आरोग्य

वात दोष म्हणजे काय

स्नायूंचे थकणे, सांधेदुखी, सांधे आखडणे, डोके दुखी, अपचन, वजन घटणे, मरगळ, शरीर ताठरणे, शरीर थरथरणे, अशक्तपणा, पोटदुखी, कोरडेपणा, भीती या आजारांच्या त्रासाला शरीरात वात दोष कारणीभूत असतो.

वात वाढल्यावर काय खावे

किमान १ चमचा शुध्द तूप एकावेळी आहारात हे वातावर नियंत्रण ठेवणारे आहे. त्यासाठी तूप खाण्याची अवस्था शरीराची अगोदर पासून ठेवणं आवश्यक आहे.

वात प्रकृती असताना काय खाव

आहारात सहा रस मानले जातात- मधुर, आंबट, खारट, तिखट, कडू आणि तुरट. वात प्रकृती असलेल्यांनी मधुर, आंबट, खारट रस असलेले खाद्यपदार्थ खाल्ले तर चालतील. पण तिखट, कडू, तुरट हे रस वात वाढवणारे असल्यामुळे ते कमीत कमी खावेत. कोकम सरबत नियमित प्यावं. आहारात मधुर रसाची फळं खावीत. रोजच्या जेवणात लिंबाचा समावेश असावा. ताकही या व्यक्तींना चांगलंच. साजूक तूप, लोणी, ओलं खोबरं पदार्थात नियमित वापरावं. तीळ, जवस, काऱ्हळे या तेलबियाची चटणी चांगली, त्यानं वात नियंत्रणात येतो. कडधान्यात मूग चांगला.

वात वाढल्यावर काय खाऊ नये

सर्व प्रकारच्या कोरड्या उसळी, कोरडे अन्न, थंड अन्न, स्नेह नसलेले पदार्थ (तूप, तेल विरहीत पदार्थ), मेथी, शेपू, पालक सारख्या हिरव्या पालेभाज्या, मैद्याचे तळलेले पदार्थ, डबा बंद पदार्थ, शिळे अन्न, उशिरा आंबवलेले अन्न पदार्थ, वाळवलेली फळे, आंबट फळे, आंबट पदार्थ, मासे, पपई, अननस, कच्च्या भाज्या, कच्चा कांदा, चणाडाळ, वाळलेले काजू, सोयाबिन, पांढरा तसंच काळा वाटाणा, कारले, मका, काकडी, पांढरा कोंडा, बकरीचे, डुकराचे मांस हे वात दोषाची वाढ करतात.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

ज्ञानेश हटाव, लोकशाही बचाव’; व्होटचोरीच्या आरोपावरून काँग्रेस आक्रमक

बुलढाणा: भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणूक आयोगाच्या मदतीने कथित…

7 तास ago

MPSC विद्यार्थ्यांचा अपमान केल्याबद्दल माफी मागा’; भाजप प्रवक्त्यांवर अमोल मातेलेंचा हल्लाबोल

पुणे: पुण्यात आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या MPSC विद्यार्थ्यांबाबत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलेल्या…

13 तास ago

महाराष्ट्राचा बुलंद, बाणेदार आवाज शांत झाला; सच्चा, दिलदार मित्र गमावला; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: चित्रपट क्षेत्रात अभिनयाची उत्तुंग शिखरे गाठणारे, संवादफेकीपासून मुद्राभिनयापर्यंत स्वतःची स्वतंत्र शैली निर्माण करणारे आणि…

15 तास ago

नाना केवळ महान अभिनेते नव्हते, तर सामान्यांच्या दुःखाशी जोडलेला संवेदनशील माणूस होते

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्व पोरके; सचिन अहिर यांची भावपूर्ण श्रद्धांजली  मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टी…

15 तास ago

नाना पाटेकर यांच्या निधनाने कलाविश्वाने हरहुन्नरी कलाकार गमावला; सुनेत्रा पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: भारतीय चित्रपटसृष्टी आणि रंगभूमीवर आपल्या अजोड आणि दमदार अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना…

16 तास ago

व्होट चोर ज्ञानेश कुमारला महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

आला तर तोंडाला काळे फासणार; निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात काँग्रेसचा आक्रमक इशारा मुंबई: देशाचे मुख्य निवडणूक…

1 दिवस ago