आरोग्य

बाबा वेगांची ती अप्रिय भविष्यवाणी खरी ठरणार?

मुंबई: फ्रेंचचा प्रसिद्ध भविष्यवक्ता मिशेल डी नोस्ट्राडेमस, भारताचे प्रसिद्ध भविष्यवक्ते संत अच्युतानंद दास आणि बल्गेरियन भविष्यवक्त्या बाबा वेंगा यांची भविष्यवाणी सर्वांनाच माहिती आहे, सर्वांनी ती वाचली देखील आहे. मात्र फार कमी लोकांनी त्यातील एका भाकि‍ताकडे लक्ष दिलं असेल. या तीन भविष्यवेत्त्यांनीच नाही तर विदेशातील अनेक लोकांनी याबाबत भाकीत केलं आहे. जाणून घेऊयात नेमकी काय आहे ही भविष्यवाणी?

कॉमन भविष्यवाणी

नोस्ट्राडेमस, संत अच्युतानंद दास आणि बाबा वेंगा या तीनही भविष्यवेत्त्यांनी एक सारखीच भविष्यवाणी केली आहे. या तीनही भविष्यवेत्त्यांनी वर्तवलेल्या भाकीतानुसार आकाशातून एक महाकाय उल्का पडेल, ज्यामुळे जगभरातील अनेक देश समुद्रात बुडतील. तिसरे महायुद्ध अटळ आहे, यातील बाबा वेंगा आणि नोस्ट्राडेमस यांनी वर्तवलेल्या भाकीतानुसार जगात एक मोठं युद्ध होईल, या युद्धानंतर चीन एक मोठी महासत्ता म्हणून जगासमोर येईल. मात्र या तीन्ही भविष्यवेत्त्यांनी वर्तवलेलं एक भाकीत आश्चर्यकारक आहे, त्यांनी भारतामध्ये एक महान नेता जन्म घेईल तो जग बदलेल असं देखील भाकीत वर्तवलं आहे.

संत अच्युतानंद दास यांनी देखील मोठं भाकीत वर्तवलं आहे, ते श्रीकृष्णाचे खूप मोठे भक्त होते. अच्युतानंद दास यांनी केलेल्या भाकीतानुसार एक वेळ अशी येईल की जगात सर्व लोक हे श्रीकृष्णाचे भक्त बनतील, रशिया हे एक हिंदू राष्ट्र बनेल. रशियामधील शेकडो लोक भगवान जगन्नाथ यांच्या दर्शनासाठी येतील. भारताचा राज्यकारभार एका संताच्या हाती येईल, तो अविवाहीत असेल, हा नेता पुढे जगभरात सनातन धर्माची स्थापना करेल असं भाकीत संत अच्युतानंद यांनी वर्तवलं आहे. असंच काहीस भाकीत बाबा वेंगा आणि नोस्ट्राडेमस यांनी देखील वर्तवल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येतो. मात्र तीनही भविष्यवेत्त्यांनी जगात तिसरं महायुद्ध होईल आणि यामध्ये जगातील अनेक देशांचं प्रचंड नुकसान होईल असं भाकीत वर्तवलेलं आहे. त्यामुळे यांची ही भविष्यवाणी आता जगासाठी चिंतेचा विषय ठरली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago