व्हिटॅमिन बी-१२ हे ‘सायनोकोबालामिन’ म्हणून ओळखले जाते. हे पेशी पर्यंतचे चयापचय, विशेषतः DNA संश्लेषण (अनुवंशिक जनुके) आणि ऊर्जेच्या निर्मिती मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. व्हिटॅमिन बी-१२ ची कमतरता ही जीवनशैलीशी निगडित आणि विविध औषधांचा दुष्परिणाम यांमुळे होणारे आहे. अनेक रुग्णात बी-१२ ची कमतरता दिसून येते. मग यासाठी इंजेक्शन, गोळ्या असे विविध उपाय चालू होतात.
बी-१२ ची कमतरता कशामुळे
बी-१२ हे पाण्यात विरघळणारे जीवनसत्त्व आहे. त्यामुळे ते शरिरात शोषले जाते. ‘कोबाल्ट’ हे मिनरल (खनिज पदार्थ) बी-१२ मध्ये आहे. बी-१२ ची शरिराला अतिशय अल्प प्रमाणात आवश्यकता असते. त्याचा यकृतात साठा असतो. हा साठा जोपर्यंत संपत नाही, तोपर्यंत बी-१२ ची कमतरता होण्याची शक्यता होत नाही. आहार समतोल असेल, म्हणजे सगळे घटक आहारातून शरिराला मिळत असतील, तर बी-१२ ची कमतरता सहसा होत नाही. मात्र कमतरता असेल, तर आरोग्याची हेळसांड होत आहे, असे समजावे. पालटलेली जीवनशैली हे कमतरता होण्याचे प्रमुख कारण आहे.
कमतरता का होते
वय वाढत जाते, तसे पोटातील ‘ॲसिड’ स्रवण्याची प्रक्रिया मंदावते. ‘गॅस्ट्रिक सर्जरी’ (जठरा संबंधीचे शल्यकर्म), जुनाट सूज, दीर्घकाळ असलेला ‘ॲनिमिया’ (रक्तक्षय), थकवा अशा कारणांमुळे पोटाच्या समस्या निर्माण होतात. स्वादुपिंडात बिघाड हेही बी-१२ च्या कमतरतेचे प्रमुख कारण असते. ‘टाईप-२’ मधुमेहामध्ये उपचारासाठी वापरले जाणारे मेटफॉर्मिन बी-१२ कमतरतेसाठी कारणीभूत ठरते.
जर पुरेशा प्रमाणात लाळ स्रवत नसेल, तर बी-१२ हे R प्रोटीन सोबत मिसळत नाही. त्यामुळे शरिराची बी-१२ शोषून घेण्याची क्षमता न्यून होते.
अनेकदा वेगवेगळ्या औषधांमुळे स्वतःचे तोंड कोरडे पडते, पुरेशा प्रमाणात लाळ स्रवत नाही. रक्तदाबावरील (ब्लड प्रेशर वरील) औषधे, तसेच नैराश्यावर उपचारासाठी घेण्यात येणारी औषधे यांमुळे अनेकदा तोंड कोरडे पडते.
पोटामध्ये जर अल्प प्रमाणात आम्ल (ॲसिड) स्रवत असेल, तरी बी-१२ ची कमतरता निर्माण होते. पोटाच्या अल्सरवर उपचारासाठी जी औषधे वापरली जातात, त्यामुळे आम्ल स्रवण्याचे प्रमाण न्यून होते. बी-१२ ची कमतरता आणि अल्सर च्या गोळ्यांमध्ये संबंध असल्याचे संशोधकांना आढळले आहे.
बी-१२ कमतरतेची लक्षणे
भूक न लागणे, बद्धकोष्ठता, अशक्तपणा, हातपायाला मुंग्या येणे ही लक्षणे असतील, तर डॉक्टर चाचणी करायला सांगतात. आवश्यकता असेल, तर पूरक औषधे घेण्याचा सल्ला दिला जातो. बी-१२ ची पातळी पुष्कळ न्यून असेल, तसेच कमतरतेची लक्षणे असतील, तरच औषध सुचवले जाते. जर बी-१२ हे आतडी नीट शोषून घेऊ शकत नसतील, तर इंजेक्शन हा महत्त्वाचा उपाय आहे.
आहार काय असावा
बी-१२ चे स्रोत – दूध, दही, ताक, प्राणीजन्य पदार्थ, मासे, अंडी, चिकन. यात बी-१२ चे प्रमाण चांगले असते; मात्र अनेक शाकाहारी व्यक्तींचा प्रश्न असतो की, बी-१२ वाढवण्यासाठी आम्ही काय करायला हवे? तर शाकाहारी लोकांसाठी हे प्रमाण अधिक असणारी फळे आणि भाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. उदा- पालक, बीटरूट, बटरनट स्क्वॅश (फळांपासून सिद्ध केलेले पेय), मशरूम, बटाटे यांसारख्या भाज्या बी-१२ चे चांगले स्रोत आहेत. जर शाकाहारी असाल, तर आहारात या पदार्थांचे सेवन केले पाहिजे.
भूक न लागणे, एकाग्रते मध्ये बाधा, तोंडावर किंवा जिभेवर फोड येणे ही बी-१२ च्या कमतरतेची लक्षणे आहेत. ही लक्षणे दिसू लागताच फळे अन भाज्या यांचे सेवन चालू करावे.
मशरूम मध्ये बी-१२ अधिक असते. बी-१२ ची प्रतिदिनची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी अनुमाने ५० ग्रॅम वाळलेल्या मशरूमचे सेवन करावे लागेल. तसेच सफरचंद, केळी, ब्ल्यू बेरी, संत्री इत्यादी मध्ये बी-१२ हे थोड्या अधिक प्रमाणात मिळते.
योग्य आहार नि नियमित व्यायाम
जीवनशैलीशी निगडित कोणत्याही आजारापासून दूर रहायचे असेल, तर संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. योग्य आहार आणि नियमित व्यायाम या गोष्टी आपल्याला कोणत्याही आजारापासून दूर ठेवू शकतात. आज पासूनच स्वतःचा आहार पालटा, तुमचे जीवन नक्की पालटेल.
(सोशल मीडियावरून साभार)
मुख्यमंत्री फडणवीसांकडून मागणीची दखल; अविनाश रणखांब यांची नव्या एमडीपदी नियुक्ती मुंबई : अण्णासाहेब पाटील आर्थिक…
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध विभागांशी संबंधित ८…
मुंबई: राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (NEP) राज्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठांनी एकसमान शैक्षणिक…
आजकाल महागाईसोबत रोगराई पण वाढत चालली आहे. प्रत्येक आजारासाठी अलोपॅथीच्या महागात महाग गोळ्या बनवल्या जात…
रोजच्या जेवणात वेगवेगळ्या पदार्थांची चव वाढवण्यासाठी आलं घातलं जातं. खरंतर, 'आलं' मसाल्यांच्या पदार्थांपैकी एक असून…
पुणे : कामानिमित्त पुण्यात आलेल्या लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील प्रवाशाच्या खिशातून गर्दीचा फायदा घेत अज्ञात…