आरोग्य

केवळ एक लवंग खाण्याचे फायदे

आजकाल महागाईसोबत रोगराई पण वाढत चालली आहे. प्रत्येक आजारासाठी अलोपॅथीच्या महागात महाग गोळ्या बनवल्या जात आहेत. पूर्वीच्या काळात अलोपॅथीक गोळ्या-औषधींना जास्त महत्व नसायचे. कारण पूर्वी डॉक्टर कमी आणि वैद्य जास्त असायचे. ते सर्व अलोपॅथी पेक्षा आयुर्वेदावर जास्त विश्वास करायचे. विशेष म्हणजे आयुर्वेदिक औषधीमुळे कुठलेही दुष्परिणाम होण्याची शक्यता नसते.

आज आपण अशाच एका आयुर्वेदिक गोष्टीची माहिती जाणून घेणार आहोत, जी की बऱ्याच रोगांना दूर करण्याची क्षमता ठेवते. आज आपण माहिती घेणार आहोत लवंग विषयी. तसे बघायला गेलं तर लवंग एक प्रकारचा मसाला आहे, परंतु आयुर्वेदामध्ये या मसाल्याचा उपयोग बऱ्याच रोगांना दूर ठेवण्यासाठी केला जातो. लवंग ना आयुर्वेदामध्ये औषधींचा गुरू मानले जाते. तुम्ही या अगोदर लवंग चे शरीरास असणारे फायदे ऐकलेही असतील पण एवढ्या छोट्या लवंग चे शरीरास इतके सारे फायदे आहेत की तुम्ही ऐकलेही नसतील. आज आम्ही तुम्हाला या आर्टिकल मध्ये अशा काही रोगांविषयी सांगणार आहोत, जे की एक लवंग खाल्याने ठीक होऊ शकतात. या रोगांसाठी तुम्हाला काही मोठा खर्च करून इलाज करण्याची गरज नाहीये. तुम्ही घरच्या घरीच हे उपाय अवलंबून ठीक होऊ शकता.

लवंग खाल्याने होतात हे अद्भुत फायदे

सध्या हिवाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. वातावरण सात बदलले तर बऱ्याच जणांना सर्दी-खोकल्याचा त्रास होतो. यावर उपचार म्हणून बरेच जण महागात महाग सिरप पितात तरी पण त्यांना यापासून सुटका मिळत नाही. यामुळे तुम्हाला जर खोखला पळवायचा असेल तर एक लवंग तोंडात ठेवा व तिला चावट राहा. तुम्हाला आश्चर्य वाटेल की एव्हडी शी लवंग शरीरासाठी इतकी फायदेशीर आहे.

1) लवंग तोंडात ठेवून जास्तीत जास्त वेळ चावल्याने तोंडातून येणारा दुर्गंध एका झटक्यात दूर होऊ शकतो आणि मोकळा आणि फ्रेश श्वास बनतो.

2) लवंगच्या तेलाचा एक थेंब जर कपड्यात बांधून ठेवला तर, जेव्हा पण तुमचे नाक बंद होईल किंवा सर्दी झाली तर एकदा वास घेतला तर तुमचे नाक झटक्यात मोकळे होईल.

3) ज्या लोकांना जळजळ म्हणजे ऍसिडिटी ची समस्या असते, त्यांनी 100 ग्राम पाण्यामध्ये लवंग चा खिस करून चांगले मिसळून प्यावे. यामुळे तुमची ऍसिडिटी लवकर बरी होईल.

4) बरेच वेळा आपल्या घरातील वयस्कर व्यक्तीच्या जॉइंटमध्ये त्रास असतो. लवंगचे तेल त्या जॉईंटवर लावल्याने बऱ्यापैकी त्रास कमी होईल.

5) ज्या लोकांना खूप तहान लागते किंवा जास्त घाम येतो, त्यांनी गरम पाण्यात लवंग वाटून पाण्यात मिसळून प्यावी. यामुळे तुमच्या समस्या दूर होतील.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘मतदारांची नावे वगळल्याचा’ आरोप; ज्ञानेश कुमार यांच्या अटकेच्या मागणीसाठी काँग्रेसचे २८ सप्टेंबरला राज्यभर आंदोलन

मुंबई: निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फी…

6 तास ago

मोतीबन-कोठारी परिवार म्हणजे एकत्र कुटुंब, आदर्श कुटुंब!

एकत्र आणि मोठे कुटुंब असणे ही केवळ संख्येची बाब असते; मात्र त्या मोठ्या कुटुंबातील माणसांची…

7 तास ago

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; विविध सवलती लागू

मुंबई: खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये…

7 तास ago

अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसची निवडणूक समिती जाहीर; ११ जणांवर जबाबदारी

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमरावती विभाग…

8 तास ago

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा मदतीचा जीआर; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

चंद्रपूर: राज्य सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आश्वासने…

8 तास ago

दुष्काळ जाहीर करून चालणार नाही; हेक्टरी १ लाख रुपये तातडीने खात्यात जमा करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील ७५ टक्के भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना ठोस आणि भरीव…

8 तास ago