आरोग्य

काय करणार, वेळच नाही म्हणून स्वत:ला किती छळणार? तुम्ही नाही तर कोण स्वत:साठी वेळ काढणार

अलीकडे मोठ्या प्रमाणावर वापरली जाणारी ही संकल्पना. स्वतःसाठी ठरवून, आवर्जून काढलेला वेळ म्हणजेच ‘मी टाइम.’ गमतीचा भाग म्हणजे लोक हा ‘मी टाइम’अगदी सोयीस्करपणे वापरताना दिसतात. एक मानसशास्त्रतज्ज्ञ म्हणून मला मात्र कायम असं वाटतं की ‘मी टाइम’चा विचार करताना 3 R लक्षात घेणे गरजेचे आहे.

3 R म्हणजे काय

तर हे ३ रिलॅक्स R म्हणजे रिचार्ज आणि रिफोकस

‘मी टाइम’साठी आपण जी ॲक्टिव्हिटी निवडू ती करताना आपल्याला शारीरिक मानसिक विश्रांती मिळणे आवश्यक असते. ती मिळाली की आपल्याला आपल्या कामांत पुन्हा लक्ष केंद्रित/रिफोकस करण्यासाठी ऊर्जा मिळते. आपण रिचार्ज होतो. त्याउलट ‘मी टाइम’साठी निवडलेल्या ॲक्टिव्हिटी करतानाच जर आपण थकून जात असू, ती केल्यानं रोजच्या दैनंदिन कामात अडथळा निर्माण होत असेल तर त्यातून आपल्याला ‘मी टाइम’मधून जे साधणे आवश्यक आहे, ते साधता येत नाही. आणि मुख्य म्हणजे ‘मी टाइम’च्या नावाखाली रिल्स स्क्रोल करत राहणं, फोनवर तासन् तास गॉसिपिंग करणं, भरमसाठ शॉपिंग करणं, सेल्फी काढत सुटणं म्हणजे ‘मी टाइम’ आहे का? – असे प्रश्न स्वतःलाच नव्याने विचारण्याची गरज आहे.

माहितीच्या भडिमाराच्या या युगात स्वतःला स्वत्वाशी कनेक्ट करणारा, जोडणारा ‘मी टाइम’ हा आवश्यक आहे किंबहुना तो हवाच! पण तो वापरण्यासाठी सुज्ञता मात्र हवी. ‘मी टाइम’ शहाणपणाने वापरण्यासाठी अनेक गोष्टी करणे शक्य आहे.

मी टाइम आणि मेडिटेशन

1) मी टाइममध्ये करावी अशी परिणामकारक गोष्ट म्हणजे ‘मेडिटेशन’अर्थातच ‘ध्यानधारणा’. मेडिटेशनमुळे रिलॅक्स, रिचार्ज आणि रिफोकस हे 3R साधता येणे नक्कीच शक्य आहे.

2) नव्याने झालेल्या अनेक संशोधनांत असे सिद्ध झाले आहे की, मेडिटेशनच्या सरावामुळे मानवी मेंदूच्या संरचनेत आणि कार्यकुशलतेत लक्षणीय असे सकारात्मक बदल घडून येताना दिसतात.

3) मेडिटेशन नियमित केल्यानं मेंदूतील ग्रे मॅटरमध्ये वाढ होत असल्याचे अनेक अभ्यासांत दिसून आले आहे. हा ग्रे मॅटर स्मृती, निर्णय क्षमता, अवधान क्षमता, स्नायू व भावनिक नियंत्रण, वेदन-संवेदन यांच्या कार्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो.

4) मेंदूचे बाह्य आवरण म्हणजेच कॉर्टेक्सच्या जाडीमध्ये वाढ होते, हे बाह्य आवरण सेंसरी प्रोसेसिंग, अवधान आणि भावनांचे नियमन करण्यामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते.

5) लक्ष केंद्रित करण्याची क्षमता यासाठी प्रिफ्रंटल कॉरटेक्स मधील ॲक्टिव्हिटीज महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. माइंडफुलनेस मेडिटेशन सारख्या तंत्रांच्या वापरामुळे लक्ष केंद्रित करणे व ते टिकून ठेवणे या क्षमतेमध्ये वाढ झाल्याचे संशोधनांती दिसून आले आहे.

