यास अडचण, शरीरात पाणी जमा होणे अशीही लक्षणं दिसतात.

करू नका या चुका…

जर तुम्ही तुमचं शरीर ९० टक्के झाकून ठेवत असाल किंवा उन्हापासून बचाव करण्यासाठी वेगवेगळे सनस्क्रीन लावत असाल तर यामुळे व्हिटॅमिन डी शरीरात पोहोचण्यास अडचण निर्माण होते. उन्हापासून बचाव करणं महत्वाचं आहेच, पण सोबतच व्हिटॅमिन डी मिळवणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. असं आढळून आलं आहे की, सरासरी ४ पैकी ३ लोकांमध्ये व्हिटॅमिन डी ची करतरता असते.

शरीरातील कोशिकांच्या रिसेप्टर्समध्ये व्हिटॅमिन डी खूप महत्वाचं आहे. शरीराला आपल्या सेल्सच्या क्षमतेचा पूर्ण फायदा मिळवण्यासाठी व्हिडॅमिन डी ची गरज असते. तेव्हाच आपलं इम्यून सिस्टीम योग्यपणे काम करेल. तेव्हाच आपल्या शरीराचं डिफेन्स मेकॅनिझन मजबूत राहील आणि वेगवेगळ्या आजारांपासून आपला बचाव होईल.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

दिवसा घरफोडीचा थरार! शेतात गेलेल्या कुटुंबाचा फायदा घेत १७ तोळे सोन्यावर डल्ला; शिरूर तालुक्यात खळबळ

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील संविदणे गावात भरदिवसा झालेल्या धाडसी घरफोडीने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण…

8 तास ago

भारतातील सायबर फसवणुकीचा पैसा शिरूरच्या बँकेत; रॅकेट उघडकीस…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : भारतात सायबर गुन्हेगारीने धोकादायक स्वरूप धारण केले असून, ऑनलाइन फसवणुकीतून उकळलेली…

9 तास ago

शिरूर तालुक्यात पुन्हा बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील पिंपळसुटी येथे बुधवारी पहाटे घडलेल्या हृदयद्रावक घटनेने…

9 तास ago

विद्यार्थ्यांच्या आंदोलनात भाजपाला अजेंडाच दिसतो; अण्णा आंदोलनातून भाजपानेच राजकारण केले; हर्षवर्धन सपकाळ

नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला आणि मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा जोरदार पलटवार मुंबई: नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून…

1 दिवस ago

विनाअनुदानित महाविद्यालयांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णयाचे संकेत; मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील महाविद्यालयांना आर्थिक पाठबळ, शुल्कवाढ, मान्यता व कर्मचारी धोरणासह विविध मागण्यांवर…

1 दिवस ago

शिरुर पोलिसांचा नवीन पॅटर्न; ‘कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल’ करडे गोळीबार प्रकरणातील आरोपींची काढली धिंड; पाहा Video

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत…

1 दिवस ago