काही पदार्थांचं कॉम्बिनेशन हे प्रत्येक वेळी बरोबरच ठरेल असं नाही. याचा आरोग्यावर वाईट परिणामही होऊ शकतो. म्हणून डॉक्टर रूग्णांना औषध वेळेवर घेण्या सोबतच आहारावरही लक्ष देण्यास सांगतात. कारण आजारी असताना आपण जे खातो त्याचा आपल्या औषधावरही प्रभाव पडत असतो.
केळी: आजारी असताना अनेकदा लोक केळी खातात. केळी मध्ये असणारं पोटॅशिअम आरोग्यासाठी फायदेशीर असतं. पण जर तुम्ही ब्लड प्रेशरची औषधे घेत असाल, जसे की कॅप्टोप्रिल, एंजियोटेनसिन इत्यादी तर केळी सहीत इतरही पोटॅशिअम असलेली फळे किंवा पदार्थ खाऊ नये. याने हृदयाचे ठोके वाढू शकतात.
आंबट फळ: जेव्हा तुम्ही औषधे घेता, तेव्हा आंबट फळं खाऊ नये. आंबट फळं ५० पेक्षा अधिक औषधांना प्रभावित करू शकतात. याने शरीरात वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात. या समस्या टाळण्यासाठी औषधे घेत असाल तर लिंबू, संत्री, द्राक्ष, लोणचं, चिंच खाऊ नका.
चहा-कॉफी: औषधे ही गरम गोष्टी मुळे खराब होतात. औषधांचं कोटिंग आधीच गरम पाण्या सोबत नष्ट होतं आणि त्याचा योग्य तो फायदा मिळत नाही. अशात चहा-कॉफी किंवा कोणत्याही गरम पदार्था सोबत किंवा पेया सोबत औषध घेऊ नये. औषधे थंड किंवा नॉर्मल पाण्या सोबत घ्यावीत.
डेअरी प्रॉडक्ट्स: डेअरी उप्तादने जसे की, दूध, पनीर, दही आणि मलाई सारखे पदार्थ शरीरात काही एन्टीबायोटिक औषधांचा प्रभाव निकामी करू शकतात. दुधातील कॅल्शिअम, मॅग्नेशिअम सारख्या खनिजांनी प्रोटीन सोबत काही रिएक्शन होतात. याने काही औषधांचा प्रभाव कमी होतो.
अल्कोहोल: अल्कोहोल सोबत औषधे अजिबात घेऊ नये. औषधात असे अनेक केमिकल्स असतात, जे अल्कोहोल सोबत रिएक्शन करू शकतात. अशात औषधांचा फायदा होण्या ऐवजी जीवाला धोकाही होऊ शकतो.
कोल्ड ड्रिंक्स: सोडा आणि कोल्ड ड्रिंक्स सोबत औषधे घेण्याची चूक अजिबात करू नका. अशात औषध नुकसानकारक ठरू शकतं.
(सोशल मीडियावरून साभार)
लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…
ठाणे: शिक्षणात सर्वसमावेशकता आणून प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मानाची वागणूक मिळणे अत्यंत गरजेचे आहे,…
बिबट्याच्या दहशतीत शेतकऱ्यांचा जीव धोक्यात; जीव मुठीत धरुन पिकांना पाणी देण्याची वेळ शिरुर (तेजस फडके):…
चारचाकीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा? छळाच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध गुन्हा छत्रपती संभाजीनगर : अवघ्या चार…
पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित…
मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात…