आरोग्य

सर्दी, खोकल्याचा त्रास का होतो

प्रत्येकाने रोज योगासने, प्राणायाम करायला हवे. यामुळे निरोगी राहण्यास मदत होते, असे ते नेहमीच सांगतात. आता त्यांनी सर्दी, खोकला या कधीही आजारावर नेमके उपाय सांगितले आहेत. विशेष म्हणजे सर्दी, खोकला नेमका का होतो.

खोकला आणि सर्दी प्रामुख्याने शरीरातील वात आणि कफ दोषामुळे होते. ज्या लोकांना वात दोष आहे त्यांनी आपल्या आहारात थोडा बदल करायला हवा. अशा लोकांनी तेलकट, थंड किंवा आंबट पदार्थ खाणे कमी करावे. या गोष्टींमुळे वातदोष वाढतो. म्हणूनच सर्दी, खोकला वाढतो. वातदोष असणाऱ्यांचे शरीरा फारच संवेदनशील असते. त्यामुळेच छोट-छोट्या गोष्टींचा त्यांच्या शरीरावर परिणामहोतो. शरीरात वात वाढलेला असेल तर म्युकसचाही त्रास होतो.

कोणकोणत्या गोष्टी सर्दी, खोकल्याला थांबवू शकतात

शरीरात कफदोष असेल तर अनेक अडचणी येतात. कफ वाढतो. त्याचा परिणाम पूर्ण शरीरावर पडतो. कफदोषामुळे शरीर लठ्ठ होते. झोप जास्त येते. सुस्ती वाढते. अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये, असे रामदेवबाबांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे लहान मुलांना सर्दी, खोकला झाला असेल त्यांना थेट औषध देण्याऐवजी त्यांच्यावर नैसर्गिक पद्धतीने उपचार कसा करता येईल. लहान मुलांवरील उपचारासाठी नैसर्गिक गोष्टींचा वापर करावा. खोकला, सर्दी घालवण्यासाठी हळद, आलं, तुळस, लवंग, मिरे, इलायची, जायफळ यासारख्या वस्तूचां फार उपयोग होऊ शकतो. यातील बऱ्याच वस्तू या घरातच मिळतात. त्यामुळे यांचा वापर करावा.

मिरे भाजून चावल्यास होतो फायदा

उदाहरणादखल लहान मुलांना सर्दी, खोकल्याचा त्रास होत असेल तर लवंग, जायफळ यांना दगडावर घासून ते पिता येते. काळे मिरे यांना भाजून ते चावल्यामुळे सर्दी, खोकला कमी होतो. जायफळ, अदरक, लवंग यांना पाण्यात उकळून त्याचा काढा पिला तरीही सर्दी, खोकला दूर होतो.

प्राणायाम, योगासनेही फार महत्त्वाचे

दरम्यान, प्राणायामदेखील तुम्हाला अनेक अडचणींपासून दूर ठेवू शकतात. सिद्धासन, भस्त्रिका, कपालभाती यासारखे प्राणायाम रोज केले पाहिजेत. यामुळे वातदोष, पित्तदोष, कफ यासारख्या अडचणी दूर होण्यास मदत होते. आजारी पडण्याची शक्यता कमी होते.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शाळा प्रवेशासाठी वयोमर्यादा निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी

मुंबई: राज्यातील पूर्वप्राथमिक ते इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी राज्य शासनाने बालकांचे किमान वय निश्चित केले आहे. नव्या…

2 तास ago

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत

पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…

11 तास ago

‘फ्लॅट नव्हे, ग्राहकांचा विश्वास जिंकणारे शहर उभारा!’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विकासकांना आवाहन

पुणे: “घर म्हणजे केवळ फ्लॅट नव्हे, तर प्रत्येक कुटुंबाचे स्वप्न असते. त्यामुळे विकासकांनी केवळ इमारती…

11 तास ago

किरण सरनाईक यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे उद्या अमरावतीत

शिक्षक मतदारसंघात महायुतीची ताकद दाखवणार; जाहीर सभेकडे राज्याचे लक्ष मुंबई: विधान परिषद निवडणुकीच्या प्रचाराला वेग…

11 तास ago

मराठवाड्याचा आवाज बुलंद करण्यासाठी सतीश चव्हाण यांना विजयी करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

बीड: मराठवाड्याच्या विकासाची लढाई ही एका दिवसाची नसून, त्यासाठी अनुभवी, अभ्यासू आणि सातत्याने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींची…

11 तास ago

दुष्काळात भाजपची इव्हेंटबाजी; गरबा आणि महानाट्यावर कोट्यवधींच्या खर्चाचा आरोप

अतुल लोंढे यांचा हल्लाबोल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित नेत्यांचे राजीनामे घेण्याची हिंमत दाखवावी मुंबई :…

12 तास ago