6) मेडिटेशनमुळे पूर्ववर्ती सिंग्युलेट कॉर्टेक्सची मजबुती होते. मानवी मेंदूचा हा भाग भावनिक प्रक्रिया आणि स्वनियमन, भावनिक नियमनाचे कार्य करतो. हा मेंदूचा भाग वेदनेबाबतची सहनशीलताही वाढवतो.

7) वेगवेगळ्या बोधनिक कार्यामध्ये कार्यक्षमतेने बदल करण्याची क्षमता म्हणजे बोधनिक लवचिकता. बोधनिक लवचिकता असणारी व्यक्ती अधिक चांगल्या प्रकारे समस्या निराकरण करू शकणारी, सृजनशील आणि लवचिकपणे विचार करणारी असते. मेडिटेशनमुळे व्यक्तीच्या बोधनिक लवचिकतेत वाढ होते.

8) मेडिटेशनमुळे कॉर्टिसोल या संप्रेरकाची अर्थातच हार्मोनची पातळी कमी होण्यास मदत होते. याद्वारे ताणतणाव कमी होऊन स्थिरता, विश्रांती, मानसिक शांती अशा मानसिक स्थितीचा अनुभव येतो. ताणतणाव व ताणजन्य परिस्थितीचा सामना करण्याची क्षमता वृद्धिंगत होते.

9) मेडिटेशनमुळे नवीन न्यूरल कनेक्शन निर्माण करण्याची मेंदूची क्षमता वाढते. यामुळे आपला मेंदू नवीन अनुभव, माहिती यांच्याशी लवकर जुळवून घेऊ शकतो.

11) मेंदूच्या विविध भागांमधील कम्युनिकेशन सुधारण्यास मदत होते. या मेंदूच्या विविध भागांमध्ये होणाऱ्या नेटवर्किंगमुळे केवळ बोधनिक क्षमताच नाही तर भावनिक-मानसिक स्वास्थ्यही सुधारण्यास मदत होते.

11) मेंदूतील अल्फा, थिटा यांसारख्या ब्रेनवेव्ज अर्थातच मेंदू लहरी या मन:शांती, सृजनशीलता आणि मानसिक स्पष्टतेला प्रोत्साहन देतात. यामुळेच मेडिटेशनच्या सरावामुळे विश्रांततेच्या खोल अवस्थेची अनुभूती येते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

गोकुळच्या अध्यक्षपदासाठी सत्तेचा खेळ? संचालकांना परराज्यात नेल्याने वडेट्टीवार संतप्त

१० नोव्हेंबरच्या निवडणुकीत सर्व संचालकांना मतदानाची संधी द्या; सतेज पाटील यांच्या पाठीशी काँग्रेस ठाम मुंबई: गोकुळ…

2 तास ago

संसार दोघांचा, त्याग मात्र एकटीचाच का? कुंकवाचा मान राखता, मग स्त्रीच्या भावनांचा सन्मान कुठे

लग्न म्हणजे केवळ दोन जीवांचे मिलन किंवा दोन कुटुंबांचे नाते नाही, तर दोन व्यक्तींनी एकमेकांच्या…

3 तास ago

चित्रपताका मराठी चित्रपट महोत्सवाचे अधिकृत संकेतस्थळ सुरू; १५ नोव्हेंबरपासून प्रभादेवीत रंगणार चित्रपटांची मेजवानी!

नोंदणी शुल्क मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार; ३५ मराठी चित्रपट, ७ परिसंवाद, ४ विशेष मुलाखती आणि…

9 तास ago

राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाची चार विभागीय केंद्रे; आठ विद्यापीठांत उपकेंद्रे सुरू होणार

चंद्रकांतदादा पाटील यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश; कुलगुरूंना जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना…

9 तास ago

मनसेचे प्रदेश सरचिटणीस रणजित शिरोळे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; भाजप, आपच्या पदाधिकाऱ्यांचाही पक्षप्रवेश!

राहुल गांधींचे हात बळकट करण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश; हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत टिळक भवनात पक्षप्रवेश सोहळा…

9 तास ago

५ हजारांत दिवाळी साजरी करून दाखवा! फडणवीसांना हर्षवर्धन सपकाळांचे खुले आव्हान

महायुती सरकारवर काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा जोरदार हल्लाबोल; ‘गोकुळ’वर कब्जा करण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप मुंबई: राज्यातील…

9 तास ago